आजचे राशिभविष्य, १७ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 17, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस
आजचे राशिभविष्य, १७ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष : कमी कष्टामध्ये कार्यसिद्धी होणार आहे. महत्त्वाच्या कामांना आज तुम्ही प्राधान्य देणार आहात. व्यापार-व्यावसायिकांचे आलेले मळभ दूर होणार आहेत. व्यापार वाढणार आहे.

वृषभ : आपल्या मनातील काही शंका दूर होणार आहेत. मनातील स्वप्न सत्यात येण्याची शक्यता आहे.आपल्या कार्यक्षेत्रामधील धोक्याचे वळण पार पडणार आहे.

मिथुन : नवीन शाखा सुरू करायची असल्यास आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. नोकरी-व्यवसायात छोट्या-मोठ्या कटकटी समोर येतील. थोडेफार आर्थिक संकट येऊ शकते, जीवनसाथी मदत करेल.

कर्क : शुभ ग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी आज अत्यंत चांगले आहे. व्यापार- व्यवसायाच्या वाढीच्या योजना जर आपण अंमलात आणणार असाल तर आजचा दिवस आपल्याला चांगला आहे.

सिंह : नोकरचाकरांचा सहयोग आपणास फारसा लाभणार नाही. आज आपणास कळेल स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. कामाचे नियोजन करा. त्यामुळे फारसा त्रास होणार नाही.

कन्या : आज आपणास मोठा आनंदाचा दिवस असणार आहे. कामात नवीन संधी येणार आहे. बरेच दिवस पहात असलेले स्वप्न साकारण्याचे दिवस आहे. लेखक, कवी यांना आजचा दिवस लाभदायक असणार आहे.

तुळ : आज आपल्या कार्यक्षेत्रात एक करिअरचा पाथ पकडून देणार आहे. आपल्यासमोर नवनवीन संधी असल्या तरी घरातील कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. वारसा हक्काच्या मालमत्तेविषयी निर्णय होतील.

वृश्चिक : आपल्या कामामध्ये प्रगती होणार आहे. नोकरीच्या मुलाखतीस आपणास यश येणार आहे. परदेशातून शुभ समाचार येण्याची शक्यता आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभू शकते. प्रवासाची शक्यता.

धनु : पैशांसंबंधीचे पुष्कळ प्रश्न सुटणार आहेत. उधारी वसूल करू शकता. नोकरदारांना आजचा दिवस चांगला आहे. मानसिक चिंता संपणार आहे. कार्यक्षेत्रात अधिक फायदा मिळेल.

मकर : आपल्यामध्ये फारसा उत्साह नसणार आहे. नवनवीन कार्य समोर दिसतील, पण त्याचा फायदा घेऊ शकणार नाही. आपणामध्ये आत्मविश्वास वाढवावा लागणार आहे. विचारपूर्वक कामे करा.

कुंभ : अपरिचित व्यक्तींशी कुठलाही व्यवहार नको. नुकसान होण्याची शक्यता आहे. रेंगाळलेली खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत. अध्यात्मामध्ये मन रमणार आहे. पूजाअर्चा होऊ शकते.

मीन : व्यापार-व्यवसायांमध्ये मोठा लाभ होणार आहेत. तरुण-तरुणींना शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये कोणीतरी गॉडफादर मिळण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in