मेष - अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना चांगल्या प्रकारे तोंड द्याल. महत्त्वाचे निकाल मनाप्रमाणे लागतील. कामामध्ये अपेक्षित गती घेणार आहात. आपल्यामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास चांगला असणार आहे.
वृषभ - आपल्या कामामध्ये आपल्याला आपल्या स्मरणशक्तीचा चांगला फायदा झालेला दिसेल. काही ठिकाणी राजकारण करावे लागेल. आपल्या कामाच्या अनुभवाचा आपल्या कार्यक्षेत्रात चांगला उपयोग होणार आहे.
मिथुन - आजच्या दिवसात समोरच्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास टाकू नका. आर्थिक बाबतीत देण्याघेण्याचा व्यवहार खूप जपून केले पाहिजेत. नुकसान होऊ शकते. अनावश्यक प्रवास टाळणे पाहिजेत.
कर्क - आपल्या मध्यस्थीमुळे कामे होणार आहेत. आपले मन प्रसन्न राहील. तुमच्या मनाप्रमाणे सर्व कामे मार्गी लागतील. जुने मित्र भेटण्याची शक्यता. व्यापार-व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल.
सिंह - नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. मात्र कामासाठी धावपळ होऊ शकते. अपेक्षित नवीन कामे येतील. धार्मिक कामामध्ये सहभाग असेल.
कन्या - सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आपले काम होईल. आर्थिक आव्हान चांगली असेल. नावलौकिकात वाढ होणार आहे. आपली कामे मनासारखी होणार आहेत.
तुळ - आज आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती ठीक असणार आहे. ग्रहमानाची हवी तशी साथ मिळणार नाही. थोडा संयम ठेवलेला बरा.
वृश्चिक - नोकरीमध्ये अस्थिरता जाणवण्याची शक्यता आहे काहींना बदलीला सामोर जावे लागणार आहे हे अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे मात्र व्यापार व्यावसायिकांना अनुकूल कालावधी आहे.
धनु - कुठलेही निर्णय घाई घाईने घेऊ नका. महत्वाचे काम करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून काम करा, तर काम पूर्ण होतील व व्यवस्थित होतील. कामकाजात सहयोग कमी मिळेल.
मकर - कलाकार व लेखक यांना नवीन संधी येणार आहेत. कामामध्ये चांगले बदल घडतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात नीट लक्ष देऊन अभ्यास करावा. अत्यंत उत्पादनशील दिवस जाणार आहे.
कुंभ - आपल्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. तुम्हाला ताणातून आणि अडचणीतून दिलासा मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळणार आहे.
मीन - प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसाय मध्ये समृद्धी मिळणार आहे. नोकरी मधले प्रॉब्लेम सुटणार आहेत.