
डॉ.सविता महाडिक
ज्योतिष भूषण
मेष रास
व्यवसायात लाभदायक
मेष राशीच्या व्यक्ती या रागीट लहरी उष्ण प्रकृती असणाऱ्या पित्त व रागविकारांनी त्रास पावणारा तामसी हट्टी काटक उतावळा प्रवासाची आवड असणारा जलद चालणारा फिरते व्यवसाय करावयास विशेष आवडणारा डोळे पिंगट निग्रही केस अल्प उंच कृषी विद्या व बुद्धी कमी महत्वकांक्षा मोठी अल्प सुखी पवित्र वर्तणूक ठेवण्याविषयी जपणारा आर्थिक बाबतीत दोन वागणारा थोडासा अजगर कोणत्याही प्रकारचे अविर्भाव कमी भावंडांपासून तसेच पित्यापासून अलिप्त राहणारा जन्मभूमीपासून दूरदेशी राहण्याची आवड असणारा प्रसंगी दुसऱ्याचे नुकसान करण्यास न घाबरणारा भुतेखेते व नानाविध दैवत यांच्या उपासनेचा नाद असणारा कमी भोजन करणारा भाज्यांची आवड असणारा कोणालाही लवकर प्रसन्न होणारा चंचल बुद्धी कामी एकांत अधिकारी सेवा चतुर गुप्तपणे कामे करणारा पुत्र संतती वान कमी संतती असणारा अशी अनेक वैशिष्ट्ये आढळतात. ही राशी अत्यंत मेहनती व कष्टाळू आहे. परंतू या राशीवरील लोक अत्यंत कडक शिस्तीचे व काटेकोर असतात. त्यामुळे मेष राशीचे लोक सर्वसाधारणपणे सैन्य दल, पोलीस दलात दिसून येतात.
शिक्षण :- सप्टेंबर महिना हा आपल्या राशीच्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणार आहे. शिक्षणाचे नवीन अभ्यासक्रमाचे मार्ग मिळू शकतील. तसेच विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत राहणार आहे. शिक्षणासाठी उत्तम आहे कोणत्याही क्षेत्रातील शिक्षणासाठी कालावधी चांगला आहे अनुकूल राहणार आहे स्पर्धा परीक्षा केव्हा इतरही परीक्षेत स्पर्धात्मक यश मिळेल कला क्रीडा क्षेत्रातील जातकांना चांगले यश मिळेल परदेशातही आपण चांगले यश मिळू शकते. त्यासाठी अभ्यासाची चिकाटी तुम्हाला ठेवावी लागणार आहे.
पारिवारिक :- सदरच्या कालावधीमध्ये पूर्वर्धन संमिश्र स्वरूपाची फळे प्रतिपादित करू शकतो कोणत्याही व्यवहारात जपून राहणे गरजेचे राहील विशेषतः जुगार सदृश्य व्यवहारापासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल कोणत्याही स्वरूपाचा जुगार नको त्याचप्रमाणे चंद्रग्रहण तरुणांना तसेच तरुणींना कुसंगतीतून बाधक असल्याने कुसंगत टाळा त्याचप्रमाणे अमावस्या शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर जपण्याची आहे.सप्टेंबरमध्ये स्वत:च्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आपली कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :-व्यावसायिकांना सदरचा कालावधी अधिक लाभदायक ठरणार आहे. या सप्टेंबरमध्ये व्यवसाय धंद्यातील जुनी उधारी तसेच वादग्रस्त उधारी वसूल होईल. पण, भविष्यात कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे राहील. नवीन गुंतवणूक पूर्ण विचारांती करा. कुटुंब परिवारात आपल्याला चांगले वातावरण लाभेल घरात खेळीमेळीचे वातावरण असणार आहे. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल आर्थिक आवक चांगली राहणार आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. त्यामुळे आपण परिवारासाठी उत्स्फूर्तपणे खर्च करू शकाल आनंदासाठी व मनोरंजनासाठी खर्च होईल तसेच सामाजिक कार्यासाठी पण खर्च करू शकाल सहकुटुंब सहपरिवार पर्यटनाचे नियोजन होऊ शकते त्याचप्रमाणे जवळच्या तशा लांब प्रवासा संबंधी नियोजन केले जाऊ शकते. त्यासाठी आवश्यक त्या पैशाची तरतूद करून ठेवावी. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला अचानक स्पर्धेला सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे संघर्षास तोंड द्यावे लागणार आहे तरी सुद्धा आपण केलेल्या कार्याचे फारसे समाधान मिळणार नाही काही वेळेस वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरगुती किंवा मित्रांमुळे होणाऱ्या वादामुळे आपणास आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे म्हणून शक्यतो सर्व ठिकाणी वादविवाद तसेच भांडणे टाळा. आपली कामे थोडी विलंबाने होत असल्याचे बघून मानसिक ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वभावात चिडखोरपणा येईल त्यात कामाचा ताण खूप जाणवेल. तरीही आपण कोणतेही काम करताना संयम बाळगून व समयसूचकता पाळावी. आनंदाची बाब म्हणजे आपणास शुभ ग्रहमानाची साथ मिळणार आहे आपली किंमत आजूबाजूच्या लोकांना कळणार आहे आपण आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून यश मिळवून आणाल.
शुभ दिनांक : - २, ४, ५, १४, १७, १८,२२,२७,३०
अशुभ दिनांक : - ७, ८,१३,१५,२१,२५,२७
वृषभ रास
ओळखी मध्यस्थी यशस्वी होतील
वृषभ राशीच्या व्यक्ती या देवाच्या भक्तीत लीन होणाऱ्या श्रद्धावान कांतीमान वर्ण गोरा मेदयुक्त तसेच भरदार शरीर तजेलदार चेहरा स्वच्छतेची आवड डोळ्यात सफेद पणा जास्त मोहक मांड्या गाल मनगटे तोंड यांचे आकार गोल शरीर मध्यम उंची पाठ तोंड बरगड्या यावर विशेष चिन्ह असू शकतात खेळाची आवड निरोगी दगदग सहन करण्यास सदैव तत्पर त्यागशील पुष्कळ गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणारा आळशी स्थिर बुद्धी चांगले चांगले पदार्थांची आवड असणारा सुखी धनिक इतर लोकांशी नित्य संबंध ठेवणारा शूर, शत्रूंच्यावर विजय मिळवणारा माता पिता यांना सुख देणारा वडिलोपार्जित स्थितीचा उपभोग घेणारा स्थावर मालमत्तेची आवड डाग दागिने व कपडे याची आवड असणारा स्त्री प्रिय विलासी नाना प्रकारे द्रव्य खर्च करणारा चपळ विद्या असली तरी विद्वान लोकात मान कमी असणारा परंतु अनेक विद्यांची आवड असणारा असा जातक वृषभ राशि मध्ये आढळतो.
शिक्षण :- सदरचा कालावधी शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त ठरेल चांगल्या प्रकारे शिक्षणात यश मिळू शकाल शिक्षण क्षेत्रातल्या कोणत्याही भागात चांगले यश मिळू शकते भरपूर चांगल्या संधी मिळू शकतात परंतु प्रामाणिक कष्टांची गरज आहे कला क्रीडा क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात त्याच्यात परदेशातूनही संधी उपलब्ध होऊ शकतात.
पारिवारिक :- सदरच्या कालावधीमध्ये काही शुभ ग्रहांच्या योगांच्यामुळे शुभग्रहांची साथ राहील ओळखी मध्यस्थी यशस्वी होतील वादग्रस्त वसुली होईल व्यावसायिक परिस्थिती मनासारखी राहील घरातील तरुण वर्गाचे प्रश्न सुटतील सामाजिक तसेच धार्मिक कार्यात विशेष रस निर्माण होईल अमावस्या जवळ गर्भवतींनी स्वतःच्या प्रकृतीची विशेष काळजी घेणे हिताचे ठरेल कुटुंब परिवारात चांगले वातावरण राहील आनंदी वातावरण मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहिल्याने कुटुंब परिवारातील सर्व सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करू शकाल सर्व जबाबदाऱ्या आपल्याकडून पूर्णपणे पार पाडल्या जातील मानसिक समाधान मिळेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- शुभ ग्रहांच्या शुभ योगाच्या मुळे व्यवसाय धंद्यात प्रगती करता येईल नवीन नवीन संधी उपलब्ध होतील भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे म्हणणे ऐकल्यास त्याचा विशेष फायदा होईल भागीदाराच्या मताला विशेष महत्त्व दिल्यास ते व्यवसायासाठी पोषक ठरू शकते जमीन जुमला, स्थावर मालमत्ता वडिलोपार्जित संपत्ती वडिलोपार्जित व्यवसाय इत्यादी क्षेत्रात अर्धवट अथवा रखडलेले व्यवहार मार्गी लागू शकतात या कामी ओळखी अथवा मध्यस्थी उपयोगी पडू शकतात त्या यशस्वी होतील व्यवसायामधील वादग्रस्त येणे वसूल होतील त्यामुळे आश्चर्य वाटू शकते आर्थिक परिस्थिती मजबूत होईल चंद्रग्रहणा जवळच्या कालावधीमध्ये चालू नोकरीमध्ये मानसिक संतुलन बिघडू शकते त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी राजकारण व गटबाजी पासून दूर राहा सहकाऱ्यांवर अथवा वरिष्ठांच्या वर कोणत्याही प्रकारची शेरेबाजी करणे टाळा त्यांच्या मतांना विशेष महत्त्व दिल्यास ते आपल्यासाठी उपयुक्त ठरेल आपल्या कामाच्या बाबतीत अद्यावत राहणे गरजेचे राहील. सर्व सदर कालावधीच्या उत्तरार्धात तरुण-तरुणींना छान वाव मिळू शकतो आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील त्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे हे लक्षात ठेवा आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. सदरील काळामध्ये आपल्याला आचारसंहिता पाळावी लागेल. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेणे हितकारक राहील काही वेळा नोकरीमध्ये वरिष्ठा च्या बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे त्यांच्या मताला प्राधान्य द्या व वादविवाद करू नका कुटुंब परिवारामध्ये जास्तीचा खर्च होण्याचा संभव आहे मुला मुलींसाठी खर्च होऊ शकतो त्याचप्रमाणे व्यवसाय धंद्यात अचानक उद्भवलेल्या समस्यांसाठी खर्च होईल आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे व समजूतदारपणे सामोरे जावे लागेल आपण त्यामध्ये यश प्राप्त करू शकाल कोणत्याही क्षेत्रात नुसत्या अंदाजावरून पुढील पाऊल उचलू नका वस्तुस्थितीची जाणीव करून घेणे महत्त्वाचे ठरेल.
शुभ दिनांक : - ४, ५, ९, १७, १८, २२,२७
अशुभ दिनांक : ७, ८, १३, १५,२१,२५,२७