मेष - राहत्या घरासाठी खर्च होऊ शकतो. महत्त्वाची कामे होतील. कलागुण व छंदातून उत्पन्न मिळवू शकाल. नोकरीविषयक कामे होतील. आत्मविश्वासात वाढ होऊन प्रतिष्ठित व्यक्ती सहवासात येतील.
वृषभ - नवीन संधी मिळतील तसेच अनुकूल ग्रहमानाचा लाभ मिळेल. काहींना धनलाभ होईल. प्रवासाचे योग. विद्यार्थी आपले करियर घडवू शकतील. घरात मंगल कार्याचे योग घटित होत आहेत.
मिथुन - तरुण-तरुणींचा भाग्योदय होईल. आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी चालून येईल जुने मित्र भेटतील घरातील वातावरण आनंदी व उत्साही राहील. महत्त्वाचा कामात यश संपादित कराल.
कर्क - मनातील शंका दूर होऊन महत्वाची कामे होतील. नोकरीत प्रसन्नता लाभेल. विशिष्ट आर्थिक संकट दूर होईल. विद्यार्थ्यांना ज्येष्ठांचे तसेच गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. यशाचा मार्ग सुलभ होईल.
सिंह - नियोजना वर भर दिल्यास अपेक्षित कामे होतील. नोकरदारांना वरिष्ठांशी जुळवून घेणे यासाठी प्रयत्न करावे लागतील कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठीभेटी होती.
कन्या - ग्रहांची साथ मिळाल्याने या दिवशी आपणास यश मिळू शकेल नोकरदारांना दिलासा मिळेल कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा कोणालाही जामीन राहू नका.
तुळ - एकूण परिस्थिती वर योग्य नियंत्रण ठेवल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील नोकरदारांना चांगली बातमी मिळेल कलाक्षेत्रात प्रोत्साहन मिळेल बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.
वृश्चिक - शांतता व संयम पाळणे इच्छित गोष्टी साध्य होऊ शकतात आपला इतरांवर प्रभाव पडू शकेल मित्रमंडळींच्या तसेच आप्तेष्टांच्या गाठीभेटी ने आनंद होईल जोडीदाराची साथ मिळेल.
धनु - ठाकूर मालमत्तेचे तसेच वडिलोपार्जित संपत्ती बद्दलचे वाद-विवाद शमतील खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल प्रकृतीकडे वेळीच लक्ष द्या खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. पोटाच्या तक्रारी संभवतात.
मकर - काही नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील नव्या मित्रांचा सहवास लाभेल कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या मुलांच्या भवितव्याचा संबंधी चांगल्या घटना घटित होऊ शकतात.
कुंभ - कुटुंबात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील नोकरदारांना नवीन कामे मिळतील जबाबदाऱ्या वाढतील वेळ व पैशांचा सदुपयोग करा पती-पत्नी मधील वाद विकोपास जाऊ देऊ नका.
मीन - अकारण चिंता टाळा. व्यवसायात कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा वाद-विवाद भांडणे टाळा कुटुंबात विवाह सारखे कार्य घडू शकते.