आजचे राशिभविष्य, २३ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 23, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा
आजचे राशिभविष्य, २३ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्याल महत्त्वाचे निकाल लागतील.महत्त्वाची कामे होतील सामाजिक कार्यात रस घ्याल कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृषभ - आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे नवीन तिचा संबंध निर्माण होतील नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधान कारक राहील.

मिथुन -अध्यात्माकडे कल राहील एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल व्यवसाय धंद्या मध्ये अथवा नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.

कर्क - अनेक दिवसांनी जुने मित्र भेटल्यामुळे आनंद होईल व्यवसायिक जुने संबंध नव्याने निर्माण होतील घरातील वातावरण समाधानकारक राहील कुटुंबात मुलांकडून सुखद वार्ता मिळतील.

सिंह - निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होईल महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील महत्त्वाच्या गाठीभेटी होतील राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. एखाद्या महत्त्वाच्या समारंभास उपस्थित राहाल.

कन्या - सरकारी कामांना वेळ लागू शकतो नोकरीत समाधानकारक स्थिती राहील संतती सौख्य लाभेल जीवन साथी चे सहकार्य लाभेल आपला इतरांवर प्रभाव राहील.

तुळ - व्यवसायात नव्या संकल्पना व नवीन तंत्रज्ञान वापरून व्यवसाय एका विशिष्ट उंचीवर येऊन ठेवण्यातयशस्वी व्हाल. व्यवसायिक जुनी येणी वसूल झाल्यामुळे अर्थमान उंचावेल.

वृश्चिक -दीर्घकालीन प्रलंबित असलेली अवघड कामे होतील वाहने सावकाश चालवा अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो वाहतुकीचे नियम पाळणे हिताचे ठरेल. दैवी चमत्कारांचा अनुभव येईल.

धनु - कुटुंबात आनंददायक घटना घडतील कुटुंबातील मुला मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वाढता मिळतील पाहुणे मंडळींचे आगमन होऊ शकते धार्मिक किंवा सामाजिक कार्यात भाग घ्याल.

मकर - आयत्या वेळेस कामात बदल झाल्यामुळे धावपळ करावी लागेल खर्चामध्ये वाढ होऊ शकते पण खर्च चांगल्या कामासाठी होईल एखादी महत्त्वाची वाढता समजेल.

कुंभ - आरोग्य उत्तम राहील दैनंदिन कामे मार्गी लागतील जिद्द आणि चिकाटीने आपल्या समोरील कामे पूर्ण कराल अचानक धनलाभ होण्याची शक्यता. प्रवासाचे योग.

मीन - कामाचा ताण व दगदग जाणवेल मानसिक अस्वस्थता सुद्धा जाणवेल रागावर नियंत्रण ठेवा तसेच कुटुंबात व कार्यस्थळी वाद-विवाद नको. कुसंगती टाळा. नवीन नियोजन कराल.

logo
marathi.freepressjournal.in