नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मेष रास

चढत्या क्रमाने शुभ फळे मिळतील

मेष रास लाभलेले जातक त्याचप्रमाणे लहरी चंचल पित्तविकार, रक्तविकार, तामसी, हट्टी, काटक, उतावळ्या स्वभावाची, प्रवासाची आवड असणारे, जलद चालणारे, फिरतीचे काम असणारे, पिंगट डोळ्यांचे असतात. विग्रही व्यक्तींच्या केसांचे प्रमाण अल्प असते. शरीर मध्यम उंच, कृषी विद्या व बुद्धी काही प्रमाणात कमी असू शकते. मात्र महत्त्वाकांक्षी असतात. उग्र दृष्टी, अल्प सुखी, पवित्र वर्तणूक ठेवण्यासाठी प्रयत्नशील, धार्मिक बाबतीत भिऊन वागणारा, भावंडांनी दूर ठेवलेला, पित्यापासून दूर राहणारा, दूरदेशी राहण्याची आवड असणारा, नानाविध दैवतांच्या उपासनेचा नाद असणारा, श्रद्धावान अशा प्रकारची वैशिष्ट्य मेष राशींच्या व्यक्तींच्या स्वभावात आढळतात.

शिक्षण :- या महिन्यात शिक्षणासाठी ग्रह योग अनुकूल आहेत. अभ्यासासाठी या व्यक्तींना सातत्य व एकाग्रतेने अभ्यास करावाच लागतो. अभ्यास करताना लक्ष विचलित होण्याची शक्यता दाट आहे. कोणत्याही प्रकारे घाईगडबड करू नये, आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना कालावधीतील अनुकूल असला तरी योग्य प्रश्नांची गरज आहे. प्रदेशातील शिक्षणासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. योग्य प्रयत्नांना हवे तसे यश मिळू शकते. आपले प्रयत्न सफल होतील.

पारिवारिक :- आर्थिक बाबतीत सावधानता बाळगणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कुटुंबीय व नातेवाईक यांच्याशी वादविवाद घटित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या वागण्या- बोलण्यावरती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अपेक्षा सीमित करा. घरातील व्यक्तींमध्ये सामंजस्यपणे वागण्यासाठी प्रयत्नशील राहा. आर्थिक बाबतीत नियोजनाची आवश्यकता आहे. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला सकारात्मक घटना घटित होताना अनुभवास येतील. आपल्या जीवनात स्थिरता येईल. आपल्या विचारात सकारात्मकता येऊन आपण अधिक चांगल्या प्रकारे आपली कार्य पूर्ण करू शकाल. रखडलेल्या कामांना गती देऊ शकाल. समाजातील गुरुतुल्य तसेच सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल, तसेच त्यांची मदत मिळेल. या कालावधीमध्ये चढत्या क्रमाने शुभ फळे मिळतील. आपण आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी-व्यवसायात प्रगती करू शकाल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विस्ताराच्या योजना आखू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर चांगले नाते निर्माण होईल तसेच त्यांचे सहकार्य मिळेल. परिवारातील सदस्यांचे वाढते सहकार्य समाधान देईल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रुची घ्यावीशी वाटेल. या कामांमध्ये सक्रिय योगदान देऊ शकाल. सहकुटुंब धार्मिक स्थळी भेट देऊ शकाल. मन अध्यात्मामध्ये रमेल. आपल्या हातून दानधर्म होण्याची शक्यता आहे. घरामध्ये मंगलकार्य ठरू शकते. कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.

शुभ दिनांक : - १, ४, ७, ९, १०, १२, १३,२३,२५,२६,२७

अशुभ दिनांक : - २,५,६,८,१४,१८,१९,२०

वृषभ रास

थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ

दैवाची भक्ती करण्याची हौस असते. कांती नितळ असते, चेहरा तजेलदार, स्वच्छतेची आवड असते. मांड्या, गाल मनगटे, चेहरा यांचा आकार गोल असतो. खेळाची विशेष आवड असते. निरोगी, तसेच दगदग सहन करण्यात पटाईत असतात. गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे, आळशी, बुद्धी स्थिर असते. चांगले व चविष्ट अन्न खाण्याची आवड असते. सुखी व धनिक व्यक्तींशी संबंध येतो. इतरांना सुख देणारा, त्याचप्रमाणे मातेला सुख देणारा, उपभोग घेणारा, वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता. दागदागिने, सुंदर अलंकार व कपड्याची आवड असते. स्त्रीप्रिय, विलासाची आवड असते. इत्यादी प्रकारची वैशिष्ट्ये वृषभ राशींच्या व्यक्तींमध्ये आढळतात.

शिक्षण :- या महिन्यात शिक्षणासाठी ग्रहमान अनुकूल असणार आहे. कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी व त्यात यश मिळण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. भरपूर संधी या कालावधीत उपलब्ध होतील. आपणास जे ध्येय गाठायचे आहे त्यासाठी प्रयत्नशील राहाल. प्रयत्नांती परमेश्वर. कला व क्रीडा क्षेत्रातही आपणास चांगले यश लाभणार आहे. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. गुरुजनांची मदत मिळेल.

पारिवारिक :- आपल्या कुटुंबात शांतता व समाधान असणार आहे. आपल्या जोडीदाराच्या प्रयत्नाने पुष्कळ गोष्टी आपणासाठी सुकर होणार आहेत. घरात आध्यात्मिक व ज्ञानवर्धनाच्या दृष्टीने चांगले प्रयत्न होतील. त्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक बाबतीत जोडीदाराचे सहकार्य लाभलेले, सर्व गोष्टी सुरळीत राहतील, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल. एखादे मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. आपल्या जबाबदाऱ्या नेटकेपणाने पार पाडू शकाल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटून भाग्योदय होऊ शकतो. त्यांना आपला आवडता जीवनसाथी निवडण्याची संधी मिळू शकते. प्रेमविवाह सफल होतील. विवाह ठरण्यातील अडचणी दूर होतील. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण चांगला उत्कर्ष करू शकाल. मात्र आपल्या कार्यस्थळी वादविवाद व गैरसमज टाळणे हिताचे ठरेल. काही वेळेस कामानिमित्त दूरच्या तसेच जवळच्या अंतराचे प्रवास करावे लागतील. परंतु प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू, वाहन इत्यादी सांभाळा. हरवणे किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. सतत इतरांचे सहकार्य लाभणार आहे. समाजातील विद्वान व थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. त्याचप्रमाणे मार्गदर्शन व सहकार्यही लाभेल. एखादे किचकट, कोर्ट प्रकरण संपेल. धनलाभ चांगला होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल. व्यापार व व्यवसायामध्ये वृद्धी दिसेल, मात्र कलह टाळणे. भाऊबंदकीचा त्रास संभवतो. सामंजस्याने वागा. नोकरीच्या ठिकाणी अनुकूलता व्यापलेली दिसेल.

शुभ दिनांक : - १, ३, ७, ९, १०, १२, १३, १५, १६, २५, २६, २७, २९, ३०

अशुभ दिनांक : - २, ५, ६, ९, १४, १८, १९, २०

logo
marathi.freepressjournal.in