आजचे राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 27, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - महत्त्वाचे निर्णय होऊन कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल प्रगती होईल कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये खर्चावर नियंत्रण आवश्यक प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील.

वृषभ - वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर वेळ मजेत जाईल प्रवासाचे योग प्रवास कार्य सिद्ध होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

मिथुन - आप्तेष्ट नातेवाईक जुने मित्र करतील वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळलेले बरे हाती घेतलेल्या कामात सफलता लाभेल नोकरीत व्यवसायात सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.

कर्क - आपल्या कार्यात अधिक लक्ष दिल्यास कार्य लवकर होऊन सुलभता येईल. अनावश्यक खर्च तळा बोलण्यापेक्षा कृतीवर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे.

सिंह - महत्त्वाची वार्ता समजेल शासकीय कामात यश मिळेल नोकरीत वर्चस्व वाढून वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

कन्या - कामाचा ताण जाणवेल वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते धावपळ करावी लागेल पण महत्त्वाची कामे होतील आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या कुटुंबातून सहकार्य लाभेल.

तुळ - पारिवारिक समस्या सोडविता येतील विद्यार्थी वर्गाला त्यांच्या परिश्रमाचे योग्य मूल्य मिळेल जुन्या मित्रमंडळींच्या भेटीमध्ये रमाल आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.

वृश्चिक - वाहने चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण असणे गरजेचे राहील त्याचप्रमाणे व्यवसायात यंत्रसामुग्री व कामगार याविषयीचे प्रश्न होऊ शकतात.

धनु - स्वप्नरंजनात रमू नका प्रत्यक्षातील परिस्थिती चे विचारपूर्वक अवलोकन करून निर्णय घ्या आजचे काम उद्यावर ढकलणे नुकसानकारक ठरू शकते.

मकर - लहान मोठ्या कार्यासाठी प्रवास करावा लागेल प्रवासात काळजी घेणे जरुरीचे अतिआत्मविश्वास घात करू शकतो परंतु गुणांना योग्य प्रतिसाद मिळेल.

कुंभ - बौद्धिक क्षेत्रातील काम करणाऱ्या जातकांसाठी अनुकूल दिवस. भागीदारी व्यवसायात भागीदार बरोबर मतभेद होण्याची शक्यता असल्याने वाद-विवाद टाळणेहिताचे ठरेल.

मीन - आपल्या कार्यात समाजातील अथवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळेल मोठ्या माणसांचे आशीर्वाद लागतील कामे मार्गी लावू शकाल.

logo
marathi.freepressjournal.in