मेष - कुटुंबात आपल्या मतास प्राधान्य दिले जाईल मान मिळेल. मंगल कार्य ठरतील. नोकरीच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल मात्र व्यवसायात काही महत्त्वाची कामे निघतील.
वृषभ - महत्वाच्या बातम्या समजतील बाहेरील कामात संतुलन साधत काम पूर्ण कराल कुटुंबातील वातावरण चांगले राहील जीवन साथी चे सहकार्य अपेक्षेनुसार मिळेल.
मिथुन - शैक्षणिक क्षेत्रातील जातकांना उत्तम कालावधी. प्रगती करू शकाल चांगले वाचन होईल साहित्यक्षेत्रातील जातकांना मानसन्मान मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होईल.
कर्क - महत्वाचे निरोप मिळतील हाती घेतलेली महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील दगदग होईल अशी कामे करू नका आपल्याला झेपतील तेवढीच कामे करा.
सिंह - नोकरीत कुटुंबात कार्यस्थळी महत्त्वाच्या विषयात तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल तुमचे महत्त्व वाढेल तुमच्या कामाची कदर केली जाईल जोडीदाराशी चांगले संबंध राहतील.
कन्या - ठरलेल्या नियोजनात आयत्या वेळेस बदल करावा लागेल काही अडचणी येण्याची शक्यता आहे त्यात वेळ जाऊ शकतो. नोकरीत मनासारख्या घटना घडतील.
तुळ - व्यवसाय-धंद्यात नोकरीतआपले अंदाज बरोबर ठरल्यामुळे आपले महत्त्व वाढेल कुटुंबातील मुलांना यश त्यामुळे घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील.
वृश्चिक - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.साहसी व पराक्रमी वृत्ती दिसेल. व्यवसायात फायद्याचे सौदे हाती येतील.नोकरीत सर्व-सामान्य परिस्तिथी राहील. भागीदारी च्या व्यवसायात मतभेद टाळा.
धनू - सामाजिक-धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. एखाद्या समारंभात महत्वपूर्ण पद भूषवाल. कोटुंबिक परिस्तिथी आनंदी राहील. मित्र-मंडळींचे सहकार्य लाभेल.
मकर - हाताखालील मंडळींचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. मुला-मुलींच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणे क्रमप्राप्त ठरेल. काही वेळेस अचानक खर्चाच्या बाबी पुढे आल्यामुळे खर्च करावा लागेल.
कुंभ - नोकरी मध्ये कामाचे स्वरूप बदलू शकते तसेच स्थान बदल सुद्धा घडू शकतो बाबदार्या वाढतील. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपवला जाऊ शकतो.
मीन - अपेक्षित कामे होतील आर्थिक चिंता कमी होईल. घरात आनंदी वातावरण राहून घरातील मुला मुलींकडून त्यांच्या प्रगतीबाबत वार्ता कानी आल्यामुळे समाधानी रहाल.