आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, २० ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 20, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
Published on

मेष - आपल्या महत्वाच्या कामांना क्रमवारी द्या, त्याप्रमाणे कार्य करा. कुठल्याही कामाला विलंब होत नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कामाचा वेग वाढणार आहे.

वृषभ - आपणास भरपूर काम आहे मनाची तशी तयारी ठेवा, मात्र काम करताना मन शांत राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नाहीतर कामामध्ये चुका होऊ शकतील.

मिथुन - आपणास आजचे ग्रहमान चांगले आहे दैनंदिन व्यवहार चालू राहतील .आर्थिक व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे होतील. काम जास्त असल्यामुळे जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल.

कर्क - आजचा आपला दिवस नोकरदारांसाठी खूपच चांगला आहे. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होणार आहे. जास्त काम पडले तरी त्याचा थकवा आपणास जाणवणार नाही.

सिंह - मुलांमधील संवाद चांगला होणार आहे. आपले मार्गदर्शन मुलांना चांगले लाभणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामांमध्ये शिक्षण किंवा खेळामध्ये प्रगती होईल.

कन्या - आपले कार्य करताना आपला मार्ग बरोबर आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः व्यापार व्यवसायासाठी घरातील व्यक्तींचा सल्ला आपणास उपयोगी पडणार आहे.

तुळ - उद्योग व्यवसायासाठी केलेले संवाद दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकतात. खाजगी घडामोडी तुमच्या पूर्ण नियंत्रणाखाली असतील.

वृश्चिक - आर्थिक उलाढालीचे नियोजन आपण आज करा. काही येणी असतील तर ती येतील. घरातल्या काही प्रश्नांसाठी कुटुंबियांशी चर्चा करा.

धनु -आपली वैचारिक पातळी चांगली असेल. त्यामुळे नाते व संबंध सुधारणार आहे.अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुमच्याकडे अधिक असेल.

मकर - ज्या व्यक्तीवर आपला पूर्ण विश्वास आहे त्या व्यक्तीला पारखून बघणे महत्त्वाचे आहे, कारण ती व्यक्ती आपणास पूर्ण सत्य सांगेलच असे नाही.

कुंभ - आपल्या कामांमध्ये योग्य व विश्वासपात्र व्यक्तीचासल्ला मोलाचा ठरणार आहे .कामातल्या अडचणी आपोआपच दूर होतील. त्यामुळे कामे सुरळीत होणार आहेत.

मीन - आपली कामातली मेहनत सफल होणार आहे. केलेल्या कामाचे श्रेय आपणास मिळणार आहे. महत्त्वाच्या कामातील समस्यांवर आपण योग्य मार्ग काढाल.

logo
marathi.freepressjournal.in