जानेवारी महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य
डॉ. सविता महाडिक ज्योतिष भूषण
तुळ
नावीन्यपूर्ण फळे मिळतील
तुळ राशीमध्ये चित्रा नक्षत्रातील तिसरा व चौथा चरण स्वाती नक्षत्राचे चार चरण. विशाखा नक्षत्राचा पहिला, दुसरा व तिसरा चरण मिळून नऊ नक्षत्र चरणांनी तूळ राशी तयार होते. या नक्षत्रातील तारांनी तयार झालेल्या आकाशात दिसणाऱ्या तराजूच्या आकृतीला तुला राशी असे म्हणतात. तुला म्हणजे तराजू. तुला धारण करणारा माणूस आहे असे या राशीचे स्वरूप आहे. समतोलपणा, न्यायप्रियता, न्यायदान, व्यापारीवृत्ती ही तूळ राशीची ठळक वैशिष्ट्ये होत. जन्मकुंडलीत ती रास सात या आकड्याने दर्शवितात.
शिक्षण : या कालावधीमध्ये कोणत्याही क्षेत्रातील अभ्यास करण्यासाठी आपणास जास्त कष्ट करावे लागणार आहेत, तसेच परिश्रम घ्यावे लागतील. वेळेचे नियोजन करावे लागेल, कुसंगतीपासून दूर राहणे आपल्या फायद्याचे ठरेल. शिवाय योग्य मार्गदर्शनाचीही गरज आहे. त्यामुळे आपल्याला यशप्राप्त होईल. कोणत्याही प्रकारच्या कल्पनाविश्वात रमू नका. प्रत्यक्षातील वस्तुस्थितीची जाणीव ठेवा. वस्तुस्थितीची खातरजमा करून घ्या, तांत्रिक शिक्षणासाठी ग्रहमानाची अनुकूलता लाभणार असली तरी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. कला-क्रीडा क्षेत्रासाठी तसेच साहित्यासाठी अनुकूलता लाभेल. आपल्या प्रयत्नांमुळे आपल्याला अपेक्षित यश साध्य होण्याची शक्यता आहे.
पारिवारिक : कुटुंबात मिश्र प्रकारचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही वेळेस कुटुंबामध्ये ताण-तणाव येण्याची शक्यता आहे. लहानसहान विवादांनी घरातील शांतता ढळू शकते. त्यामुळे ज्या घटनांमुळे वादविवाद निर्माण होऊ शकतील अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे वेळेसच लक्ष देणे गरजेचे ठरू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मागण्या पूर्ण होतील तसेच कुटुंबातील तरुण-तरुर्णीचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. काहींचे विवाह ठरतील. नातेवाईक-मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी-व्यवसायात आत्तापर्यंत केलेल्या कार्याची चांगली फळे मिळतील. नोकरीमध्ये काही अनपेक्षित घटना घडून अर्थमान उंचावेल. परदेशगमन होऊ शकते. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीमध्ये अतिरिक्त कार्यभार स्वीकारावा लागू शकतो. त्याचप्रमाणे कामांमध्ये बदलाची शक्यता, अधिकार क्षेत्र वाढेल, आपल्या अधिकार क्षेत्रात संलग्न राहून कार्य पूर्ण करा तसेच लहानमोठ्या प्रॉब्लेमपासून दूर राहून होणारी बदनामी टाळू शकाल. कुटुंबात एखादे मंगलकार्य ठरेल, कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. त्याचप्रमाणे त्यांचे विवाह ठरण्यातील अडचणी दूर होऊन विवाह ठरतील. त्यांना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. काहींचे प्रेमविवाह होतील. आपल्या कार्यक्षेत्रात आपण आपल्या विरोधकांवर हितशत्रूवर विजय प्राप्त करू शकाल.
शुम दिनांक: ६, ८, ११, १२, १३, १५,२१,२५,२८,२९
अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१
वृश्चिक
मोठा धन वर्षाव
वृश्चिक राशीचे सव्वादोन नक्षत्र चरण, अनुराधा नक्षत्राचे चार चरण. ज्येष्ठ नक्षत्राचे चार चरण, असे मिळून नऊ चरणांनी वृश्चिक रास तयार होते. विशाखाचा चौथा चरण व ज्येष्ठ नक्षत्राने तयार झालेल्या या आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या आकृतीस वृश्चिक रास म्हणतात. खाद्य मिळवण्यासाठी टपून बसलेला विंचू असे वृश्चिक राशीचे स्वरूप आहे. मार्मिकता एकांतप्रियता, गुढता दुर्बलांवर आक्रमण करणे व प्रबलांशी नमते घेणे, टीका करणे, गुप्तपणे पाप करण्याचा कल असणे, अतिरेक, मर्म, भेदकता, मनकवडेपणा है वृश्चिक राशीचे नैसर्गिक गुण आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर किंवा तुम्ही दरोडेखोर माणूस, सुंदर राधा किंवा काळीकुट्ट कुब्जा अशा परस्पर गुणांनी युक्त ही रास आहे. राशीचक्राच्या किंवा कुंडलीत ही रास आठ आकड्याने दर्शवितात.
शिक्षण : कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी आपणास अधिक प्रयत्नांची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील व ते योग्य दिशेने असल्यास आपल्याला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. जास्त परिश्रम घ्यावे लागतील तसेच अभ्यासाचे व वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा लागेल. त्यामुळे चांगल्या प्रकारचे ज्ञान होईल व अपेक्षित यश मिळेल, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. मनासारखे यश मिळू शकते. प्रसिद्धी पण मिळेल. परदेशातील शिक्षणासाठी अनुकूलता लाभू शकते, पण योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतील. तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना मनाप्रमाणे यश मिळेल. स्पर्धापरीक्षेत स्पर्धात्मक यश मिळू शकते.
पारिवारिक : परिवारातील वातावरण चांगले राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने परिवारातील सर्व सदस्यांच्या मागण्या व्यवस्थित पूर्ण करू शकाल, वाढत्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकाल, परंतु आयत्या वेळेस काही खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. व्यक्तिगत खर्च जास्त होईल, मनोरंजनावर व मित्रमंडळींच्या सहवासामध्ये खर्चाची शक्यता जास्त आहे. परिवारातील स्त्रियांनी आपल्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, वादविवादांची शक्यता त्यामुळे कमी होईल व कुटुंबात शांतता टिकण्यास मदत होईल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : सदरचा कालावधी आपल्याला अत्यंत अनुकूल आहे. आर्थिक बाबतीमध्ये खूपच चांगले यश मिळू शकते. परंतु मित्रमंडळी सांभाळा. कुसंगतीमुळे नको त्या गोष्टी घडण्याची शक्यता. नंतर पश्चात्ताप करून उपयोग होणार नाही. वेळेसच काळजी घेणे हितकारक ठरेल. कुसंगत टाळणे हिताचे ठरेल. तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. अति आत्मविश्वासापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसायधंद्यात तेजी अनुभवाल. नवीन करार होऊ शकतात. भागीदारीच्या व्यवसायात विशेष फायदा मिळेल. भागीदाराची मते व्यवसायास फायदेशीर ठरू शकतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातून उत्तम संधीसंधीचे सोने करणे आपल्या हाती आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
शुभ दिनांक : २, ८, ११, १२, १३,१५,२३,२८,२९
अशुम दिनांक : १, ४, १०, १७, १८,१९,२०,२७,३०,३१

