आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 9, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - आरोग्याच्या तक्रारी वाढणार आहेत. आरामदायी वस्तूंवर आणि शान शौकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. आपली बचत होणे कठीण वाटते. लहानसहान गोष्टींवरून भांडणे आणि गैरसमज टाळा.

वृषभ - कल्पक आणि बौद्धिक ऊर्जेच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूलन असणार आहे. तुमच्या कामाला एक कलाप्रकार म्हणून समजून अनेक नवीन प्रकल्प अमलात आणाल. आर्थिक दृष्टीने चांगला.

मिथुन - कौटुंबिक आयुष्यामध्ये चांगले वातावरण राहील आरोग्याच्या दृष्टिकोनातून घरच्या ज्येष्ठांचे कुरबुरी राहतील. आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे. नवीन कामाला गती येईल.

कर्क - आपल्या कार्यक्षेत्रात विस्तार करण्याचा विचार असल्यास जरूर करा. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी येतील. व्यापार व्यावसायिकांना परदेशातून काही फायदे मिळण्याची शक्यता.

सिंह - आपली मानसिकता उत्तम असणार आहे. आत्मविश्वासाचे प्रमाण वाढणार आहे. घरामध्ये महत्त्वाच्या कार्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातून चांगली लाभ मिळतील.

कन्या - तुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी याचा लाभ घेता येणार नाही. तुमच्या घरातील व्यक्तींची आरोग्याची समस्या उद्भवू शकतात. दूरचे प्रवास संभवतात. प्रवास टाळणे हितकारक राहील .

तुळ - आजचा दिवस संमिश्र घटनांचा काळ आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.धाडसाने काम करा.

वृश्चिक - तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. आज आपल्या कार्यामध्ये धाडसाने आपण काम करणार आहे. आर्थिक फायदा चांगला होणार आहे. लोकांशी संवाद चांगला.

धनु - नोकरी व्यवसायामध्ये आशादायक कामे राहणार आहे.नोकरीच्या ठिकाणी आपणास महत्त्व राहणार आहे.तुम्ही धोका पत्करून काम कराल.कोणत्याही परिस्थितीत आपणास यश मिळणार आहे.

मकर - आपल्याशी संबंधित असलेल्या कार्यामध्ये आपणास सहज यश मिळणार आहे.संस्कृतीक कार्यक्रमात सहभागी होणार आहात.सहकारी व्यक्तींकडून आपल्याला सहकार्य मिळणार आहे.

कुंभ - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपणास भरपूर ताण येऊ शकतो. प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने मानसिक त्रास होणार आहे. आपण स्वतःचे खच्चीकरण होऊ देऊ नका. प्रयत्नांची साथ सोडू नका.

मीन - आपल्या सहकार्यामुळे आपल्या कामात गती येणार आहे . नोकरीमध्ये सर्वसाधारण परिस्थिती असणार आहे. व्यापार व्यवसायिकांना व्यापार वाढवण्याची संधी उपलब्ध होईल. आर्थिक यश.

logo
marathi.freepressjournal.in