'२४ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
'२४ मे'चे राशीभविष्य!

मेष - वाहने सावकाश चालवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. तसेच वाहतुकीचे नियम पाळा. वाद विवाद नको. भांडण टाळा. खेळाडूंना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळू शकेल. रोजगाराचा प्रश्न सुटेल.

वृषभ - सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्यायला सामाजिक मानसन्मान मिळेल. एखादे महत्त्वाचे पद मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यवसाय धंद्यात फायद्याचे सौदी हाती लागतील.

मिथुन - महत्वाची कामे होतील. विशिष्ट महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेता येतील. ओळखी पद्धतीतून विवाह ठरतील. व्यावसायिक मरगळ झटकली जाईल. वाहने सावकाश चालवा.

कर्क - कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील. स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणे आवश्यक आहे. खाण्या-पिण्याच्या बाबतीत सतर्क राहा. प्रवासात पथ्य सांभाळा. अनपेक्षितरित्या खर्च करावा लागेल.

सिंह - कोणतेही लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधान व सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणाच्याही गोड बोलण्याला फसू नका. कोणावरी अतिविश्वास घातक ठरू शकतो. अविस्मरणीय घटना घडेल.

कन्या - शालीनता ठेवणे महत्त्वाचे ठरेल. स्त्रीदाक्षिण्य राखा. नोकरीत अथवा आपल्या कार्यस्थळी समज-गैरसमज यामुळे भांडणे होण्याची शक्यता आहे. व्यवसाय धंद्यात मृदू बोलणे आवश्यक ठरेल.

तूळ - कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या विवाह निश्चित होण्यामधील अडचणी अथवा समस्या दूर होतील. ओळखी मध्यस्तीद्वारे विवाह ठरतील. मुला मुलींचे उत्कर्ष होतील.

वृश्चिक - व्यवसाय धंद्यात अथवा नोकरीमध्ये बोलणे चालणे आवरून नाट्यमय प्रसंग घडून कलह सदृश्य घटना घडू शकतात. वादविवाद टाळा. गैरसमज टाळा. प्रवास घडू शकतात.

धनु - वैवाहिक जीवनात विसंवाद घडू शकतात. वेळीच त्याला आवर घालणे गरजेचे ठरेल. जीवनसाथीच्या मताला प्राधान्य द्या. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये गैरसमज टाळा.

मकर - महत्त्वाचा कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पण संयम दाखवल्यास काम प्रयत्नांद्वारे पूर्ण करणे शक्य होईल. नोकरीतील नव्या बदलातून लाभ होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

कुंभ - शारीरिक दुखापतीपासून दूर राहा. वाहने काळजीपूर्वक चालवा. वाहतुकीच्या नियमांचे अवश्य पालन करा. व्यवसाय धंद्यामध्ये यंत्रांच्या देखभालीचा खर्च वाढू शकतो.

मीन - नोकरीत अनुकूलता लाभेल. वरिष्ठांचे संबंध सुधारतील. मात्र कोणावरही शेरेबाजी करू नका. व्यवसाय धंद्यात व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार करू शकाल.

logo
marathi.freepressjournal.in