मे महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे मे महिना? जाणून घ्या...
मे महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य
मे महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मिथुन

ओळखी, मध्यस्थीतून मोठी कामे पार पाडाल

बोलकेपणा, विद्वान, विद्या व्यासंगी, निरनिराळ्या विद्यांमध्ये रुची घेणारा, पाठ शक्ती जास्त, पंडित, वक्ता, बुद्धिमान, कवी, ग्रंथकार, कारकून, साहित्य क्षेत्राशी जवळीक साधणारा, ललित कला संपन्न, मंजुळ व मितभाषी, प्रेमळ वर्तणुकीचा, बहुदा खरे बोलणारा, चिकाटी व निश्चय कमी, कधी कधी निर्णय घेण्यात विलंब लावणारा, स्त्रियांचा अभिलाषी, स्वरूपवान, सुखी, हनुवटीची ठेवण निमुळती असणारा, अवयव लांबट, डोक्याचा भाग मागच्या बाजूला नारळासारखा लांबट, शरीर सडपातळ, उंच, वृद्धपणी पोक येणारा, जास्त आहार असणारा, जेवणाची जास्त आवड असणारा, डोळे साधारण तांबूस, वकील, बातमीदार, असहिष्णू, शत्रूवर विजय मिळवणारा, अशी मिथुन राशीची लक्षणे आहेत. तर्क कुशल व बुद्धिजीवी माणसे या राशीच्या अमलाखाली येतात.

शिक्षण : शिक्षणासाठी हा कालावधी मिश्र स्वरूपाचा ठरू शकतो. त्यामुळे निश्चितच कष्ट व परिश्रम घेणे गरजेचे राहील. जास्त अभ्यास करावा लागेल, तरच आपल्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकते. योग्य प्रयत्न व सतत करावा लागणारा अभ्यास हा आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे न कंटाळता अभ्यास करावा. मन एकाग्र होण्यासाठी जास्त बैठक ठेवावी लागेल. इतरांचे मार्गदर्शन मिळू शकते. विद्यार्थ्यांना आपल्या मनाप्रमाणे अपेक्षित यश मिळेल.

पारिवारिक : कुटुंबातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. विशेषतः नोकरीविषयक काही समस्या असतील तर त्या सुटून नोकरी मिळू शकते. ओळखी, मध्यस्थीतून मोठी कामे होतील. सहकुटुंब सहल, कर्मणुकीचे योग आहेत. काहींना परदेशवारी घडू शकते. अमावास्येच्या जवळ मात्र भातृ चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कार्यातून विशेष सफलता मिळेल. कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी घेताना दिसतील. एकूणच परिवारातील वातावरण आनंदी व चांगले राहील.

नोकरी, व्यवसाय, धंदा : पूर्वार्धामध्ये व्यावसायिक आर्थिक कोंडी असल्यास ती फुटेल. व्यवसाय, धंद्यात जर आर्थिक मदतीची गरज लागली तर ती पूर्ण होईल. आर्थिक मदत मिळू शकेल. त्याचप्रमाणे बँकांची कामे होतील, तसेच व्यावसायिक येणी वसूल होतील. त्यामुळे अर्थमान उंचावेल. व्यवसायाच्या बाबतीत आपण वेगळा विचार करू शकाल. व्यवसाय, धंदा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे प्रयत्न सफल होतील. नोकरी, व्यवसाय, धंद्यानिमित्त प्रवासाचे योग आहेत. प्रवास कार्य सिद्ध होतील. अनुकूल ग्रहमानामुळे विशिष्ट परिस्थितीचा फायदा मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. आपण कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. कलाकार व खेळाडूंचे भाग्योदय चांगले होईल. सहकुटुंब, मित्रमंडळींसमवेत प्रवासाचे तसेच पर्यटनाचे योग आहेत, मात्र प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतर वाहनांशी स्पर्धा करू नका. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही अनुकूल कालावधी प्राप्त झाला आहे, त्याचा फायदा घ्या. व्यवसायात कालपरत्वे बदल करून प्रगती करू शकाल. भागीदारीत व्यवसायात प्रगती होऊ शकते.

शुभ दिनांक : ६, ७, ११, १३, २१, २४, २५, २८
अशुभ दिनांक : २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०

मे महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य
मे महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

कर्क

वास्तूविषयक व्यवहारातून लाभ

तिरपा व जलद चालणारा, शरीर सडपातळ व मध्यम उंच, पुढील दात रुंद व मोठे असून बोलताना सहज पुढे दिसणारे, चेहरा साधारण गोल व मोहक, हाताचे व पायाचे पंजे मोठे, असभ्य शब्दांचा जास्त वापर करणारा अथवा बोलणारा, चैनी, नाटकी, निष्काळजी बुद्धीने थोडासा कमी. वश प्रेमाच्या तडाख्यात सापडून विवंचनेत असणारा, बागबगीचे व जलाशय यांच्या सान्निध्यात राहण्याची आवड असणारा, देव व ब्राह्मण यांची पूजा करणारा, शरीरात कफ बाहुल्य, वारंवार शीत व्याधीने ग्रस्त, भावंडांत कन्याधिक्य, विशेष वडील बहिणींची संख्या जास्त, द्विभार्या संपन्नकुटुंबामध्ये विशेष सभ्य म्हणून गणला जाणारा, गुप्तरोगी, भित्रा, चंचल, कन्या संतती जास्त, संतती लवकर होणारी, अशी कर्क राशीची ठळक लक्षणे आहेत. दारू, मादक पदार्थ, मोती, मासळी यांचे व्यापार करणारे, मीठ तयार करणारे, खलाशी, पाणके व्यवसायाच्या व्यक्ती या राशीच्या अमलाखाली बहुतेक वेळा येतात.

शिक्षण : शिक्षणासाठी अतिशय उत्तम ग्रहमान आहे. शिक्षणातील सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूल कालावधी असल्यामुळे त्याचा विशेष फायदा घेऊ शकाल. अल्प प्रयत्नांनी आपल्याला अपेक्षित असलेले यश साध्य होईल त्याचा फायदा घ्या. प्रयत्नांमध्ये मागे राहू नका. इतरांची तसेच गुरुजनांची मदत मिळू शकते. विद्यार्थी, विद्यार्थिनींना परीक्षांमधून अपेक्षित यश मिळाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आपली बौद्धिक क्षमता चांगली राहील. कला व क्रीडा क्षेत्रातही आपण अपेक्षित यश मिळवू शकाल. परदेशासंबंधी शिक्षणासाठी मदत मिळू शकते, पण आपले प्रयत्न मात्र कायम राहावेत. योग्य दिशेने प्रयत्न झाल्यास आपण योग्य त्या यशाला आपल्याकडे खेचून आणू शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळण्याच्या संधी आहेत.

पारिवारिक : कुटुंबामध्ये संततीला उत्कर्षाच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धक यशातून नवीन मार्ग मिळतील. सरकारी कार्यामध्ये सफलता मिळू शकते. आईवडिलांमुळे फायदेशीर घटना घडवू शकतात. धनलाभाची शक्यता, व्यावसायिक आवक चांगली राहील. वैयक्तिक कामातून यश मिळेल. प्रवासामधून व्यावसायिक लाभ होतील. सहकुटुंब प्रवासाचे योग आहेत. काही वेळा अनपेक्षित लाभ होतील. स्वतंत्र व्यावसायिकांना वास्तूविषयक व्यवहारातून लाभ होतील. मोठे धनलाभ होण्याची शक्यता, नव्या परिणितांचे भाग्योदय होतील. शुभ वार्ता कानी येतील, मातृ-पितृ चिंता असू शकते.

नोकरी, व्यवसाय, धंदा : या कालावधीत धार्मिक अथवा सामाजिक कार्यात रूची घ्यावीशी वाटेल. मन अध्यात्माकडे धाव घेईल. धार्मिक, सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल, त्यासाठी खर्चही कराल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या अडचणी दूर होऊन विवाह निश्चित होतील. त्याचप्रमाणे नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. त्यांचे सहकार्यही लाभेल. घरात धार्मिक अथवा मंगलकार्य घडेल अथवा त्याचे नियोजन होईल. चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडतील.

शुभ दिनांक : ३, ९, १३, १८, २१, २४, २५, २८
अशुभ दिनांक : २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०

logo
marathi.freepressjournal.in