आजचे राशिभविष्य, १८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 18, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस
आजचे राशिभविष्य, १८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष : अचानक घडणाऱ्या गोष्टींकडे चांगल्याप्रकारे सामोरे जाल.घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.नवीन नोकरी चांगले चमकाल. व्यापार व्यवसायात चांगली प्रगती कराल. सकारात्मक विचार असतील.

वृषभ : आर्थिक आवक मनासारखी राहणार आहे. विविध मार्गांनी यश येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वरचष्मा राहणार आहे. आनंदी घटना घडणार आहेत.थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार आहे.

मिथुन : मानसिक त्रास करून घेऊ नका.इतरांच्या विरोधी मत प्रदर्शन करू नका.व्यसना पासून दूर राहणे फार आवश्यक आहे.चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा.आर्थिक ताण कमी होणार आहे.

कर्क : विशेष योगातून नवी क्षितिजे दिसून येतील.नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.दगदग रहाण्याची शक्यता आहे.आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभणार आहे.

सिंह : व्यवसायामध्ये थोडे चढ-उतार चालू राहतील काही अंदाज चुकणार आहे घरात नवीन वस्तूंची खरेदी विचारपूर्वक करा.स्वतःच्या विचार बुद्धीने आणि आत्मविश्वासाने आपल्या कार्यामध्ये निर्णय घ्या.

कन्या :आपले काही अंदाज बरोबर येणार आहे. मुलांच्या यशामुळे आनंद वाटणार आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहे. जोडीदाराची साथ चांगली राहणार आहे.

तुळ : आनंददायक दिवस जाणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायामध्ये चांगले यश येणार आहे. भरभराट होईल भावंडांची थोडे वाद-विवाद होण्याची शक्यता. घरामध्ये गैरसमज होऊन देऊ नका.

वृश्चिक : भावंडांची मधुर संबंध राहतील.मन प्रसन्न असणार आहे. तणाव कमी होतील. काळजी दूर होणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. भरभराट होण्याचे योग आहे . एखादी चांगली बातमी समजेल.

धनु : घरातले वातावरण अतिशय चांगले असणार आहे.वडिलोपार्जित संपत्ती चे काम काज मार्गी लागेल. नोकरीतील तणाव कमी होणार आहे. नवीन कामे सुरू होतील. मनासारखे खाणेपिणे होणार आहे.

मकर : आपले मन स्थिर ठेवण्याची गरज आहे.इतरांशी थोड्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे.आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.जास्त दगदग करू नका.विश्रांती घेणे जरुरी आहे.

कुंभ : मनात हुरहूर वाटणार आहे. मानसिकता नीट ठेवणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायामध्ये अडचणींना सामोरे जावे लागणार आहे .महत्वाचे निर्णय पुढे ढकलावे .मोठी गुंतवणूक टाळावी .

मीन : कार्यक्षेत्रातील अंदाज बरोबर येतील. नवीन उद्योगात चांगली भरभराट होण्याची शक्यता आहे. मनावरील सर्व ताण निघून जाणार आहे.आर्थिक आवक चांगली असणार आहे.मौज मजेत दिवस घालवाल.

logo
marathi.freepressjournal.in