जानेवारी महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जानेवारी महिना? जाणून घ्या...
जानेवारी महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

कुंभ राशी

जीवनातील मोठ्या संधींची उपलब्धता

कुंभ रास ही सव्वादोन नक्षत्रांमुळे तयार होते. धनिष्ठा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, तारका नक्षत्राचे चार चरण, पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे पहिले चरण, दुसरे-तिसरे चरण मिळून नऊ चरणांनी कुंभ राशी बनलेली आहे. धनिष्ठा नक्षत्र तिसरे चरण ते पूर्व भाद्रपदाचे तिसरे चरण अखेरच्या नक्षत्रातील ताऱ्यांनी तयार झालेल्या व आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या खांद्यावर रिकामा कुंभ घेऊन मानवाच्या आकृतीस कुंभ राशी म्हणतात. संशोधक वृत्ती, संग्रहक वृत्ती, ज्ञानपीपासा धारण शक्ती, बुद्धी प्रगल्भ, अलौकिक स्मरणशक्ती, लोकोत्तर बुद्धिमत्ता, वक्तृत्व परोपकार वगैरे श्रेष्ठ गुण निसर्गत:च कुंभ राशीत आढळतात.

शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रासाठी ग्रहमान अनुकूल आहे. आपल्याला अभ्यासात सातत्य ठेवणे, गरजेचे राहील, कला- क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त होईल. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील. मदत मिळेल. कुटुंबातून पाठिंबा मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होतील. यश मिळेल. इतर बाबतींत थोडे जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आत्मविश्वासाने आपले प्रयत्न केल्यास यश साध्य होऊ शकते.

पारिवारिक : कुटुंबात चांगले वातावरण राहील, परंतु काही वेळेस कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसात गैरसमज असल्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवादांना स्थान देऊ नका, तसेच समज-गैरसमज टाळा. कुटुंबात कमीपणा येईल. आपल्या पुढाकाराने परिवारात शांतता व आनंद निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांशी सकारात्मक संवाद साधणे गरजेचे आहे. ते तुम्ही करू शकाल. त्यामुळे सर्वांनाच आनंद मिळणार आहे. एखादे धार्मिक कार्य ठरेल, आर्थिक बाबतींत अनुकूलता लाभेल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : सदरचा काळ म्हणजे एक पर्वणी राहील. आतापर्यंत आपल्याला जीवनात ज्या संधींची आवश्यकता होती त्या उपलब्ध होतील. कलाकार, खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील, या संधी परदेशातून सुद्धा उपलब्ध होऊ शकतात, प्रसिद्धीसह आर्थिक उत्पन्न वाढेल. या संधीचे सोने करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे या संधी आपले रोजचे जीवनमान बदलू शकतात. त्याबरोबर रोजचा दिनक्रम बदलू शकतो. जीवनमान उंचावेल. व्यवसाय-धंद्यामध्ये मोठे आर्थिक लाभ होऊ शकतात. काही फायद्याचे सौदे हाती येतील. व्यवसाय-धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात भरीव वृद्धी होईल. व्यवसाय-धंद्यातील कामगार सहकार्य देतील. त्याचप्रमाणे नवीन संकल्पनांचा वापर उपयुक्त ठरेल. स्पर्धकांवर मात करू शकाल. समाजातील प्रभावशाली राजकीय व्यक्तींकडून विशेष फायदा मिळेल. आपली महत्त्वाची कामे त्यांच्यातर्फे मार्गी लावू शकाल. समाजातून निरनिराळ्या प्रकारचे मानसन्मान मिळतील, चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घटित होऊन पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळू शकते.

शुभ दिनांक : ६, ८, ११, १२, १३, १५, २१, २५, २८, २९

अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०,२७,३०,३१

मीन राशी

व्यावसायिक प्रदर्शने यशस्वी होतील

मीन राशीमध्ये सव्वादोन नक्षत्र येतात. पूर्वा भाद्रपद नक्षत्राचे चौथे चरण, उत्तरा, भाद्रपद या नक्षत्राचे चार चरण, विभूती नक्षत्राचे चार चरण मिळून मीन राशी तयार होते व पूर्व भाद्रपद या नक्षत्राचे चौथे चरण. ते रेवती नक्षत्राचे चौथे चरण. या नक्षत्रातील तारकांनी बदललेल्या व आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या दोन उलट सुलट माशांच्या आकृतीस मीन राशी असे म्हणतात. दोन मासे उलटसुलट तोंडे असलेली आहेत. दुर्बलांवर आक्रमण करणे प्रबलांशी नमते घेणे हे नैसर्गिक गुण मीन राशीमध्ये असतात. तसेच भित्रेपणा जलविहाराची आवड सुंदर व टपोरे डोळे, चंचलता, तजेलदारपणा व आपल्याच जात बांधवांवर आपली उपजीविका करणे हे मीन राशीचे विशिष्ट गुण आहेत. मीन रास हे बारा आकडेवारी दर्शविली जाते.

शिक्षण : शिक्षणासाठी सदरचा कालावधी आपल्याला चांगला राहणार आहे. अनुकूल ग्रहण आहे. परदेशातील शिक्षणासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न यशस्वी होतील, परंतु योग्य दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अभ्यासच सातत्य ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवू शकाल. तांत्रिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. आत्मविश्वास वाढेल, अपेक्षित यश मिळवू शकाल.

पारिवारिक : परिवारामध्ये अचानक काही अशा घटना घडल्यामुळे आपल्या जबाबदाऱ्यां मध्ये वृद्धी होईल. आपल्याला त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. घरात मतभेद व वादाची शक्यता काही वेळेस पुढे येईल. आपल्या सकारात्मक धोरणांनी युक्त संभाषणाने वादविवाद टळू शकतात. आपल्या प्रयत्नांना चांगले यश लाभेल. त्यामुळे परिवारात उत्साह राहील. आर्थिकदृष्ट्या चांगला कालावधी राहिल्यामुळे उत्पन्नात वृद्धी होईल. परिवारातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण होतील. घरात आध्यात्मिक वातावरण राहणार आहे. त्यामुळे उत्साह वाढेल. समाधानी राहू शकाल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : या महिन्यातील ग्रहण व्यावसायिक दृष्टिकोनातून पूर्णतः अनुकूल आहे. व्यवसायासंबंधी आपले निर्णय अचूक ठरतील. निर्णय अचूक ठरल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला व्यवसाय-धंद्यामध्ये होईल. तेजी-मंदीविषयक अंदाज अचूक ठरतील. त्यामुळे व्यवसाय-धंद्यात त्याप्रमाणे आपण बदल केल्यामुळे जास्तीचे उत्पन्न मिळवू शकाल. नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होईल. स्पर्धकांवरती यशस्वी मात करू शकाल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून अनुकूल कालावधी आहे. त्याप्रमाणे प्रयत्न अवश्य करा. भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराच्या म्हणण्याला उचित प्राधान्य दिल्यास ते व्यवसायासाठी पोषक ठरेल. व्यावसायिक मोठी उत्सव प्रदर्शन आहे. त्यास प्रसिद्धी मिळेल. नवनवीन करार होतील. परदेशी संबंध सुद्धा येऊ शकतो. परिवारातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. त्यांना नोकरी मिळेल. तरुण-तरुणींना कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी ठरतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. परिवारात पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल. सुवर्ता मिळतील. मात्र मित्रमंडळींच्या वर्तुळातून काही वेळा विचित्र अनुभव येऊ शकतात.

शुभ दिनांक : २, ८, ११,१ २, १३, १५,२३, २८,२९

अशुभ दिनांक : १, ४,१०, १७,१८,१९,२०,२७,३०,३१

logo
marathi.freepressjournal.in