

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
कुंभ
नवपरिणीतांचे भाग्योदय
धनिष्ठा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण शतकारका नक्षत्राचे चार चरण पूर्वा भाद्रपदाचे पहिला दुसरा व तिसरा चरण मिळून नऊ चरणांनी कुंभ राशी तयार होते.धनिष्ठा नक्षत्राची नाडी मध्ये आहे योनी सिंह आहे गण राक्षस आहे आराध्य वृक्ष शमी आहे दान सोने रुपे आहे देवता वसु आहे मुख ऊर्ध्व असून दृष्टी अंदाज गुरु मंगळ तत्त्व पृथ्वी व संज्ञा चर आहे. शततारका नक्षत्राची नाडी आद्य योनी अश्व आहे गण राक्षस आहे आराध्यक्ष कळंब आहे दान साखर देवता वरुण आहे मुख ऊर्ध्व दृष्टी अंध आहे गुरु मंगळ तत्व पृथ्वी संज्ञा चर आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची नाडी आद्य योनी सिंह गण मनुष्य आराध्य वृक्ष आम्र आहे देवता अजयक चरण अहि दृष्टी चीवीट स्वामी गुरु तत्व अग्नि संज्ञा उग्र आहे.
शिक्षण : शिक्षणा साठी ग्रहमान अतिशय चांगले आहे आपली ग्रहण शक्ती आकलन शक्ती चांगली राहील सकारात्मक राहील त्यामुळे केलेला अभ्यास लक्षात राहील परंतु अभ्यास करताना इतर गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत हे लक्षात ठेवा अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास अतिशय उज्वल यश मिळू शकते कला व क्रीडा क्षेत्रातही चांगल्या संधी मिळू शकतात स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवू शकाल प्रयत्नांची जोड असल्यास ते प्रयत्न योग्य दिशेने केले गेल्यास उज्वल यशाची खात्री आहे.
पारिवारिक : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अथवा कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नका नुकसान संभवते सध्याचा काळ हा बुद्धिजीवी मंडळींना वाव देणारा ठरू शकतो नवे पर्यायी मार्ग मिळतील व्यवसायामध्ये विशेष नवीन नवीन संधी निर्माण होतील त्यामुळे उत्पन्न वाढेल कुटुंब परिवारातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल मात्र कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य चिंता सतावू शकते त्याचप्रमाणे दुखापती पासून सावध राहावे चालू नोकरीमध्ये आचारसंहिता पाळणे गरजेचे राहील वरिष्ठांची मते लक्षात घ्यावीत त्यांच्या मताला प्राधान्य द्यावे त्यांच्याशी जपून वागावे काही वेळेस संमिश्र स्वरूपाची फळे प्रतिपादित होऊ शकतात सार्वजनिक वादात पडू नका या कालावधीचे उत्तरार्धामध्ये वैवाहिक जीवनात चांगल्या वार्ता मिळतील समाधानी राहाल.
नोकरी, व्यवसाय, धंदा : या कालावधीमध्ये नवपरिणीतांचे भाग्योदय होऊ शकतात राहत्या जागेचा प्रश्न संपुष्टात येऊन दिलासा मिळेल नवीन जागेत प्रवेश करू शकाल त्याचप्रमाणे अपत्य योग कोण आहे कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील कुटुंबवृद्धीचे योग मात्र कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे कुटुंब परिवारातील तरुण तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील नोकरी विषयक प्रश्न संपतील नोकरी मिळेल पूर्वी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरतील त्याचप्रमाणे तरुण-तरुणींच्या विवाह ठरण्यातील अडचणी दूर होऊन विवाह ठरतील काहींचे प्रेम विवाह ठरतील.
शुभ दिनांक : 2,8,9,11,16,17,19,20,24,27
अशुभ दिनांक : 13,14,15,28,30
मीन
भाग्यसंकेत मिळतील
पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा चौथा चरण उत्तराभाद्रपद नक्षत्राचे चार चरण व रेवती नक्षत्राचे चार चरण असे नऊ चरण मिळून मीन राशी तयार होते. पूर्वा भाद्रपदा या नक्षत्राची नाडी आद्य आहे योनी सिंह आहे गण मनुष्य आहे आराध्य वृक्ष आम्र आहे दान सोने व देवता अजय चरण आहे मुख अधो दृष्टी चीवीट आहे स्वामी गुरु तत्त्व पृथ्वी संज्ञा उग्र आहे. उत्तरा भाद्रपदा या नक्षत्राची नाडी मध्य गण मनुष्य योनी गो आहे आराध्य वृक्ष कडुलिंब आहे देवता अहिरबुद्ध आहे मुख ऊर्ध्व दृष्टी सुलोचना आहे स्वामी शनी तत्त्वजल व संज्ञा ध्रुव आहे. रेवती या नक्षत्राची नाडी अंत्य योनी गज आहे गण देव आहे आराध्य वृक्ष मोह आहे दान मद्द देवता पुशा आहे. मुख तीरीयक दृष्टी अंध आहे स्वामी बुध तत्त्व जल संज्ञा मृदू आहे.
शिक्षण : कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण लाभलेले आहे सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी अनुकूलता मिळेल कला व क्रीडा क्षेत्रात उत्तम यश लाभेल त्यातून नवीन नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आपले कर्तृत्व सिद्ध करू शकाल परदेशातील शिक्षणासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील योग्य दिशेने प्रयत्न केल्यास चांगले यश मिळेल धाडसी निर्णय घेऊ शकता आपली ग्रहण क्षमता उत्तम असल्याने केलेला अभ्यास लक्षात राहू शकतो पण कष्ट करा.
पारिवारिक : कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे बहुतेक प्रश्न सुटतील अथवा मार्गी लागतील मनाला समाधान देणाऱ्या बातम्या मिळतील नैराश्य जाईल आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे मोठे मोठे लाभ होऊ शकतात बुद्धी कौशल्यातून मोठे लाभ मिळू शकतात नोकरीमध्ये मानसन्मान मिळेल विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील सरकारी ओळखी मध्यस्थी उपयोगी पडून आपली महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील महत्त्वाचे ठरेल कुटुंब परिवारामध्ये तसेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये स्त्री वर्गाशी वाद घालू नका ते आपल्या हिताचे राहील.
नोकरी, व्यवसाय, धंदा : आपल्या नोकरीतील करिअर साठी अतिशय अनुकूल कालावधी आहे आपण आत्तापर्यंत केलेल्या कामाचे शुभ फळ आपल्याला मिळेल अपेक्षित घटना घटित होण्याबरोबर काही अनपेक्षित घटना घडू शकतात त्यामुळे आपल्याला आश्चर्यचकित होण्याची वेळ येईल नोकरीतील कामांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात त्याचप्रमाणे स्थान बदलही होऊ शकतो आपल्या अधिकार कक्षा रुंदावतील एखादी मोठी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल अर्थातच त्याचा मोबदला सुद्धा मिळेल नोकरीद्वारे परदेश गमन होऊ शकते वेतन वृद्धी तसेच पदोन्नतीचे योग आहेत सरकारी नोकरीमध्ये अतिरिक्त कार्यभार स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे मात्र लहान मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त रहा पूर्वार्धा मध्ये वाहन चालवताना सावध राहणे गरजेचे आहे वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा हाता पायाच्या दुखापतीला जपा कुटुंब परिवारात प्रिय व्यक्तींची कार्य ठरतील.
शुभ दिनांक : 4,5,8,9,17,23,24,27
अशुभ दिनांक : 13,14,15,28,30