
डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण
धनु रास
जुन्या गुंतवणुकीतून लाभ
मूळ नक्षत्राचे चार चरण, पूर्वा शाळा नक्षत्राचे चार चरण आणि उत्तरा शाळा नक्षत्राचा पहिला चरण असे मिळून धनु रास तयार होते. धनुर्धारी क्षत्रियाप्रमाणे विपणनाचे रक्षण करणे दलितांचे दैन्य व दुःख हरण करणे, शौर्य गाजवणे, धैर्य धारण करणे, दान देणे, समरभूमीवर विजय मिळवणे, राज्य करणे, प्रजेचे पालनपोषण करणे, प्रजेला शिक्षण देणे हे क्षत्रियांचे गुण धनु राशी आहेत.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल कालावधी आहे. आपणास अतिशय उत्तम यश मिळेल. प्रदेशातूनही चांगल्या संधी समोर येतील. सर्व क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूल ग्रहमान आहे. उत्तम यशाचा कालावधी आहे. त्याचा फायदा उचला.
पारिवारिक : पूर्वर्धामध्ये जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. नव्या गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञमंडळींचा सल्ला घ्यायला विसरू नका. वैवाहिक जीवनात मोठ्या सुवार्ता मिळतील. कुटुंबातील तरुण-तरुणींना विशिष्ट स्पर्धात्मक यश लाभेल. उत्तरार्धात संशयास्पद आर्थिक व्यवहार नको. शेअर बाजार, सट्टा बाजार यामध्ये नवीन गुंतवणूक नको. समाजातील थोरामोठ्यांच्या सहकार्याने आपली कामे करून घ्या. तशा संधी वारंवार येणार नाहीत.
नोकरी, व्यवसाय, धंदा : वैवाहिक जीवनात मनाला आनंद देणाऱ्या वार्ता समजतील. त्यामुळे परिवारातील वातावरण बदलून उत्साही आणि आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल, तसेच जुन्या गुंतवणुकीतून उत्तम लाभ प्रतिपादित होईल. तरुण-तरुणींना आपापल्या क्षेत्रात स्पर्धात्मक यश मिळेल. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे आपणास शंका असलेले व्यवहार करू नका. कोणताही निर्णय शांत आणि पूर्ण विचारांती घ्या. वेळ पडल्यास ज्येष्ठांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा लागेल. सार्वजनिक जीवनात स्पष्ट बोलण्याचा त्रास होऊ शकतो. अति स्पष्टपणे बोलणे टाळा. गुरूचे भ्रमण आपणास थोरामोठ्यांचे सहकार्य मिळवून देईल. त्यांच्या सहकार्याने दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकाल. एखाद्या मैदानी खेळात सहभागी होऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. तुमच्या ऊर्जेमुळे अनेकांचे सहकार्य मिळणार आहे. तुमच्या आनंदात आणि यशात जोडीदाराचा सहभाग असेल. तुम्हाला कार्यक्षेत्रात नेतृत्व स्वीकारावे लागेल. आपणास आदर व सन्मान मिळेल. शुभ ग्रहांचे भ्रमण आपणास शुभ फळे देईल. पण काही ग्रहांचे प्रमाण आपणास फारसे अनुकूल असल्याने कार्यात पूर्वीचे लक्ष पुरवता न आल्याने त्यात फारसे यश येताना दिसणार नाही. अनावश्यक खर्चाचीही शक्यता आहे, तसेच आपण आपल्या प्रयत्नांवर व सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवूनच कार्य करावे लागणार आहे. कामात अजिबात दुर्लक्ष न करता व कामे काळजीपूर्वकच करणे अन्यथा अडचणी व अडथळ्यांमुळे कार्य पूर्ण करण्यात दिरंगाई होऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्रात दबावाचे वातावरण असू शकते तसेच नवीन कामे घेताना काळजी म्हणजे दक्षता घेऊनच ती स्वीकारणे तसेच मोठा कोणताही धोका पत्करू नये. आपल्या क्षमतांचा जरूर विचार करावा. नवी गुंतवणूक व आश्वासने याचा पूर्ण विचार करावा. आपल्या कार्यात काही धोरणात्मक बदल झाल्याने आपणास ते स्वीकारण्यास थोडा त्रास होऊ शकतो. हे बदल आपण सकारात्मकतेने स्वीकारणे गरजेचे आहे. आत्मविश्वासाने आपण वाटचाल केली पाहिजे. धार्मिक, आध्यात्मिक कार्यामुळे आपणास त्रासातून शांतता मिळू शकते. समतोल मानसिकता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मित्र व सहकारी यांच्याशी वागताना सावध राहावे. अति श्रमाने आपल्याला थकवा आणि आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित वेळेवर खाणेपिणे व विश्रांती घेणे जरुरी आहे. आपणास भागीदाराच्या मतांचा विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही अडचणी उद्भवणार नाहीत, याची काळजी घेणे तुमच्या हिताचे आहे. तुमच्या सकारात्मक विचारांचा व सर्व दक्षता घेऊन कार्य करण्याचा व योग्य प्रयत्नांचा आपणास अतिशय चांगला उपयोग होईल. त्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. तुमची इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नवीन सन्माननीय व्यक्तींच्या ओळखी होऊन त्याचा फायदा आपल्या कार्यक्षेत्रात करून घेऊ शकाल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल. त्यामुळे आपणास यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयाने फायदा होणार आहे.
आपण प्रगतीपथावर असाल प्रभावशाली व्यक्तीकडून आपणास सहकार्य मिळू शकते नोकरी व्यवसायात तुमची खूप प्रगती तसेच उन्नती होईल आपणास मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे तुम्ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्थ आहात स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा कालावधी अत्यंत चांगला राहील आदरणीय व धार्मिक व्यक्तींचा सहवास मिळेल.
शुभ दिनांक : ४, ९, १२, १५, १६, २१, २५, २७
अशुभ दिनांक : ६, ८, ११, १७, २२, २३, २४, २६
मकर रास
ओळख, मध्यस्थी फलद्रुप होतील
उत्तरा शाळा नक्षत्राचे दुसरा चरण, तिसरे चरण, चौथे चरण. नक्षत्राचे चार चरण. धनिष्ठा नक्षत्राचे पहिले चरण. दुसरे चरण मिळून नक्षत्र चरणांची मकर रास तयार होते. पहिल्या पंधरा अंशापर्यंतच्या भागात निरुपद्रवता. संतोषी वृत्ती, स्वच्छंदी विचार हे हरणाचे गुण आढळतात. मकर राशीचे बाकीचे शरीर मगरीचे आहे. दुसऱ्या १५ ते ३० अंशापर्यंत दुर्बल आणि आक्रमण प्रबलांशी नमते घेणे. संधी साधून कार्य करणे, आपल्या घरी बलवान असणे इत्यादी गुण आढळतात
शिक्षण : शिक्षणासाठी सदस्य कालावधी आपणास अतिशय चांगला आहे. बौद्धिक क्षमता चांगली राहणार आहे. सर्व क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगला कालावधी असणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सुद्धा अनुकूलता मिळेल. परदेशातून चांगल्या संधी येतील. परदेशी शिक्षण घेणाऱ्या जातकांना उत्तम काळ. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. प्रसिद्धी, आर्थिक लाभ मिळेल.
पारिवारिक : कलाकार व क्रीडा क्षेत्रातील जातकांना उत्तम कालावधी आहे. प्रसिद्धीसह अर्थमान सुधारेल. परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात मंगलकार्य ठरेल अथवा मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते. तरुण-तरुणींना कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. ओळख, मध्यस्थी उपयोगी पडेल. दीर्घकाळ रखडलेले जमिनीचे तसेच स्थायी संपत्तीचे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतील. त्यातून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात वादग्रस्त वसुली होईल. धांदरटपणा सांभाळा. उत्तरार्धामध्ये सरकारी कामे होतील. समज-गैरसमज टाळा, रंगाचा बेरंग होऊ देऊ नका.
नोकरी, व्यवसाय, धंदा : अनुकूल ग्रहमान आपल्याला लाभलेले आहे. त्यामुळे सकारात्मक घटना घडतील. गुरू ग्रहाची आपणास कमी साथ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला असे काम करावे लागण्याची शक्यता आहे, की त्यातून तुम्हाला कमी फायदा होऊ शकतो. कोणताही धोका स्वीकारून निर्णय घेऊ नका. त्यातून त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण जे कार्य कराल त्यात आपणास हवे तसे श्रेय मिळणार नाही. या काळात आपण धार्मिक कार्य कराल. समाजिक कार्य कराल. तुमची वागणूक खूप चांगली असणार आहे. तुम्ही धर्म आणि अध्यात्मात रुची घ्याल. खासगी आणि व्यावसायिक भागीदारी लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला चांगला अधिकार प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी आणि मित्रमंडळींच्या वर्तुळात कुटुंबीयांशी चांगले संबंध कसे ठेवावे त्याचे ज्ञान तुम्हाला आहे. कुटुंबात आनंद असेल. उत्साह असेल. व्यावसायिक आघाडीवर फारसे उत्साहवर्धक वातावरण असणार नाही. याचा मनस्ताप व त्रास जास्त करून घेऊ नका. अपेक्षाभंगाने किंवा भावनेच्या भरात कोणते निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये जरी असमाधान असले तरी आपले कार्य पूर्ण करा. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष करू नका. त्यामुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. त्या सर्व गोष्टींवर सकारात्मकतेने व आत्मविश्वासाने कार्य करावे. त्यातून चांगला निकाल मिळेल, शिवाय आर्थिक स्थितीही सुधारेल. आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. भाजणे, कापणे या गोष्टींपासून सावध राहावे. आपणास चांगले परिणाम मिळतील. नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे जीवन सकारात्मक राहील. जोडीदाराच्या माध्यमातून लाभ मिळतील. चांगले प्रवास होतील. उच्च शिक्षण संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय विस्तार या दृष्टीने हा कालावधी अनुकूल असणार आहे. व्यापार, व्यावसायिक किंवा नोकरीतून चांगले निष्कर्ष निर्माण होतील. आपल्या कामासंबंधी काही ध्येय गाठायची होती त्यात आपणास निश्चित यश मिळणार आहे. त्यामुळे समाधान मिळेल. या काळात सकारात्मकतेने आणि चेतनाने कसे जगावे याची कला तुमच्याजवळ असणार आहे. प्रवास ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भरपूर संधी या काळात उपलब्ध होतील. विरुद्ध लिंगी व्यक्तींकडून आपणास सहकार्य मिळू शकते. आदर व मानसन्मान मिळेल. तुमचे जीवन स्थिर होण्यासाठी प्रयत्न करत आहात. त्यात यशस्वी होणार आहात. मौल्यवान वस्तू तसेच स्थायी संपत्ती, वाहन खरेदीचा योग आहे. तुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर चांगला प्रकाश पडणार आहे. तुम्हाला कामाचे श्रेय नक्कीच मिळणार आहे. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्णपणे पार पाडणार आहात. तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी चांगली संबंध असतील. तुम्हाला एक चांगली ओळख मिळणार आहे. राहणीमान उच्च स्तरावर जाईल.
शुभ दिनांक : - ३, ७, १२, १४, १५, १६, २१, २७, २९, ३०, ३१
अशुभ दिनांक : - ६, ८, ११, १७, २२, २३, २४, २६