आजचे राशिभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 16, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - कामामध्ये बदल होऊ शकतात. जोडीदाराची साथ चांगली राहील. मुलांना यश मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. प्रवास मात्र टाळा सौख्यात वाढ होईल.

वृषभ - नोकरी व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहील. मुलांना समजून घ्या, त्यांना योग्य तो सल्ला द्या, त्यांची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, प्रवास शक्यतो टाळा.

मिथुन - व्यापार-व्यवसाय कडे थोडे जास्तच लक्ष द्यावे लागेल. मोठे निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. जरूर पडली तर तज्ञांचा सल्ला घ्या.

कर्क - नोकरी मध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता, कामाचा ताण वाढेल. प्रवास शक्यतो टाळा. तब्येतीला जपणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

सिंह - कामाचे नियोजन करण्यासाठी वेळ द्या. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती राहिल. सुखसोयी मिळतील. व्यापार-व्यवसायात योजलेले कामे व्यवस्थित पार पडतील.

कन्या -आज तुमचे मन थोडे अस्थिर राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल, नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती आर्थिक असेल. आवक चांगली राहणार आहे.

तुळ - मन प्रसन्न राहील जोडीदाराशी सामान्‍य संबंध राहतील. व्यवसायात चांगलीच आघाडी घ्याल ,यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, खर्च मात्र जपून करा.

वृश्चिक - स्वतःच्या कामांसाठी खूप धावपळ करावी लागेल. काही कामे मात्र अर्धवट होण्याची शक्यता आहे. आपले अंदाज बरोबर येतील.

धनु - विद्यार्थ्यांना नवीन शिक्षणाच्या संधी मिळतील. आजचा दिवस प्रवाही राहणार आहे. नोकरी व्यवसायातून लाभ मिळणार आहे. कायदेशीर बाबी मात्र सांभाळा.

मकर - गृहसौख्य चांगले लाभेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. व्यवसायामध्ये सामान्य परिस्थिती राहील.

कुंभ - भावंडांशी सुसंवाद होतील. यांच्याशी संपर्क साधल्याने मन आनंदित राहील .नोकरी व्यवसायातील परिस्थिती चांगली असेल. तुमचे व्यवसायात नोकरीमध्ये वर्चस्व असेल.

मीन - आज जास्त लांबचे प्रवास करू नका. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. वारसा हक्काच्या प्रॉपर्टीचे व्यवहार करताना तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in