

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मेष
नवीन नवीन संधीची उपलब्धता
मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्राचे चार चरण असतात. भरणी नक्षत्राचे चार चरण आणि कृतिका नक्षत्राचे पहिले चरण असे मिळून नऊ चरण एकत्रित येऊन मेष रास तयार होते. अश्विनी नक्षत्राचे नाडी आद्य आहे. योनी अश्व आहे. अश्विनी नक्षत्राचे गण देव आहे. आराध्य वृक्ष कुचला हा आहे. अन्न देवता अश्विनी कुमार आहे. मुख तिरपक व दृष्टी मंद असते. अश्विनी नक्षत्राचे स्वामी केतू आहे. तत्त्व वायू संज्ञा क्षीप्र असते. भरणी नक्षत्रामध्ये नाडी मध्य असते. योनी गज आहे. गण मनुष्य आहे. आराध्य वृक्ष आवळी हा आहे. दान श्वेतवस्त्र व देवता यम आहे. नक्षत्राचे मुख अधो व दृष्टी चिवट असते. भरणी नक्षत्राचे स्वामी शुक्र तत्त्व अग्नी व संज्ञा उग्र असते. कृतिका नक्षत्र नाडी अंत्य योनी मेष आहे. गण राक्षस व आराध्य वृक्ष उंबर हा आहे. दान सुवर्ण आहे. देवता अग्नी आहे. मुख अधो व दृष्टी सुलोचन आहे. स्वामी रवी आहे. तत्त्व अग्नी व संज्ञा मिश्र आहे.
शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विभागासाठी शिक्षण घेण्यात अनुकूल कालावधी आहे. त्याचप्रमाणे कला व क्रीडा क्षेत्रात विशेष यश व मनासारखे यश प्राप्त होऊ शकते. परंतु अभ्यासामध्ये सातत्य व प्रामाणिकपणा हवा आहे. त्याचप्रमाणे प्रयत्नांमध्ये कमी पडू देऊ नका. परदेशासंबंधी शिक्षणासाठी चांगले ग्रहमान असल्याने प्रयत्न यशस्वी होतील. परंतु त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे ठरविले असल्यास आपली इच्छा पूर्ण होईल. गुरुजनांची मदत मिळेल. त्याचप्रमाणे मार्गदर्शनही लाभेल.
पारिवारिक : कुटुंबामध्ये तसेच आपल्या कार्यक्षेत्रात एकूणच जास्तीच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. त्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडताना धावपळ होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या- मोठ्या तक्रारी असू शकतात किंवा मतभेद असू शकतात. त्यामुळे आपल्या स्वतःच्या स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता आहे. अशा वेळेस सकारात्मक विचार करणे व मन शांत ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील समस्या, प्रश्न शांतपणे पूर्ण विचारांती सोडवा. त्यामुळे घरातील आनंद टिकून राहील. कोणतेही मतभेद अथवा वादविवाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. एकूण घरातील वातावरण समाधानकारक राहण्यासाठी व ते टिकवण्यासाठी आपण योग्य दिशेने प्रयत्न कराल.
नोकरी, व्यवसाय, धंदा : - कुटुंबातील तरुण-तरुणींना नोकरीच्या संधी मिळतील. कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरून नोकरीसाठी बोलवणे येऊ शकते. त्याचप्रमाणे चालू नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. अपेक्षित घटना घटित होतील. पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळू शकते. विवाहयोग्य तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येण्याच्या संधी मिळतील. कुटुंबात मंगलकार्य ठरेल विद्यार्थी-विद्यार्थिनींना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. स्पर्धापरीक्षांत यश मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंबात ज्या प्रसंगांवरून वादविवाद निर्माण होतील.
शुभ दिनांक : 2, 4, 5, 8, 11, 16, 17, 19, 20, 24
अशुभ दिनांक : 13,14,15, 28, 30
वृषभ
शुभ ग्रहांची मोठी साथसंगत
वृषभ राशीमध्ये कृतिका नक्षत्राचा दुसरे, तिसरे आणि चौथे चरण. रोहिणी नक्षत्राचे चौथे चरण व मृग नक्षत्राचे पहिले व दुसरे चरण मिळून नऊ चरण एकत्रित होऊन वृषभ रास तयार होते. कृतिका नक्षत्राची नाडी अंत्य आहे. योनी मेष आहे. गणराक्षस आहे. आराध्य वृक्ष उंबर आहे. दान सुवर्णाचे देवता अग्नी मुख अधो व दृष्टी सुलोचना असते. या नक्षत्राचे स्वामी रवी आहेत. तत्त्व अग्नी व संज्ञा मिश्र असते. रोहिणी या नक्षत्राची नाडी अंत्य योनी सर्प आहे. गण मनुष्य आहे. आराध्य वृक्ष जांभळी हा आहे. दान दूध असून देवता ब्रह्मा आहे.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल ग्रहमान आहे. विशेषतः कला व क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश येण्यासारखे आहे. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विभागात अनुकूल ग्रहमान शिक्षण घेण्यासाठी असल्यामुळे आपले प्रयत्न त्या दृष्टिकोनातून हवेत. चांगले यश येण्यासारखे ग्रहण असले तरी आपल्याला प्रयत्नात सातत्य टिकविण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्नांची आवश्यकता लागणार आहे. त्याचप्रमाणे वेळ इतरत्र वाया न घालवता, त्याचप्रमाणे कुसंगत टाळणे महत्त्वाचे ठरू शकते.
पारिवारिक : परिवारामध्ये अतिशय चांगले वातावरण असणार आहे. खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिकदृष्ट्या चांगली परिस्थिती राहिल्याने परिवारातील प्रत्येक सदस्याच्या मागण्या आपण पूर्ण करू शकाल. त्यामुळे समाधान मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहिल्याने उत्पन्न वाढेल. संततीला भाग्योदयाच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक सौख्य चांगले राहील. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. जोडीदाराला उष्णतेच्या विकारांपासून त्रास होण्याची शक्यता.
नोकरी, व्यवसाय, धंदा : सदरील काळामध्ये व्यावसायिक कोंडी फुटेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करता येतील. ज्या कामात जास्तीचे पैसे लागत होते अशी कामे अर्थ पुरवठा मिळाल्यामुळे पूर्ण करता येतील. शिवाय व्यावसायिक उलाढाल वाढून उत्पन्नातही वाढ होईल. कलाकार व खेळाडूंना पूर्ण वाव मिळेल. नवनवीन संधी उपलब्ध होतील. चालू नोकरीमध्ये गटबाजी व राजकारणापासून अलिप्त रहा. कामाचा ताण वाढणार आहे. पण आपण फार आक्रमक होऊ नका अथवा निराश होण्याचीही आवश्यकता नाही. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर तसेच कुटुंबात वादविवाद टाळणे महत्त्वाचे राहील. ज्या कारणांनी वादविवाद निर्माण होऊ शकतात अशा प्रसंगांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आपल्या बुद्धीचातुर्याने व संवाद कौशल्याने आपण आपल्या विरुद्ध गेलेल्या परिस्थितीवर विजय प्राप्त करू शकाल. त्याचप्रमाणे शत्रूंवर विजय मिळवता येईल. आपणास सर्व बाजूंनी यश मिळणार आहे. आपल्या प्रयत्नाने आपल्या उत्पन्नात भरीव वाढ होईल. शत्रू शांत होतील. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल.
शुभ दिनांक : 4, 5, 8, 9, 16, 17, 19, 20, 23, 27
अशुभ दिनांक : 13,14,15,28,30