मेष - घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्वाच्या निर्णयांमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या तो आपणास फार उपयोगी पडणार आहे.
वृषभ - लहान भावंडांना मदत करावी लागेल त्यामुळे घरामध्ये छोटी मोठी वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन उत्तम असेल.
मिथुन -खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे खूपच आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा, उत्पन्न कमी खर्च वाढेल अशी स्थिती होऊ देऊ नका.
कर्क - व्यवहार करताना भावानेचा विचार करू नका.आर्थिक नुकसान होईल नंतर वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाही. महत्त्वाची कामे सहजतेने करा ती यशस्वी होतील.
सिंह - प्रवासाचे योग आहे हे महत्त्वाचे व्यवहार करताना नीट विचार करा नियम व अटी पाळून मगच व्यवहार करा.गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट पहा मगच सही करा.
कन्या -आर्थिक बाजू बळकट राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिक खर्च होणार आहे. जोडीदाराचे ऐकावे लागेल. मुलांना तुमचा आधार वाटेल, घरामध्ये वातावरण आनंदी असेल.
तुळ - नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल प्रवास करताना सांभाळून करा महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिल्यास ती लवकर होतील.
वृश्चिक - निरनिराळी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल ती सहजरीत्या मार्गी होतील. व्यवसायिकांच्या व्यवसाय चांगल्या प्रकारे होईल.
धनु - कितीही मोठा फायदा मिळणार असला तरी नियम अटी पाळून हाच व्यवहार करा. नंतर त्रास होऊ शकतो, त्यासाठी मनोबल वाढवावे लागेल आत्मविश्वासपूर्वक काम करा.
मकर - समाजसेवा करण्यास खूप वेळ द्यावा लागेल, त्यामुळे स्वतःची कामे राहणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात प्रतिस्पर्धी सुरज निर्माण करण्याची शक्यता आहे.
कुंभ - कामानिमित्त खूप धावपळ करावी लागेल, दगदग होणार आहे. कामे खूप कष्टपूर्वक पूर्ण करावी लागतील आपल्याला आज थकवा जाणवणार आहे. प्रॉपर्टीच्या कामांकडे लक्ष द्यावे लागेल.
मीन - धार्मिक कार्यासाठी प्रवास होऊ शकतो. महत्वाचे कामाचे नियोजन चांगले होईल. कामे सहजतेने होतील. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहयोग मिळेल प्रतिष्ठा प्राप्त होईल.