मार्च महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे मार्च महिना? जाणून घ्या...
मार्च महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मेष

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

मेष राशी मध्ये अश्विनी नक्षत्र येते या नक्षत्राचा आराध्य वृक्ष कुचला आहे त्याची पाने फळे मूळ साल सर्व भाग विषारी आहेत त्याला जहर कुचला असेही म्हणतात पण त्याला शुद्ध करून वापरल्यास औषधी गुणतत्त्वे आढळतात काही ठिकाणी आराध्य वृक्ष वासा म्हणजे अडुळसा सांगितले आहे त्यामुळे कफदोष हृदय दोष नाहीसे होतात पानांचा उपयोग कपड्यातील कसर नाहीशी करण्यासाठी होतो या वृक्षाचे पान फळ साल मूळ जवळ ठेवावी भरणे नक्षत्राचे आराध्य वृक्ष आवळी आहे. या वृक्षाचे औषधी गुण आढळतात तसेच या वृक्षाचे फळ पान साल मूळ जवळ बाळगावी तिसऱ्या नक्षत्र म्हणजे कृतिका या नक्षत्राचा आराध्य वृक्ष औदुंबर आहे म्हणजेच उंबर आहे हा वृक्ष सुद्धा औषधी गुणांनी युक्त आहे हे नक्षत्र ज्या व्यक्तींचे आहे अशा व्यक्तींनी या वृक्षाचे पानफळ साल मूळ जवळ बाळगावी आपल्या नक्षत्र स्वामीचा आराध्य वृक्षाचे पान फुल साल मूळ जवळ ठेवल्याने प्रगती होत असते व व्यक्ती अथवा जातक सकारात्मक विचार ठेवत असतो तसेच आपल्या आराध्य वृक्षांची झाडे लावणे संगोपन करणे असे कार्य करून जातकाची प्रगती होत असते व त्याच्या आजूबाजूस सकारात्मक ऊर्जा कायम राहते म्हणून आपल्या नक्षत्राच्या आराध्य वृक्षाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

शिक्षण - सध्याच्या काळामध्ये आपल्या शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला परिस्थिती चातुर्याने हाताळावी लागणार आहे शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घेण्याची गरज आहे निर्णय घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे घाई गर्दी करू नये. प्रयत्नपूर्वक आपल्याला आपला अभ्यास पूर्ण करावा लागेल अभ्यासामध्ये सातत्य टिकवण्यासाठी आपल्याला इतर गोष्टींमध्ये जो वेळ जात असेल तो टाळणे गरजेचे आहे वेळेचे नियोजन उपयोगी पडेल तसेच अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे योग्य ठिकाणी धाडस व योग्य प्रयत्न आपणास यश प्राप्त करून देईल परदेशातील शिक्षणासाठी तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना पण योग्य प्रयत्न वआपले धाडस यश मिळवून देतील त्यामुळे प्रयत्नशील राहा.

पारिवारिक - कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहणार आहे परंतु काही वेळेस घरातील सदस्यांच्या मध्ये मतभेद होऊ शकतात ते न होण्यासाठी व चांगले संवाद साधल्यास गैरसमज दूर होऊन मतभेद मिटतील आर्थिक दृष्टीने उत्पन्न चांगले राहणार आहे बचत मात्र कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे खर्च वाढतील काही वेळेस आर्थिक चढ-उतार जाणवण्याची शक्यता आहे.

नोकरी व्यवसाय धंदा - आपण आतापर्यंत ज्या गुंतवणूक केल्या होत्या त्यातून घवघवीत लाभ प्राप्त होऊ शकतो मात्र नवीन गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरू शकतो हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे शेअर मार्केट सट्टा बाजार जुगार सदृश्य व्यवहार इत्यादी गोष्टींच्या मध्ये गुंतवणूक करताना दहा वेळा विचार करा शांतपणे विचार करून मगच निर्णय घेणे हितकारक ठरेल कुटुंब परिवारातील सदस्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकाल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील त्यामुळे खर्च सुद्धा मुक्तहस्ते कराल घराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करायला त्याचप्रमाणे भौतिक सुख सुविधांच्यासाठी खर्च होईल. आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी धंदा व्यवसायात तसेच कुटुंब परिवारात आपल्याला वाढते सहकार्य मिळाल्यामुळे कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल आपल्या शब्दाला प्राधान्य मिळेल कुटुंबातील मुला-मुलींच्या चिंता मिटतील. सहकुटुंब सहपरिवार लांबच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने कुसंगती पासून दूर राहणे हितकारक ठरेल.

शुभ दिनांक - १,७,१५,१९,२४,२६,२७,२८,२९,३०,३१

अशुभ दिनांक - २,३,४,१०,११,१७,१८,२२,२३

वृषभ

परिस्थितीजन्य लाभ

वृषभ राशि मध्ये कृतिका रोहिणी आणि मृग नक्षत्रांचा समावेश होतो.त्यातील कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष औदुंबर आहे या झाडाचे पान फळ साल मूळ बाळगल्यास या नक्षत्राच्या लोकांना नक्कीच त्याचा फायदा होतो व त्या जातकाची प्रगती होते औदुंबर हे झाड औषधी गुणांनी युक्त आहे रोहिणी नक्षत्राच्या जातकांनी जांभूळ या वृक्षाचे पानफळ फुल साल मूळ हे जवळ बाळगावे जांभूळ हा रोहिणी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे तसा तो औषधी गुणांनी ही युक्त आहे. मृग नक्षत्राच्या यातकांचा आराध्य वृक्ष खैर आहे खैरवृक्षाचे पंचांग म्हणजे पान फुल फळ साल मूळ यापैकी काहीही जवळ बाळगल्यास जातकाचा विचार सकारात्मक राहून आरोग्य सुधारते व मानसिकतेचा समन्वय साधून प्रगती कारक व सकारात्मक ऊर्जा आजूबाजूच राहते तसेच या झाडाचे औषधी गुणही आहेत आपल्या नक्षत्राच्या आराध्य वृक्षाचे संगोपन करणे हे पण हितकारिक असते.

शिक्षण - शिक्षणासाठी ग्रहमान चांगले आहे परंतु अभ्यासात सातत्य व प्रामाणिकपणा हवा त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे कला व क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती होईल साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश मिळू शकते प्रसिद्धी मिळेल अर्थमान उंचावेल कला व क्रीडा क्षेत्रात सुद्धा चांगले संपादित करता येण्यासारखे आहे परदेशासंबंधी शिक्षणासाठी अतिशय अनुकूल कालावधी आहे कोणताही निर्णय घाई गर्दीत घेण्याचे टाळा.

पारिवारिक- वृषभ राशीच्या जातकांना आपल्या कुटुंब परिवारात जास्त जबाबदारी स्वीकारावी लागेल तसेच कुटुंब परिवारातील वादविवादावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आपल्या पुढाकाराने या वाद विवाद आपण योग्य तो तोडगा काढू शकाल व कुटुंब परिवारातील वातावरण शांत राहील व समाधानकारक वातावरणाची निर्मिती होऊ शकेल

नोकरी व्यवसाय धंदा - आत्ता पर्यंत आपण नोकरीत घेतलेल्या कष्टाचे अथवा परिश्रमाचे योग्य ते फळ आपल्याला मिळेल वरिष्ठ आपल्या कामावरती खुश असतील एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल नोकरीच्या कामानिमित्त परदेशगमन ही होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील बरोबरील सहकारी वाढते सहकार्य देतील. असेल स्वतंत्र व्यापार व्यवसाय व्यवसायिकांना अतिशय चांगला कालावधी आहे आपण आपल्या व्यवसाय धंद्यात नवीन संकल्पनांचा योग्य वेळी व्यापार करू शकाल त्याचा परिणाम म्हणून आपल्या व्यापार धंद्यात वाढ होऊन नवीन नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण होतील व्यवसाय विस्तारासाठी योग्य कालावधी त्याचप्रमाणे व्यवसायात बदलही करू शकाल अथवा एखादा जोडधंदा सुरू करू शकाल आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याने आपले रोजचे जीवनमान बदलेल मात्र कायदेशीर व सरकारी बाबतीत खूप दक्ष राहणे जरुरीचे आहे अति आत्मविश्वासामुळे आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडू शकतात मालाच्या किंवा इतर खरेदी विक्रीतून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण दक्ष राहणे जरुरी आहे घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

शुभ दिनांक -१,७,५,१५,१९,२०,२४,२६,२८,२९,३०,३१

अशुभ दिनांक - २,३,४,१०,११,१७,१८,२२,२३

logo
marathi.freepressjournal.in