मेष - काहींना कामाचा ताण जाणवेल दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावी कुठलेही कामाला कमी लेखू नका नवीन मान्यवरांच्या ओळखी होतील गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.
वृषभ - व्यवसाय व नोकरीत निरनिराळ्या मार्गाने धनागमन होईल. साहित्यिक व कलाकार यांना नवीन कामे मिळून नावलौकिकात भर पडेल. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये. वैचारिक प्रगती होईल.
मिथुन - व्यवसाय धंद्यात प्रगती होईल कुटुंबात उत्तम वेळ जाईल नवीन काहीतरी खरेदी कराल झटपट निर्णय घेऊ नका धार्मिक व सामाजिक कार्यात रस वाढून मन अध्यात्मिकतिकडे वळेल.
कर्क - आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवावा कोणतेही लहान-मोठे निर्णय घाईगर्दीत घेऊ नका तसेच इतरांच्या गोड बोलण्याला हसू नका अल्पपरिचित व्यक्तींना दूर ठेवा अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करता येतील.
सिंह - सामाजिक मानसन्मान मिळून एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमात मानाचे स्थान मिळवाल आपली मते इतरांना पटतील मोठे लाभ मिळण्याची शक्यता प्रलंबित कामे गतीमान होतील घरामध्ये खरेदी होईल.
कन्या - प्रेमप्रकरणात सफलता मिळेल जीवनसाथीच्या नात्यात मधुरता राहील कुटुंबातील किरकोळ वाद-विवाद यांच्याकडे दुर्लक्ष करा कुटुंबातील शांतता टिकवून ठेवा व्यवसायातील परिस्थिती समाधान कारक राहील.
तुळ - जीवनसाथी बरोबर संबंध सुधारतील नातेसंबंध अधिक दृढ होतील तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल काहींच्या मनावर थोडे दडपण राहू शकते नोकरीतील परिस्थिती चांगली राहील आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल.
वृश्चिक - नोकरी व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज वादविवादाचे प्रसंग उभे राहू शकतात शांत राहणे व निर्णय घेणे हितकारक ठरेल आर्थिक आवक चांगली राहील निर्णय अचूक ठरतील.
धनु - कुटुंबात तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या नोकरीत वरिष्ठांचे व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळण्यास विशेष प्रयत्न करावे लागतील काही वेळेस संवाद उपयोगी पडेल.
मकर - व्यवसाय धंद्यातील अंदाज चुकू शकतात सावधपणे व्यवहार करावेत आरोग्याकडे लक्ष देणे हितकारक राहील संसर्गापासून सावध रहा प्रवासात आपल्या चीज वस्तूंकडे लक्ष ठेवा.
कुंभ - नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील कामाच्या स्वरूपात बदल घडू शकतो त्याचप्रमाणे स्थानबदलाची शक्यता सरकारी नोकरी अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो उत्पन्न वृद्धीची शक्यता.
मीन - आर्थिक एक परिस्थिती चांगली राहील महत्त्वाची कामे पुढे ढकलाबित. दगदग आणि धावपळ होईल प्रवास टाळलेले बरे जोडीदाराशी वाद-विवाद संभवतो. भावंडांचे सहकार्य मिळेल.