नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मिथुन रास

परिस्थितीचे भान ठेवा

मिथुन रास असलेल्या व्यक्तींमध्ये बोलकेपणा हा विशेष गुण आहे. विद्वान, विद्यारासंगी, पाठांतर करण्याची शक्ती विशेष असते. त्यामुळे लवकर लक्षात राहते. पाठांतर होणे हे विशेष गुण आहेत. शास्त्री, पंडित, वक्ता, बुद्धिमान, कवी, बुद्धिजीवी, ग्रंथकार, अशी विशेष आवड असते. प्रिय भाषण करणारे, प्रेमळ वर्तणूक असते, ललित कला संपन्न असतात, बहुदा खरे बोलणारे असतात, चिकाटी व निश्चय कमी असतो. स्त्रियांची अभिलाषा असते, स्वरूपवान चेहरा, हनवटीच्या भागाकडे निमित असतो. शरीर सडपातळ असते, वृद्धावस्थेमध्ये पोक येण्याची शक्यता असते. जास्त जेवणाची आवड असते. डोळे तांबूस असतात, इत्यादी वैशिष्ट्ये मिथुन राशींच्या व्यक्तींमध्ये आढळतात.

शिक्षण :- स्वतःच्या बुद्धीचातुर्यान शिक्षणात यश मिळवता येईल. काही वेळेस स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावी लागतील. योग्य प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रयत्न यशस्वी होतील. शिक्षणात लागणारा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. परदेशसंबंधी शिक्षणातही आपणास स्वतःच्या ध्येय व आत्मविश्वासानेच यश मिळणार आहे हे लक्षात ठेवणे जरुरी आहे. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल. कुसंगत टाळावी.

पारिवारिक :- आपल्या परिवारातील सदस्यांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या. आरामदायी, छानछौकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक बचत होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. कुटुंबात शांतता व समाधान राहण्यासाठी, तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. त्यातून चांगले परिणाम प्राप्त होतील. एकूणच घरातील वातावरण उत्साही व आनंदी राहील. अध्यात्मिक व धार्मिक बाबींकडे विशेष लक्ष द्याल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या महिन्यातील ग्रहमान संमिश्र असल्यामुळे कधी ऊन, तर कधी सावली असा अनुभव येऊ शकतो. वास्तविक परिस्थितीचे भान ठेवून आपले कार्य पूर्ण करा. काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. पूर्वार्धात नोकरीमध्ये मात्र अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली दिसेल. अपेक्षित घटना घडतील. नोकरीतील कामांमध्ये कार्यमग्न राहाल. परिणामतः त्याचे फळ सुद्धा मिळेल. जास्त वेळ द्यावा लागेल. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. परंतु शिस्त पाळा. वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या. त्याचप्रमाणे राजकारण व गटबाजीपासून दूर राहा. नोकरी, व्यवसायात परिस्थिती फारशी मनाप्रमाणे राहणार नाही. काही नवीन योजना अंमलात आणाव्या लागतील. कामगारांचे प्रश्न अधूनमधून डोके वर काढू शकतात. त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितल्यास समस्या सुटतील. कुटुंबात सुवार्ता मिळतील, मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या कानी येतील, परंतु कुटुंबात तसेच कार्यक्षेत्रात, व्यवसाय, धंदा, नोकरीत काही अनपेक्षितपणे प्रश्न उद्भवू शकतात. त्याचा शांतपणे विचार करून मगच निर्णय घ्या.

शुभ दिनांक : १, ३, ४, १०, १२, १३,१५,१६,२३,२९,३०

अशुभ दिनांक :- २,५,६,८,१४,१८,१९,२०

कर्क रास

व्यावसायिक पतप्रतिष्ठा लाभेल

तिरपेपण, जलद चालणारा, उंच, शरीर सडपातळ, पुढचे दात रुंद व मोठे असून बोलताना सहज पुढे दिसणारे असतात. चेहरा साधारणपणे गोल व मोहक, हाताचे व पायाचे पंजे मोठे, अभद्र शब्द, जास्त बोलणारे असतात. चैनी, नाटकी निष्काळजी तसेच विद्येमध्ये अभिरुची कमी असते. प्रेमाच्या तडाख्यात सापडून त्याच विवंचनेत राहणारा असतो. स्त्री कामी मित्रोत्सल बाग बागेचे व जलाशय यांच्या सान्निध्यात राहण्याची आवड असते. घरी निवास करणारा, देव ब्राह्मणाची पूजा करणारा, शरीरात कसं वाहुल्य असणारा वारंवार शीत व्याधीने त्रस्त असणारा भावंडांत कन्या अधिक असणारा भित्रा चंचल बुद्धीचा संतती लवकर होणारा इत्यादी वैशिष्ट्ये कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये दिसतात.

शिक्षण :- सदरच्या कालावधीमध्ये बुद्धी व समज चांगली राहणार आहे, शिवाय शुभ ग्रहांची साथ आपणास मिळणार आहे. त्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील, विसर्जनशीलता व शिक्षणासाठी चांगले परिणाम मिळणार आहेत, धैर्य व आत्मविश्वासाने आपण आपले प्रयत्न चालू ठेवावे. यश निश्चित लाभेल, कला व क्रीडा क्षेत्रासाठी अनुकूलता आहेच. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील.

पारिवारिक :- कुटुंबात काही वेळेस आर्थिकदृष्ट्या चढउतार राहण्याची शक्यता आहे. त्यातच कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. कुटुंब परिवर्तन, आपल्या कार्यक्षेत्रात बोलण्यामध्ये स्पष्टता नसल्याने गैरसमज होण्याची शक्यता आहे. गैरसमज घडू शकतात. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता. त्यामुळे अशा गोष्टी टाळा. आर्थिक बाबतींत नियोजनाची आवश्यकता भासेल. अनावश्यक खर्च टाळा. कोणतेही लहान-मोठे आर्थिक निर्णय घेताना पूर्ण विचारांती व शांतपणे निर्णय घेणे जरुरी आहे. अध्यात्म व धार्मिकतेमध्ये रुची वाढणार आहे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- व्यवसाय, धंदा अथवा नोकरी किंवा आपल्या कार्यक्षेत्रासाठी सदरील कालावधी अनुकूल आहे. चालू नोकरीमध्ये केलेल्या कष्टाचे फळ मिळून पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळू शकते. परदेशी जाण्याचाही योग आहे. एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. व्यापार, व्यवसाय, धंद्यात विस्ताराच्या योजना आखू शकाल. चालू व्यवसायामध्ये नवनवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होताना दिसेल. त्यामुळे व्यावसायिक उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. उत्पन्न वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. नवीन भागीदारीविषयी विचारणा होऊ शकते. भागीदारीच्या व्यवसायात भागीदार पूर्ण सहकार्य देईल. त्याच्या मताला प्राधान्य देणे हिताचे ठरेल. ते व्यवसायासाठीही पोषक ठरेल. व्यावसायिक जुनी येणी येतील. वादग्रस्त येणे येतील. कुटुंबात नवपरिणितांना अपत्य लाभ. घरातील वातावरण बदलून जाईल. उत्साह आणि आनंदीत वातावरणामुळे घरात उत्साह राहील.

शुभ दिनांक :- ३, ४, ७, १२, १३,१५,१६,२५,२६,३०

अशुभ दिनांक : - २,५,६,८,१४,१८,१९,२०

logo
marathi.freepressjournal.in