मेष - ज्या व्यक्तींची व्यापार व्यवसायातील भागीदार व्यक्तीची वाद विवाद झाले असतील तर ते संपतील आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन कल्पना अमलात आणणे आपल्या दृष्टीने फायदेशीर आहे.
वृषभ - आपल्या व्यापार व्यवसाय मध्ये नवीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. त्या जरी आपल्याला फायद्याच्या वाटल्या तरी निर्णय विचारपूर्वक घेणे फार आवश्यक आहे.
मिथुन - आपल्या व्यापार व्यवसाय या मधले नियोजन खूप चांगले असणार आहे. नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
कर्क - आपल्या जवळ आत्मविश्वास भरपूर असणार आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करणार आहात. कामात चांगले यश आल्यामुळे वरिष्ठ ही खुश असणार आहेत.
सिंह - आपले महत्वाचे उद्दिष्ट आज आपण गाठणार आहात. आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा असणार आहे. अधिकारांमध्ये चांगले वाढ होणार आहे. सामाजिक पद आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढणार आहे.
कन्या - आज आपल्या मेहनतीचे फळ चांगले मिळणार आहे. काहि दिवसापासून चाललेल्या कटकटी आणि त्रास संपूर्णपणे संपणार आहे. नोकरी करणाऱ्यांना दिवस चांगला असणार आहे.
तुळ - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कामामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास कमी झाल्यासारखे आपल्याला वाटणार आहे.
वृश्चिक - कमी कष्टा मध्ये जास्त पैसे मिळवण्याचे मार्ग स्वीकारू नका. त्यामध्ये आपणास त्रास होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण अभ्यास करूनच निर्णय घ्या. कार्यक्षेत्रातील व्यक्तींशी चांगला समन्वय ठेवा.
धनु - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अचानक काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण विचलित होऊ नका. पूर्णपणे आत्मविश्वासाने काम करा. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे.
मकर - व्यापार व्यवसायातील देण्याघेण्याचे व्यवहार चांगले होतील. कार्य कुशलतेने काम केल्यास आर्थिक फायदे वाढणार आहेत. वैवाहिक आयुष्यात मधुरता राहील.
कुंभ - ज्यांचा व्यवसाय हॉटेल आणि रेस्टॉरंट चा आहे त्यांना आजच्या दिवसात चांगला फायदा मिळणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी येणार आहेत. घरातील महत्त्वाच्या कार्याला वेग येणार आहे.
मीन - घरातील व्यक्तींबरोबर कुठे फिरायला जाण्याचा प्रोग्राम असू शकतो. बेरोजगार व्यक्तींना नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात यश मिळणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे.