आजचे राशिभविष्य, २४ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 24, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस
आजचे राशिभविष्य, २४ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - समाजातील मान्यवर व्यक्तींच्या भेटीमुळे दिवस साजरा होईल आपल्या स्वप्नांमध्ये रमून जाल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल मनासारख्या घटना घडतील.

वृषभ - प्रेमात यश संपादित करू शकाल संतती सौख्य लाभेल आर्थिक लाभ होतील आपला इतरांवर प्रभाव राहील व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन - आरोग्य उत्तम राहील लहान-मोठ्या प्रवासाचे योग, प्रवास कार्यसिद्धी होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निवड होईल.

कर्क - आज संमिश्र फळे मिळतील .कोणत्याही स्वरूपातील अतिरेक टाळावा वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण हवे तसेच कुटुंबात व मित्रमंडळींच्या वर्तुळात वाद-विवाद टाळावा.

सिंह - समाजातील थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ मिळेल काहींना वास्तु योग. व्यवसायिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये राजकारणापासून अलिप्तरहा.

कन्या - विवाह ठरण्यासाठी मधील अडचणी दूर होतील कुटुंबातील तरुण-तरुणींच्या कडून मनाला समाधान देणाऱ्या बातम्या मिळतील संतती सौख्य लाभेल

तुळ - मुर्खांच्या नंदनवनात रमू नका व्यवसायातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाणात वाढ झालेली दिसेल स्पर्धकांवर मात कराल अपघातापासून जपा. काळजी घेतलेली हितकारक राहील.

वृश्चिक - कौटुंबिक आघाडीवर अप्रिय घटना घडण्याची शक्यता. मुला मुलींकडून काही चिंताक्रांत करणाऱ्या वार्ता समजतील मात्र व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील.

धनु - स्वतःच्या मालकीचे घराचे स्वप्न पूर्ण होईल त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यशस्वी होतील पैशांची सोय होईल कौटुंबिक वातावरण उत्तम राहील चांगल्या वार्ता समजतील.

मकर - काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील त्यात काही वेळेस अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे पण त्यातून मार्ग निघू शकतो कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल

कुंभ - आपल्या समोरील कामांमध्ये कार्यमग्न राहाल कलाकार व साहित्य क्षेत्रातील मंडळींना यश आणि प्रसिद्धी मिळेल नोकरीमध्ये वरिष्ठांशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा.

मीन - नशिबाची साथ मिळाल्याने यशाची वाटचाल करणे सुलभ होईल विरोधकांवर विजय मिळवाल येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढलंएखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होता येईल.

logo
marathi.freepressjournal.in