जुलै महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जुलै महिना? जाणून घ्या...
जुलै महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

तूळ

यशाचा चढता लेख

तूळ राशी शुक्राची रास आहे, म्हणजेच शुक्राचे कारकत्व या राशीवरती असते. राशीचक्रमधील तूळ रास ही सातव्या क्रमांकाची रास आहे तशीच ती विषम रास आहे. या राशीचे लिंग पुरुष आहे. स्वभाव खूप आहे. या राशीची संज्ञा चर आहे. ही रास शिर्षोदयी आहे. संज्ञा नर आहे. ही द्विपाद रास आहे. मानवी शरीराच्या बस्ती या अवयवावर तूळ राशीचे कारकत्व असते.

शिक्षण : तूळ राशीच्या जातकांसाठी शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. विशेषतः आपण जर स्पर्धापरीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला अनुकूल वातावरण लाभलेले आहे हे लक्षात ठेवा. स्पर्धात्मक यश मिळवण्यासाठी अभ्यासामध्ये सातत्याने व प्रामाणिक कष्ट घेण्याची तयारी असावी. योग्य दिशेने प्रयत्न झाल्यास आपण स्पर्धात्मक यश मिळवू शकाल. ग्रहमानाची साथ आपल्याला मिळत असल्यामुळे अनुकूलतेमध्ये वाढ होईल. त्याचा फायदा घ्या. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा यश मिळू शकते. आपले निर्णय योग्य ठरतील. नवनवीन संधी मिळतील. परदेशासंबंधीच्या शिक्षणाला अनुकूलता मिळणार आहे.

पारिवारिक : कुटुंबात आपण आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळू शकाल. आपल्याला मानसिक समाधान लाभेल, परंतु खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक ताळमेळ सांभाळावे लागण्याची चिन्हे आहेत. उत्पन्न चांगले राहील. त्यामुळे खर्चाचे काही वाटणार नाही. थोडक्यात, खर्च करू शकाल. काही वेळेस कुटुंबात आपापसात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला पुढाकार घेऊन सुसंवाद साधावा लागेल. गैरसमज दूर करण्याचे काम करावे लागेल. त्याचप्रमाणे आरोग्य सांभाळा. हातातील कामे यशस्वी होतील. त्यामुळे नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. मंगलकार्यात सहभागी व्हाल. धार्मिकतेमध्ये रस उत्पन्न होईल, परंतु नोकरीमध्ये क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. कुटुंबातील तरुण-तरुणींना नोकरीबाबत चांगल्या संधी मिळू शकतात. त्यांचे प्रश्न संपतील. काही वेळेस पितृ चिंता असू शकते.

नोकरी, व्यवसाय, धंदा : आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरी, व्यवसाय, धंद्यातून आपल्याला विशिष्ट मानसन्मानाचे योग आहेत. एखादे मानाचे स्थान भूषवता येईल, परंतु शत्रू व हितशत्रू यांच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या कारवायांकडे लक्ष ठेवणे जरुरी ठरेल तसेच आपल्या कार्यक्षेत्रात कोणतेही लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे जरुरी आहे. फसवणुकीची दाट शक्यता. त्याचप्रमाणे वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. कोणाशीही स्पर्धा नको, प्रवासात वाहतुकीच्या नियमांचे पालन हितकारक ठरेल, कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. त्याचप्रमाणे विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. व्यावसायिक अथवा व्यक्तिगत कारणामुळे जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे.

शुभ दिनांक : 4, 5, 9, 15, 16, 24, 29, 30,31

अशुभ दिनांक : 10, 12, 13, 14, 17, 22, 23, 25, 27

जुलै महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
आजचे राशिभविष्य, ४ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

वृश्चिक

विशिष्ट अपयश धुवून काढाल

वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे, म्हणजेच मंगळाचे कारकत्व या राशीवर असते. मंगळ हा राशी स्वामी आहे. जलतत्त्वाची रास आहे. राशीचक्र ती आठव्या क्रमांकाची वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीचा भाव समा आहे. या राशीचे लिंग स्त्री आहे. या राशीचा स्वभाव सौम्य आहे. संज्ञा स्थिर आहे. ही रास शिर्षोदयी आहे. संज्ञा कीटक आहे. ही बहुपद राशी आहे, पण उत्तरार्धात चतुष्पाद राशी आहे. मानवी शरीराचे लिंग या अवयवावर वृश्चिक राशीचे कारकत्व असते.

शिक्षण : सर्व क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूल कालावधी आहे. इतरत्र वेळ वाया न घालवता प्रामाणिक प्रयत्न करणे आपल्या हातात आहे व ते आपण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला उज्ज्वल यश मिळू शकते. कुसंगत टाळणे महत्त्वाचे ठरेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. प्रामाणिकपणे प्रयत्न करणे व अभ्यासातील सातत्य आपल्याला यश मिळवून देतील तसेच गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश मिळू शकते. परदेशासंबंधी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण लाभलेले आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे ठरेल.

पारिवारिक : परिवारामध्ये शुभ वार्ता मिळू शकतात. काही महत्त्वाची कामे आपण हातात घेतली होती ती आता पूर्ण होत असलेली बघून आपल्याला समाधान वाटेल. नवीन कामे हाती घ्यावीशी वाटतील व ती उत्साहाने आपण घ्याल. परिवारातील सर्व सदस्यांचे सहकार्य आपणाला मिळत राहील. कुटुंबातील ज्येष्ठांचे विशिष्ट सहकार्य मिळू शकते. त्याचप्रमाणे मार्गदर्शन मिळेल. व्यवसाय- धंद्यातील वातावरण मनासारखे राहील. उत्कर्ष होईल. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. आपण आत्तापर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मात्र स्वीकाराची तयारी ठेवा. परिवारात एखाद्या मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते. एखाद्या बाबतीत पूर्वी मिळालेले अपयश धुवून काढू शकाल असे ग्रहमान आहे. अचानक धनलाभाची शक्यताही आहे. शेअर मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो, पण गुंतवणूक करताना पूर्णपणे विचार करून गुंतवणूक करा.

नोकरी, व्यवसाय, धंदा : मागील काही काळात उद्भवलेल्या अडचणी आणि समस्यांवर यशस्वी मात करू शकाल. समाजातील प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण कराल. जुन्या गुंतवणुकीतून भरघोस आर्थिक फायदा मिळेल. नवीन गुंतवणूक होईल. तरुण-तरुणींनी वाहन चालवताना दक्ष राहणे आवश्यक आहे तसेच कुसंगत टाळणे हितकारक ठरेल. कुटुंबातील असलेले मतभेद समज-गैरसमज दूर होतील. पती-पत्नीमधील नाते अधिक चांगले राहील. बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्य करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळून अधिकारात वृद्धी होईल. शेअर बाजार, वायदे बाजार, म्युच्युअल फंड इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. वेगवेगळ्या मार्गांनी धनागमन होईल. व्यवसाय- धंद्यात नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल.

शुभ दिनांक : 4,5,7,8,15,16,24,29,30,31

अशुभ दिनांक : 10, 12, 13, 14, 17, 22, 23, 25, 27

logo
marathi.freepressjournal.in