
डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण
तुळ रास
प्रगतीचा कालावधी
चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वाती नक्षत्राचे चार चरण, विशाखा नक्षत्राचा पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण मिळून नऊ चरण यांनी तुला राशी तयार होते. समतोलपणा, न्यायप्रियता, गायदान, व्यापारी वृत्ती ही तुळा राशीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे या राशींच्या जातकांमध्ये धाडस, साहस हेही गुण विशेषत्वाने दिसतात.
शिक्षण : शिक्षणासाठी या कालावधीत आपणास जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे जास्त कष्ट घेणे सध्या तरी आवश्यक आहे. आपले प्रयत्न निश्चित यशस्वी होतील. परदेशातून आपणास नवीनवीन संधी मिळतील. सर्व शाखेच्या क्षेत्रातील व्यक्तींना आणि प्रयत्नांना यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना परदेशातून चांगल्या संधी प्राप्त होतील.
पारिवारिक : सध्याचे ग्रहमान आपल्याला सावध राहण्याचे इशारे देत आहेत. लहान मोठ्या आर्थिक व्यवहारात पूर्ण विचारांती कार्य करावे. आपल्याला गुरुतुल्य व्यक्तींची साथ लाभेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन व मदत मिळेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. तरुण-तरुणी मार्गस्थ होतील. पौर्णिमेजवळ विशिष्ट मानसन्मानाचे योग आहेत. तरुणांना कला छंद व विशिष्ट बौद्धिक उपक्रमातून उत्तम प्रतिसाद मिळेल, मात्र अमावस्या जवळचा कालावधी मातृ आणि पितृ चिंता दर्शवते. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.
नोकरी, व्यवसाय, धंदा : आपल्याला गुरूचे साह्य लाभणारच आहे. पण बाकी ग्रहांच्या भ्रमणांनी आपणास सर्वप्रकारे सावध राहणे गरजेचे राहणार आहे. तरुण-तरुणींचे प्रश्न मिटतील. त्यांना चांगले मार्ग मिळतील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील तसेच शैक्षणिक बाबतीत प्रगती होईल. परदेशी संधी मिळतील. समाजातील घटकांकडून मानसन्मानाचे योग आहेत. तरुण-तरुणींना कला-क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. काही पाप ग्रहांच्या योगाने घरात अनपेक्षित खर्च निर्माण होण्याची शक्यता आहे. काही वाईट बातम्याही समजण्याची शक्यता आहे. कामात नियमितपणा असावा. नोकरीच्या ठिकाणी आपले काम आपण वेळेत पूर्ण करणे तसेच आपल्या ज्ञानाबाबत अद्यावत राहण्याची गरज आहे. वरिष्ठांशी वादविवाद टाळावेत अन्यथा त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. मात्र शुभ ग्रहांची साथही लाभणार आहे. त्यामुळे सुवार्ता समजतील व तुमच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराचे म्हणणे समजून घ्या, त्याच्या मताला प्राधान्य द्या. वादविवाद करू नका. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते पोषक ठरेल तसेच आपल्याला माहीत नसलेल्या इतरांच्या भानगडीत पडू नका. आर्थिक परिस्थिती चांगली असेल, व्यवसाय, धंद्यामध्ये उलाढाल वाढेल. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होईल. शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या, त्यादृष्टीने आपले वर्तन असू द्या. अचानक धनप्राप्ती झाली की खर्चाचे प्रमाणही वाढते राहणार आहे. सर्व बाजूने सावध राहणे आवश्यक आहे. प्रवास होण्याची शक्यता आहे, पण आपल्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. म्हणून टाळता आले तर प्रवास टाळणे गरजेचे आहे. तसेच काही ग्रहांची स्थिती आपणासाठी फारशी अनुकूल नसल्यामुळे शत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. ज्या कामात फायदा नाही ती कामे आपणास करावी लागणार आहेत. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. अचानक विषबाधा होण्याची शक्यता आहे. औषधांची एक्सपायरी डेट तपासून औषधे घ्यावीत. पोटाचे त्रास होण्याची शक्यता आहे. मोठे निर्णय विचारपूर्वक आणि शांतपणे घेणे. काही ग्रह आपणासाठी सकारात्मक निर्णय देतील. या काळात त्यामुळे आपणास योग्य अधिकार मिळेल. आपल्या कार्य प्रदेशात असलेले हितसंबंध आपणासाठी उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला अनपेक्षित उत्पन्न मिळेल. तुम्हाला हवी असलेली सत्ता मिळेल. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला चांगले स्थान प्राप्त होईल. धार्मिक कार्यसुद्धा कराल. धार्मिक प्रवास होतील, दानधर्म होईल, अध्यात्मिक आनंद अनुभवाल. तुमचे प्रयत्न सहज यशस्वी होतील. अनेक संधी समोर येतील. समाजात आपणास आदर व सन्मान मिळेल. कष्टाचा योग्य मोबदला मिळणार आहे. तुमची प्रभावशाली व्यक्तींशी भेट होईल.
शुभ दिनांक : ३,४,९,१४,१५,१६,१८,१९,२५,२७,२९,३०,३१
अशुभ दिनांक : ६,८,११,१७,२२,२४,२६
वृश्चिक रास
अविस्मरणीय प्रसंग घडतील
विशाखा नक्षत्राचे चौथे चरण, अनुराधा नक्षत्राचे चार चरण, ज्येष्ठ नक्षत्राचे चार चरण मिळून वृश्चिक रास होते. वृश्चिक म्हणजे विंचू. पक्षी मिळवण्यासाठी टपून बसलेला, मार्मिकता, एकांतप्रिय, दुर्बलांवर आक्रमण करणे, प्रबलांशी नमते घेणे, टीका करणे, गुप्त पाप करण्याकडे मनाचा कल असणे, अतिरेक, मर्म भेदकता, मनकवडेपणा हे वृश्चिक राशीचे स्वाभाविक तसेच स्थायी गुण आहेत.
शिक्षण : शिक्षणासाठी हा कालावधी मध्यम राहणार आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास केला पाहिजे. जास्तीचे कष्ट घेणे जरुरीचे आहे. तसेच कुसंगत टाळावी, वेळेचा सदुपयोग करणे जरुरी आहे. जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सातत्याने केलेला अभ्यासाचा फायदा होईल. त्यातून उज्ज्वल भविष्य घडवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश मिळेल.
पारिवारिक : पौर्णिमेपर्यंत जीवनातील अविस्मरणीय प्रसंग घडतील. सरकारी कामे होतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ, पुत्र चिंता असल्यास ती संपुष्टात येईल. कुटुंबातील तरुण- तरुणींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी आल्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. या कालावधीच्या उत्तरार्धात मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी मनसोक्त खर्च कराल. परिवारात एखाद्या कार्याचे नियोजन होऊ शकेल.
नोकरी, व्यवसाय, धंदा : व्यवसाय-धंद्यातील आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. जुनी येणी वसूल होतील. त्याचप्रमाणे भागीदारीच्या व्यवसायामध्ये नवीनवीन संकल्पनांचा आपण वापर करू शकाल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून चांगला कालावधी आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्नशील राहा. प्रयत्नांना यश मिळेल. ज्या जातकांना नोकरी नाही. अशांनी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास ते सफल होतील. चालू नोकरीमध्ये मध्यम परिस्थिती राहील. वरिष्ठांशी वाद-विवाद घालू नका. त्यांच्या मताला प्राधान्य द्या. शुभ ग्रहांमुळे आपणास अनुकूलता मिळणारच आहे. जीवनात आनंद असणार आहे. काही वेळा भावनिक प्रसंग येतील. व्यापार-व्यवसायात मोठी वसुली होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. दीर्घकाळ रखडलेली कामे गतिमान होतील. कामगारांचे सहकार्य लाभेल. आपल्याला जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. संततीची चिंता असल्यास ती संपुष्टात येईल व मनोरंजन व चैनीसाठी मित्रमंडळींसह चांगला वेळ जाईल. मात्र कोणतेही वाहन चालवताना सर्व प्रकारची दक्षता घेऊन वाहन चालवावे. त्याचप्रमाणे कुसंगत टाळणे हिताचे ठरेल. संगतीपासून त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात मर्यादा सांभाळाव्यात. मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारी माध्यमातून लाभ मिळतील. नोकरीत जास्त कामाचा ताण असू शकतो. सरकारी स्वरूपाच्या नोकरीमध्ये अतिरिक्त कार्यभार स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे, परंतु अधिकाराच्या मर्यादा वाढतील. मात्र वरिष्ठांबरोबर चांगले संबंध ठेवा. गैरसमज होऊ देऊ नका. आपण धाडसाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यात आपणास यश प्राप्त होईल. फक्त वादविवादापासून लांब राहणे हिताचे आहे. वास्तववादी विचार करणे आवश्यक आहे. सकारात्मक विचाराने वाटचाल करणे फार आवश्यक आहे. आपल्या कार्यात नवीन बदल होतील, ते बदल आपल्यासाठी चांगले असतील. कोणतेही निर्णय घेताना ते आपल्यासाठी किती चांगले, किती वाईट या दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घ्यावेत. मित्र व नातेवाईक यांच्याशी जुळवून घेणे. अनिष्ट परिस्थिती उद्भवली तरी ती चांगल्या प्रकारे आपण हाताळाल. तेवढी क्षमता आपल्यात आहे. आर्थिक लाभासाठी चुकीचे निर्णय घेऊ नका. अवघड परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहात, तसेच स्वतःवर कोणत्याही प्रकारे दबाव येऊ देऊ नका. धाडस आणि अंदाज हे आपले बलाढ्य गुण आहेत. नोकरीच्या ठिकाणी दबाव बसण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यात कायदा, नियम, अटी पाहूनच काम करावे अन्यथा कायदेशीर प्रश्न उपस्थित होतील. शांततेने आणि धैर्याने निर्णय घ्या. अनेक अडचणी व कष्टप्रद काळावर मात करून आपण विजयी व्हाल. आधीचे कष्ट केलेले चीज होईल. आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम आहे. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची जवळीक वाढेल तसेच आपल्या कामाने व वागणुकीमुळे वरिष्ठांशी सुसंवाद राहणार आहे. सहकुटुंब प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे उद्देश सफल होण्याचे योग आहेत. वातावरण चांगले असल्याने सर्व बाजूने सहकारी मिळणार आहेत.
शुभ दिनांक : ३,४,७,१२,१६,१८, १९,२१,२७,२९,३०
अशुभ दिनांक : ६,८,११,१७,२२,२३,२४,२६