आजचे राशिभविष्य, १४ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 14, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, १४ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - काम जास्त असल्यामुळे मानसिक तणाव घेऊ शकतो. शारीरिक थकावट वाटणार आहे. स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा. नोकरीमध्ये कोणतेही बेकायदेशीर व्यवहार टाळा.

वृषभ - व्यावसायिकांना उत्साहाच्या वातावरण असणार आहे. आर्थिक कोंडी फुटेल .विद्यार्थ्यांना चांगला दिवस. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनुकूल दिवस असणार आहे. प्रगती होईल.

मिथुन - आहार-विहाराचे पथ्य पाळा, कोणाशी हुज्जत घालू नका. मालमत्ताविषयक निर्णय होतील, मात्र व्यवहार करताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घ्यावा.

कर्क - छोटे-मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. मात्र प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. साहित्यिक व पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस आहे. यश येईल.

सिंह - कुटुंबामध्ये धार्मिक कार्य असेल. त्याच्यामध्ये आपण पण व्यस्त रहाल. घरामधील पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात आनंद वाटेल. कामाचे नियोजन केल्यामुळे कामे सुरळीत व्यवस्थित होतील.

कन्या - नोकरी व्यवसायातून आपणास सावध राहावे लागणार आहे. आपणावर क्रिया-प्रतिक्रिया होण्याची शक्यता आहे, मन मात्र शांत ठेवा. आपले निर्णय बरोबर आहे हे आपणास ठाऊक आहे.

तुळ - खाजगी नोकरी करणाऱ्यांना कामामध्ये कामाची प्रशंसा होणार आहे. त्यामुळे कामाला उत्साह येणार आहे. यामुळे आपणास काही जास्तीची कामे पण करावे लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी मिळणार आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. कामामध्ये काही अडचणी असल्यास त्या सहजतेने सोडवाल. घरातील वरिष्ठ व्यक्तींची वाद घालू नका.

धनु - एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये बाजी मारून जाल. कलाकारांचा भाग्योदय होईल. वास्तु विषयी काही कटकटी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, सहजतेने सुटतील.

मकर -आजचा दिवस जास्त चांगला जाणार आहे. आपला उत्साहाचे वातावरणात अतिशय चांगले राहील. काही धार्मिक कृत्य कराल, त्यामुळे मानसिक शांतता लाभेल.

कुंभ - आज जास्त धावपळ करू नका. घरात शांत रहा. व्यावसायिकांना दिलासा देणारा दिवस आहे. छोट्या-मोठ्या अपघातापासून सुरक्षित रहा. गुंतवणुकी मधून लाभ मिळतील.

मीन - नोकरदारांना अतिशय चांगला दिवस आहे. तरुणांना शिक्षण नोकरी आणि विवाह या घटनेतून मोठे चांगले लाभ होऊ शकतात. व्यवसायिकांना उत्तम पर्याय मिळतील.

logo
marathi.freepressjournal.in