मेष - महत्त्वाच्या कामांना चालना मिळाल्यामुळे उत्साह आणि हुरूप वाढेल महत्वाची माणसे तसेच नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील मनावरील ताण नाहीसा होईल. व्यवसायिक नफा वाढेल.
वृषभ - सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. लोकसंग्रह वाढेल नवीन ओळखी होतील. महत्त्वाची कामे होण्यातील अडथळे दूर होतील. कार्यक्षेत्रात सहकार्य मिळेल आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मिथुन - नोकरीत व्यवसायात जबाबदार्या वाढतील सरकारी नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपविले जाण्याची शक्यता नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तशी संधी मिळू शकते.
कर्क - जनमानसात सुसंवाद राहील.सकारात्मक विचार राहतील उत्साहवर्धक घटना घटी होतील भाग्याची चांगली साथ राहील काहींना प्रवास करावा लागेल प्रवास आरामशीर होतील.
सिंह - महत्वाची कामे होतील बऱ्याच दिवसांपासून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतातकागदपत्रांची पूर्तता करताना खबरदारी घ्या थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे.
कन्या - लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. काहींना देवदर्शनाचा योग येईल जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल नात्यात गोडवा राहील प्रेमप्रकरणात यश मिळेल.
तुळ - अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साहवाढेल महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होऊन ती कामे पूर्ण होतील. भाग्याची साथ मिळेल काहींना जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.
वृश्चिक - तरुण-तरुणींना अपेक्षीत संधी मिळतील विवाह सारख्या कार्य मधील अडथळे दूर होतील विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल नोकरीत बढती मिळू शकते.
धनु - नोकरीत वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल. सहकाऱ्यांबरोबर आपुलकीने वागलेले बरे राहील.कामाचा ताण जाणवेल स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
मकर - अनुकूल दिवस आहे त्याचा फायदा घ्या नकारात्मकता झटकून कामाला लागा नोकरी चांगली परिस्थिती असेल व्यवसायात विक्री वाढवून लागण्याचे प्रमाण उत्तम राहील.
कुंभ - आर्थिक बाजू बळकट राहील विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल नोकरीत परिस्थिती अनुकूल राहून सहकार्यांचे सहकार्य मिळेल. मनाला आनंद देणाऱ्या वार्ता कानी येतील. संयम बाळगा.
मीन - कुटुंबातील मुला मुलीं बरोबर सुसंवाद साधा त्यांचे प्रश्न समजून घ्या ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा नोकरीच्या ठिकाणी दगदग होऊ शकते तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. भेटीगाठी होतील.