जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जुलै महिना? जाणून घ्या...
जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण

कुंभ रास

तरुण-तरुणींचा भाग्योदय

धनिष्ठा नक्षत्राचा तिसरा चरण, चौथा चरण, शतकारका नक्षत्राचे चार चरण, पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण मिळून नऊ चरणांनी कुंभ रास बनलेली आहे. संशोधक वृत्ती, संग्रहक वृत्ती, ज्ञानपीपासा धरणशक्ती, बुद्धी प्राबल्य, अलौकिक स्मरणशक्ती, लोकोत्तर बुद्धिमत्ता, वक्तृत्व, परोपकार इत्यादी श्रेष्ठ गुण निसर्गतः या राशीमध्ये आढळतात.

शिक्षण : विद्याभ्यासासाठी हा कालावधी अत्यंत उपयुक्त आहे. आपली ग्रहण क्षमता वाढवणार आहे. आपल्याला शिक्षणात चांगले यश प्राप्त होईल. सर्व क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश येणार आहे. स्पर्धा परीक्षेत सुद्धा यश मिळवाल. परदेशातूनही आपणास चांगल्या संधी प्राप्त होतील, तसेच प्रदेशातील व्यक्तींना पण चांगले यश मिळणार आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल.

पारिवारिक : पूर्वार्ध वैयक्तिक उपक्रमातून गाजवणारा. घरातील तरुण-तरुणींचा भाग्योदय होईल. त्यांच्या समस्या मिटतील. सहकुटुंब सहपरिवार मौजमजेत कालावधी राहील. पौर्णिमेजवळ आदर सत्काराने सन्मानित व्हाल. उत्तरार्धात परदेशी नोकरीचा लाभ मिळू शकतो. कोणतेही लहान-मोठे आर्थिक निर्णय घेताना जागरूक राहणे गरजेचे आहे. सावध राहा. अन्न संसर्ग जपा.

नोकरी, व्यवसाय, धंदा : स्वतःच्या उपक्रमांना प्राधान्य द्याल. स्वतःचे प्रयत्न यशस्वी होतील. घरातील तरुणांचे भाग्योदय होतील, नोकरी विषयक प्रश्न संपुष्टात येतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. मौजमजा करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. कलाकारांचे भाग्योदय होतील. कला क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले यश येईल. नवपरिणीतांचे भाग्योदय होतील. संततीची प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. परदेशी नोकरीचा लाभ मिळेल. अडचणीतून निभावून नेणारा सदरचा कालावधी आहे. खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. अनुकूल नसणाऱ्या ग्रहांमुळे काही काळजी घ्यावी लागणार आहे. मुख्य म्हणजे आपण जास्त कामाच्या मागे लागून दगदग करू नये. प्रकृती अस्वस्थ्याला सामोरे जावे लागेल, शिवाय जास्तीचा खर्च पण होऊ शकतो. पैशाचे नियोजन करा म्हणजे मनस्ताप कमी होईल. लहानसहान गोष्टींमुळे वादविवाद टाळणे गरजेचे आहे. आपल्या घरातील शांतता आणि प्रसन्नता ढळण्याची शक्यता आहे. अनावश्यक ठिकाणी जोशपूर्ण व धाडसी निर्णय घेऊ नका. आक्रमकतेने मानसिक तोल सुटून चुकीचे निर्णय होऊ शकतात, त्यामुळे स्वतः शांत राहणे आवश्यक आहे. तसेच तरतम भाव ठेवा, तुम्हाला ते सहज शक्य आहे. आपल्या संततीची प्रगती होईल. ज्यांना आपत्य हवे आहे अशांचे प्रयत्न यशस्वी होतील. दैनंदिन जीवन सांभाळा तसेच व्यापार व्यवसाय धंद्यामध्ये जास्त धोका पत्करू नका. नोकरी करणाऱ्यांना आपले काम नियमित वेळेवर करणे गरजेचे आहे. अन्यथा इतरांचा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या. आपले कामातले ज्ञान अद्यावत ठेवा. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास आपल्या नकारात्मक गोष्टींना उत्तम पर्याय आहे. आपल्याकडे बुद्धी चातुर्य देखील आहे, त्यामुळे आपणास काही ग्रहांची चांगली साथ ही मिळणार असून त्यातून चांगले पर्याय मिळणार आहेत. शुभ ग्रहांची पण साथ लागणार आहे. आपणाला सर्व ठिकाणी घरात, आपल्या कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. नातेसंबंध तसेच कार्यक्षेत्रात आपण आपले संबंध खूप चांगले निर्माण करणार आहात. तुमचे संवाद कौशल्य सुधारणार आहे. त्यामुळे अनेक बाबतीत योग्य तो मोबदला मिळणार आहे. तसेच आपल्या योग्य प्रयत्नाने आपण आपली भाग्य बीजे पेरणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्याला चांगले लाभ मिळतील ते आपले योग्य प्रयत्नाने आणि संवादाने सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्याने मिळणार आहे. शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वातील चांगले सुधारणांमुळे त्याचे फायदे होणारच आहेत. तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे तर आहेतच, पण दीर्घकाळपर्यंत टिकणारे आहेत. घरात एखादे शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. ज्यांनी तुम्हाला विरोध केला तेच तुम्हाला सहकार्य करतील. तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे. काही नवीन शिकण्यासाठी प्रयत्न यशस्वी होतील. त्यासाठी सहकारी व मित्र परिवाराची चांगली साथ मिळणार आहे. जमिनीचे व्यवहार होण्याची शक्यता आहे त्याचा चांगला फायदा होईल आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे. सुखदायक आयुष्य असेल.

शुभ दिनांक :- ३, ४, ९, १४, १५, १६, १८, १९, २७, २९, ३०, ३१

अशुभ दिनांक :- ६, ८, ११, १७, २२, २३,२४,२६

मीन रास

कायदेशीर प्रश्न सुटतील

पूर्व भाद्रपदाचा चौथा चरण, उत्तरा भाद्रपदाचे चार चरण आणि नक्षत्राचे चार चरण असे मिळून मीन राशी तयार होते. दुर्बलांवर आक्रमण व प्रबलांशी नमते घेणे हे मीन राशींच्या जातकांचे नैसर्गिक गुण आहेत. भित्रेपणा, जलविहाराची आवड, सुंदर टपोरे डोळे, चंचलता, तजेलदारपणा असतो. ही द्विस्वभाव राशी आहे. मनात एक कृतीत वेगळेच असते. परस्पर गुणांचा मधुर संगम असतो. माशाला पाय नसतात म्हणून अपाद राशी आहे. परिस्थितीनुसार बदलने इत्यादी गुण प्रामुख्याने आढळतात.

शिक्षण : शिक्षणासाठी हा कालावधी अत्यंत चांगला आहे. आपल्यामध्ये बौद्धिक कॅपॅसिटी वाढणार आहे. त्यामुळे ग्रहण क्षमता चांगलीच वाढणार आहे, फक्त आपणास सातत्याने कष्ट व परिश्रम घेणे गरजेचे आहे. कंटाळा करू नये, आळस करू नये, त्यायोगे उत्तम यश संपादन करणार आहात. सर्वच क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी हा कालावधी अतिउत्तम आहे. कला व क्रीडा क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांना अतिशय चांगला कालावधी आहे. परदेशातून चांगल्या संधी तरी येतीलच पण परदेशात शिकणाऱ्यांना सुद्धा कालावधी चांगला असणार आहे. स्व प्रयत्न महत्त्वाचे ठरतील.

पारिवारिक : कुटुंबातील तरुण-तरुणींना हा कालावधी म्हणजे एक परवणी ठरेल. तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. नवीनवीन संधी मिळतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. आपला आवडता साथीदार निवडता येईल. एखादे स्पर्धात्मक यश जीवन मार्गस्थ करेल. ओळखीतून विवाह योग होत आहे. पौर्णिमा नोकरीत नामांकन देणारी ठरेल. काहींना परदेश गमनाचे योग आहेत. केलेल्या कामाचे फळ मिळेल. जे जातक आपल्या स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न बघत असतील तर त्यांचे स्वप्न साकार होईल. वास्तू योग आहे. नवीन वाहन खरेदी करू शकाल. विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील. त्यामुळे चिंता जाईल. अमावस्येच्या जवळपास गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे अपरिहार्य आहे.

नोकरी, व्यवसाय, धंदा : परिवारात उत्तम वातावरण असणार आहे. कुटुंबातील सदस्य आनंदी आणि उत्साही राहतील. चांगल्या वार्ता मिळतील.आपल्याला कुटुंबात जास्त जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पण त्यामुळे आपला कुटुंबातील मानसन्मान वाढेल. आपल्या शब्दाला वजन प्राप्त होईल. आपल्या मताला प्राधान्य दिले जाईल. घरातील व्यक्तींचा सर्व कामात उत्साह असणार आहे. सर्व व्यक्ती एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतील. अध्यात्मिक वातावरण राहील. हा कालावधी आपणास सर्व बाजूंनी चांगला राहणार आहे. नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. हातापायाच्या दुखापतीपासून सांभाळा. वाहन चालवताना दक्ष रहा तसेच वाहतुकीचे नियम पाळा. नोकरीमध्ये अनुकूलचा लाभणार आहे. पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळेल. घरात प्रिय व्यक्तींबद्दल शुभ घटना घडून त्यांचा भाग्योदय होईल. तसेच तरुणांना नवीन नवीन संधी मिळतील स्पर्धात्मक यश मिळेल. जीवनात चांगले मार्ग मिळतील. ओळखीतून विवाह योग, नोकरी चांगले यश मिळेल. वातावरण उत्तम राहील. काहींना परदेश गमनाचे योग आहेत. काही कायदेशीर प्रश्न असतील तर ते सुटतील. व्यस्त ग्रहांच्या मुळे नोकरीत बदल होण्याचा संभव आहे. तसेच स्थान बदलही होऊ शकतो अथवा चालू नोकरीत बदली होऊ शकते. कामाच्या स्वरूपात बदल घडू शकतो. जबाबदाऱ्या वाढतील तसेच अधिकार क्षेत्र वाढेल. सरकारी नोकरीमध्ये अतिरिक्त पदभार स्वीकारावा लागेल. जास्त कामाची तयारी ठेवा तसेच लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. काही वेळा मानसिक त्रास होऊ शकतो, पण आपण आपली मनशांती ढळू देऊ नका, अन्यथा समस्या अथवा प्रश्न सुटण्यासाठी विलंब लागू शकतो. धूर्त मित्रांपासून सावध रहा. कुटुंबीयांची काळजी घ्यावी लागणार आहे. नवीन व्यक्तींशी मैत्री करण्यासाठी आपल्याला सावधपणे निर्णय घ्यावे लागतील. व्यावसायिक खाजगी आयुष्यात काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नकारात्मकतेने नुकसान होऊ शकते, सकारात्मक राहूनच कार्य करावे. आपल्यासाठी सदरचा कालावधी उत्तम राहील. घरात एखादी शुभवार्ता समजू शकते. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. स्वतःच्या सकारात्मक विचारांनी मानसिक स्थैर्य लाभेल. तुमच्या कारकीर्दीत एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत, प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी हा कालावधी आपणास अनुकूल आहे. सहकारी व अधिकारी भागीदारीतून सहकार्य मिळेल. भागीदारी चांगले लाभ होतील.

शुभ दिनांक : - ३, ४, ७, १२, १६, १८,१९, २१, २७, २९, ३०, ३१

अशुभ दिनांक : - ६, ८, ११, १७, २२, २३, २४, २६

logo
marathi.freepressjournal.in