'२६ मे'चे राशीभविष्य!

'२६ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
Published on

मेष - एकूणच अडचणी दूर झाल्यामुळे आनंद आणि उत्साह यामध्ये वाढ होईल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. यशाचे प्रमाण वाढते राहील. मात्र स्वतःच्या क्रोधाला आवर घातला पाहिजे.

वृषभ - भावनेच्या भरात येऊन तडकाफडकी निर्णय घेऊ नका. नुकसानीस आमंत्रण ठरेल. महत्त्वाची कामे मात्र पूर्ण होतील. शांतपणे आणि संयमाने आपले पुढील निर्णय घ्या.काहींना प्रवास करावा लागेल.

मिथुन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विविध मार्गांनी धन प्राप्ती होऊ शकते. व्यवसाय धंद्यात उधारी वसूल होईल. एखादी चांगली संधी चालून येईल. त्यामध्ये तुमचा फायदा असेल.

कर्क - कुटुंब परिवारातून सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय धंद्यात भरभराटीची शक्य.ता आपण काही धाडसी निर्णय घेतल्याने व्यवसायात फायदा होईल. नोकरीत बदली होऊ शकते.

सिंह - धाग्याची चांगली साथ राहिल्यामुळे अनुकूलतेमुळे वाढ दिसेल. काही कामासाठी अचानक प्रवास करावा लागण्याची शक्यता. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल.

कन्या - आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील, मात्र कामाची व्याप्ती वाढल्यामुळे दगदग होईल. आपल्याला झेपेल एवढीच जबाबदारी स्वीकारा. कुटुंब परिवारात मधुर भाषिक व्हा.

तुळ - भागीदारीच्या व्यवसायात भागीदारी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. त्याचे म्हणजे नीट समजावून घेणे गरजेचे ठरेल, तसेच लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे राहील.

वृश्चिक - आर्थिक आवक सर्वसामान्य राहील. मित्रमंडळींच्या समवेत मौजमजेत दिवस जाईल, मात्र व्यसनांपासून दूर राहा. कुटुंब परिवारात उत्साही वातावरण राहील. खर्चाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल.

धनु - कौटुंबिक सौख्य मिळून संततीच्या यशाच्या वार्ता कानी आल्यामुळे कुटुंब परिवारामध्ये आनंद द्विगुणित होईल. नोकरीमधील आपल्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक भरभराट होईल.

मकर - नोकरीत अनुकूलता लाभेल, मात्र काहींना अचानक बदलेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कामाच्या स्वरूपात बदल होईल, तसेच स्थान बदली होऊ शकतो.

कुंभ - काही अनुकूल घटना घडल्यामुळे आनंदी दिवस जाईल. आत्मविश्वासात वाढ होईल, मात्र उत्साहाच्या भरात घरातील बाबींकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथी बरोबर वाद विवाद घडू शकतात ते टाळा.

मीन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता. पूर्वी दिलेली येणे अचानक वसूल झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. वडिलोपार्जित संपत्ती संबंधी सकारात्मक हालचाली होतील. बोलणी सफल ठरतील.

logo
marathi.freepressjournal.in