आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 19, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला अपेक्षित असलेले परदेशातून संदेश येतील.

वृषभ - दैनंदिन कामे सातत्याने पूर्ण करावी लागणार आहेत. मानसिक तणाव किंवा प्रकृती अस्वस्थ यामुळे काम करण्यास उत्साह नसेल. एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे.

मिथुन - आजचा दिवस आपल्याला सावधतेने घालवावा लागणार आहे. आपला कामाचा वेग चांगला राहणार आहे. आर्थिक व्यवहार होतील, मात्र दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवू नका.

कर्क - नवीन कामे मिळतील, पण त्याचा पूर्णपणे आधी आपण अभ्यास करून घ्यावा. अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, चिकाटी आणि सातत्य यांनी तुमची काम व्यवस्थित होतील.

सिंह - नवीन नवीन उपक्रम राबवाल. नवीन नवीन काम करण्यासाठी उत्साह राहणार आहे. आर्थिक व्यवहार चांगले होतील. करारमदार पण चांगले झाल्यामुळे आपल्याला लाभ होणार आहेत.

कन्या - आजचे ग्रह मान आपणासाठी अनुकूल आहे. सर्व दृष्टिकोनातून आपल्याला फायदेशीर होणार आहे. घरातील मोठे प्रश्न किंवा चिंता दूर करण्याचा मार्ग सापडतील.

तुळ - जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील, किंवा फोनवरून संपर्क साधला जाईल. छोटे-मोठे जे गैरसमज झाले आहेत ते दूर कराल. संपूर्ण मळभ दूर झाल्यामुळे दोघांनाही आनंद वाटेल.

वृश्चिक - आर्थिक विवंचना दूर होतील. शांत व तणावमुक्त रहाल. काम वेळेवर पूर्ण होतील कुठल्याही प्रकारची घाई गर्दी करू नका. आपल्या योग्य हालचाली होतील.

धनु - मरगळ दूर होईल उत्साहाने आनंदाने कामाला लागा. नवीन प्रस्ताव समोर येतील. कामात अडचणी आल्या तरी त्या योग्य तऱ्हने सोडवा. व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडणार आहे.

मकर - आपल्यासमोर मोठे प्रस्ताव येणार आहे. व्यापार व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आपणास गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यासाठी आपणास कर्ज हवे असल्यास ते मिळेल.

कुंभ - आपल्या कामांमध्ये चांगली प्रगती कराल. आपल्या अधिकाराचा वापर योग्य तर्हने करून घ्या. आर्थिक व्यवहार मनासारखे होतील. आपल्या सहकाऱ्यांचा पण लाभ करून द्याल.

मीन - महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागेल. कोणत्याही कामामध्ये घाई गर्दी करू नका नीट आणि शांतपणे कामे करा. कामे व्यवस्थित होतील.

logo
marathi.freepressjournal.in