मेष - शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. तुमचे शत्रु तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. आत्मविश्वास पूर्वक शत्रूंना नेस्तनाबुत करू शकाल.
वृषभ - आज आपल्या हातून धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. आपली वागणूक अतिशय चांगली असणार आहे. खाजगी आयुष्यात व व्यवसायिक आयुष्यामध्ये लाभ मिळणार आहेत.
मिथुन - कुटुंबातील वर्तुळात आनंद असणार आहे. आजचा दिवस आपणास खूप चांगला असणार आहे. घरातील एखादे बांधकाम किंवा वाहन खरेदी ची शक्यता आहे.
कर्क - आपल्या विचारा बाबत आपला विश्वास असणार आहे. भावंडा कडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळणार आहे. तुमच्या भावंडांसाठी सुद्धा आजचा दिवस अनुकूल आहे. प्रवास होण्याची शक्यता.
सिंह - तुमच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे समतोल सांधणार आहात. लोकप्रियता व चांगले उत्पन्न मिळणार आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर चांगले काम होणार आहे.
कन्या - तुमच्या इच्छा खूप कष्टानंतर पूर्ण होणार आहेत. नवीन कामे हाती घेऊ नका. व्यवसायिक अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक आहे.
तुळ - कुटुंबात किंवा व्यवसायामध्ये काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. धीराने व शांततेने निर्णय घ्या. आजच्या दिवशी आपल्या बौद्धिक चातुर्य कामास येणार आहे. खर्च वाढतील.
वृश्चिक - आपल्या कार्यक्षेत्रत काही अडचणी आल्या तरी परिस्थितीला धीराने तोंड देणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवे पर प्रकल्प आणि कामे ह्याच्यात धोका पत्करून कामे स्वीकाराल. त्याचा चांगला फायदा होईल.
धनु - आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगले काम करणार आहात. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन यशस्वी करणार आहात. कामातील प्रगती आणि उत्साह बघून वरिष्ठ खुश होणार आहेत.
मकर - आजच्या दिवशी आपल्या इच्छेप्रमाणे अनेक कामे साध्य होतील. सामाजिक कार्यात कार्यरत रहाल. मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. प्रतिष्ठित लोकांकडून महत्त्वाची कामे होतील.
कुंभ - आजच्या दिवशी सर्व बाबतीत प्रयत्नशील राहिल्यास अपेक्षित गोष्ट साध्य होणार आहेत. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. प्रवास शक्यतो टाळा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणे फार आवश्यक आहे.
मीन - आपल्या मनासारख्या घटना घडते ही आपल्या मधाळ बोलण्याने लोकांना आपलेसे कराल नवीन ओळखी होतील भागीदारीमध्ये चांगला पायदा मिळणार आहे.