मेष : नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. कलाक्षेत्राल व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल. क्रीडा व राजकीय क्षेत्रातील मंडळींना आजचा दिवस चांगला. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
वृषभ : आजच्या दिवसात आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. व्यापार-व्यवसायात प्रगती करता येईल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल.
मिथुन : आज आपल्यामध्ये पूर्ण पणे मनोबल असणार आहे. महत्वाच्या कार्याला गती मिळेल अपेक्षित गोष्टी साध्य करणार आहात. आपले प्रयत्न सहज साध्य होतील. प्रवासात अनुकूलता लाभेल.
कर्क : लवकर दारांना दिलासा मिळणार आहे आपला केलेल्या कष्टाचे चीज होऊन आर्थिक फायदा होईल कामकाजामध्ये व्यस्त राहणार आहात. अपेक्षित घडामोडी घडतील. आर्थिक फायदा होणार आहे.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्यावेत. अन्यथा पुढे ढकलावेत. एका वेळेला अनेक काम करू नयेत. नवीन कामे मिळण्याची शक्यता.
कन्या : एका वेळेस अनेक कामे आल्यामुळे मनाची द्विधा अवस्था होण्याची शक्यता आहे. मानसिक मनोबल कमी असणार आहे. गुंतवणुकी सारखे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. प्रवासामध्ये त्रास होऊ शकतो.
तुळ : व्यापार-व्यवसायात प्रगती करता येईल. घाईगडबडीत महत्त्वाची कामे करू नका. आपल्या योग्य कामाचे चांगले फळ मिळणार आहे. उत्तम लाभमिळणार आहे. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
वृश्चिक : बोलण्यातून काळजी घेणे फार आवश्यक आहे. दुसऱ्यांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळेल.
धनु : आपल्या प्रयत्नांना चांगले यश येणार आहे. सरकारी नियमांचे पालन करा. आपल्या कामामुळे आपले स्वतःचे व्यक्तिमत्व उजळून जाणार आहे. मानसिकता उत्तम असणार आहे.
मकर : वादविवादाचे प्रसंग टाळणे फार आवश्यक आहे. नातेसंबंध सांभाळावे. आपले खर्च वाढणार आहेत. उत्पन्न मात्र चांगले असेल. घरातल्या व्यक्तींची प्रकृती स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक.
कुंभ : व्यापार व्यावसायिकांना प्रगती करता येईल. घरगुती वातावरण चांगले असणार आहे. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली कामगिरी होणार आहे.
मीन : एखादी चांगले संकल्पना घेऊन येणारी व्यक्ती आपल्यासमोर येईल. त्या व्यक्तीची विश्वासनियता तपासून बघा. कर्जफेडीचा आज दिवस आहे. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता.