

डॉ. सविता महाडिक ज्योतिष भूषण
सिंह रास-
कलाकार व बुद्धिजीवी मंडळींचा मानसन्मान
सिंह राशि मध्ये बघा पूर्व फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रांचा समावेश असतो मग हा नक्षत्राचा आराध्य वृक्ष वड हा आहे वडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेतच शिवाय वडाची छाया ही शितल आहे या झाडाचे पंचांग म्हणजेच पान फुल फळ साल मूळ हे या नक्षत्राच्या व्यक्तींनी जवळ ठेवल्यास सकारात्मकता वाढते व चौफेर प्रगती होऊ शकते पूर्वा फालगुनी या नक्षत्राचा आराध्य वृक्ष पळस हा आहे पळसाचे अनेक औषधी गुणधर्म ही आहेत तसेच पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या व द्रोण आपण जेवणावळीत वापरतो पळसाच्या वृक्षाचे पंचांग म्हणजेच पान फुल फळ साल मूळ जवळ ठेवल्यास सकारात्मक जातकाची प्रगती होते उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष पायरी हा आहे म्हणजेच पिंपरी आहे या वृक्षाचे औषधी गुणधर्म आहेत या झाडाचे पंचांग म्हणजेच पान फुल साल मूळ जवळ ठेवल्यास या नक्षत्राच्या व्यक्तींनी त्रि बाळगल्यास त्यांना त्याचा चांगला फायदा होतो.
शिक्षण- शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेण्यास अनुकूल कालावधी आहे आपले प्रयत्न यशस्वी होतील ग्रहण अनुकूल असल्यामुळे आपल्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल परंतु प्रयत्न मात्र योग्य दिशेने करणे गरजेचे आहे कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश मिळेल परदेशासंबंधी शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल त्याचप्रमाणे शिक्षणात भाग्यवंती होताना दिसेल.
पारिवारिक- कुटुंब परिवारातील वातावरण सर्वसामान्य म्हणजेच नेहमीसारखी राहील परंतु काही वेळेस जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते तसेच कुटुंब परिवारातील सदस्यांच्या मध्ये मतभेद होऊन वादविवाद घडू शकतात त्यामुळे वादविवाद निर्माण होतील अशा प्रसंगांच्याकडे दुर्लक्ष करणे हितकारक ठरेल अशा वेळेस आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील त्यामुळे कुटुंबातील सर्वांशी सुसंवाद साधून घरातील वातावरण शांत ठेवावे लागणार आहे त्यासाठी आपणास शांत व संयम ठेवणे गरजेचे आहे वेळप्रसंगी खर्चात वाढ होईल त्यामुळे जास्तीचा खर्च करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.
नोकरी व्यवसाय धंदा- पूर्वार्धा मध्ये कुटुंब परिवारातील तसेच आपले कार्यक्षेत्रातील वातावरणाकडे लक्ष द्या कोणत्याही प्रकारचे मतभेद टाळा लहान सहन कारणांवरून होणारे वादविवाद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा विशेषतः जोडीदारा बरोबर मतभेदाचे प्रसंग उद्भवू शकतात ते टाळा या कालावधी मध्ये मानवी उपद्रव होऊ शकतो कुटुंब परिवारात शांतता टिकवण्यासाठी आपला पुढाकार आवश्यक आहे भावंडांमध्ये मतभेद नकोत तसेच मित्र मंडळाच्या वर्तुळामध्ये कमीत कमी वेळ घालवा त्यामुळे मतभेद होणार नाहीत कलाकार व बुद्धिजीवी मंडळींचा मानसन्मान होऊ शकतो मानसन्मान बरोबर अथर्जनही वाढेल मानधनात वृद्धी होईल नवीन कामे मिळतील या कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात व्यवसाय धंदा नोकरी इत्यादी मध्ये स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. स्पर्धकांचे लक्ष आपल्याकडे असेल. त्यामुळे आपले कार्य आपल्याला लक्ष देऊन पूर्ण करावे लागेल विशेषतः व्यवसाया मध्ये स्पर्धक बलवान होऊ शकतात तसेच भागीदाराबरोबर मतभेद वादविवाद नकोत व्यवसायाच्या वाढीसाठी किंवा व्यवसायिक अनुकूलतेसाठी आपल्याला स्वतःच्या मताला नियंत्रणात ठेवावे लागेल. चालू नोकरीमध्ये आपल्याला जास्तीचे काम करावे लागणार आहे सतत ओढाताण होईल कुटुंब परिवारातील प्रिय व्यक्ती विषयी चिंता निर्माण होऊ शकते आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे वेळेसच लक्ष द्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता आहे
शुभ दिनांक- ५,७,१९,२४,२६,२७,२८,१९,३०,३१
अशुभ दिनांक- २,३,४,१०,११,१७,१८,२२,२३
कन्या रास-
प्रिय व्यक्तींचा गैरसमज
कन्या राशि मध्ये उत्तरा फाल्गुनी हस्त व चित्र या नक्षत्रांचा समावेश होतो उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष पायरी म्हणजेच पिंपरी आहे या पिंपरी अनेक औषधी गुणधर्म पहावयास मिळतात या पिंपरी वृक्षाचे पंचांग म्हणजे पान फळ फुल साल मूळ हे त्या जातकांनी जवळ ठेवलास अथवा बाळगल्यास सकारात्मकतेमध्ये वृद्धी होऊन प्रगती कडे वाटचाल होते हस्त नक्षत्राचा आराध्य वृक्ष जाई हा आहे जाईच्या झाडांचा वेल असतो सुवासिक फुले असतात तोंड आल्यावर जाईच्या पानांचा काढा करून लावतात परंतु हे डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे तसेच त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत झाडाला फळे येत नाहीत तर या झाडाचे पान फुल आठवा जाईच्या वेलाची काडी हस्तक्षेत्राच्या व्यक्तींनी जवळ ठेवल्यास त्याचा चांगला फायदा होतो चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष बेल हा आहेबेलाच्या झाडांच्या पानाचे औषधी उपयोग आहेत बेलाचे पान फळ साल मूळ जवळ ठेवल्यास अथवा बाळगल्यास त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतात व ते प्रगतीला पूरक होते.
शिक्षण- शिक्षणासाठी हा कालावधी सर्वसामान्य राहील परंतु अपेक्षित यश मिळवण्यासाठी आपणास जास्त प्रयत्न करावे लागतील अभ्यासामध्ये सातत्य व प्रामाणिकपणा पाहिजे जास्त परिश्रम घ्यावे लागतील मात्र कला व क्रीडा क्षेत्रात अनुकूलन निर्माण झालेली आहे त्यामुळे आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे अनेक संधी मिळतील परदेशासंबंधी शिक्षणात योग्य दिशेने प्रयत्न केले असते यशोदायक ठरू शकतात.
पारिवारिक- कुटुंब परिवारात अनुकूलता राहील चांगले वातावरण राहील उत्पन्नामध्ये वृद्धी झाल्याकारणाने कुठलीच कमतरता पडणार नाही तसेच घरात एखादी कार्य ठरू शकते आनंदाच्या प्रसंगासाठी पाहुणे येण्याची शक्यता आहे तसेच कुटुंब परिवारात मूल्यवान खरेदी होऊ शकते त्यामुळे जास्तीचा खर्च शक्य आहे कुटुंब परिवारातील सर्व सदस्यांचे वाढते सहकार्य मिळेल.
नोकरी व्यवसाय धंदा- सध्याचा कालावधी आपल्याला सावध करत आहे कोणाशीही वागताना अथवा बोलताना आपल्या वागण्या बोलण्यावरती नियंत्रण हवे तसेच विनयशीलता हवी कुटुंब परिवारात तसेच आपल्या मित्रमंडळींच्या वर्तुळात त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या बोलण्याचा विचित्र अर्थ घेतला जाऊन गैरसमज होऊ शकतात प्रिय व्यक्तींचा गैरसमज होऊ शकतो त्यामुळे विनयशीलता टिकवून ठेवा विशिष्ट कोर्ट प्रकरणांमधून यश मिळेल दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करू शकाल जमीन जुमला स्थायी संपत्ती वडिलोपार्जित संपत्ती याविषयी असलेले वाद-विवाद संपतील सर्वमान्य तोडगा मिळेल कुटुंब परिवारातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करू शकाल.आपल्या स्वतःच्या प्रकृतीची व स्वास्थ्याची काळजी घेणे जरुरीचे आहे प्रकृतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे जुन्या व्याधी नव्याने वर येऊ शकतात. आपल्या खाण्या पिण्याकडे लक्ष द्या आहारावर नियंत्रण जरुरीचे. पथ्ये असल्यास ती जरूर पाळा सरकारी कामे पूर्ण होतील पण कायद्याच्या चौकटीत राहून नियम व अटी पाळून कामे पूर्ण करा सरकारी कामात मनस्ताप होण्याची शक्यता आहे त्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होऊ शकतो व्यापार व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहिली तरी भागीदारीचे व्यवसायात भागीदारा बरोबर वाद विवादाची शक्यता आहे त्यामुळे तसे वाद विवाद टाळा.
शुभ दिनांक- १,५,७,१५,१९,२०,२४,२६,२७,२८
अशुभ दिनांक- २,३,४,१०,११,१७,१८,२२,२३