

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
धनु
स्वप्नपूर्तीचा कालावधी
धनु रास ही गुरुची रास आहे धनु राशि वर गुरु या ग्रहाचे कारकत्व असते. धनु राशि मध्ये मूळ, पूर्वाषाढा व उत्तराषाढा या तीन नक्षत्रांचा समावेश होतो मूळ नक्षत्राची देवता निऋती आहे. त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ओम निऋती देवताय नमः या मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे पूर्वाषाढा या नक्षत्राची देवता उदक आहे, त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ओम उदयकाय नमः या मंत्राचा जप करावा. उत्तराषाढा या नक्षत्राची देवता विश्व देव आहे त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ओम विश्वदेव नमः हा जप केल्यास अनुकूलतेमध्ये भर पडून यशाच्या प्रमाणात वाढ होते व जातकाचे कल्याण होते परंतु हे जप सातत्याने करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे सफलतेमध्ये वृद्धी होते.
शिक्षण : धनु राशीच्या जातकांच्यासाठी सदरचा कालावधी अत्यंत अनुकूल म्हणावं लागेल. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेतल्यास त्याचे सकारात्मक परिणाम लाभतील. ग्रहमानाची साथ लाभेल परंतु आपल्या कष्टामध्ये व परिसरामध्ये कमी पडून देऊ नका सातत्याने कष्ट करा सातत्याने अभ्यास करा म्हणजे उज्वल यश मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन नवीन संधी उपलब्ध होऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील परदेशी सुद्धा जाता येईल प्रसिद्धी व पैसा मिळू शकतो.
पारिवारिक : सदरचा कालावधी हा स्वप्नपूर्तीचा कालावधी म्हणता येईल. अतिशय अनुकूल ग्रहमान असल्याकारणाने आपल्याला कार्यक्षेत्रातील प्रत्येक विषयात सफलता हाती मिळेल. जे जे काम हाती घ्याल त्यामध्ये यश मिळेल मोठी अजब फळे मिळतील. तरुण-तरुणींची स्वप्न पूर्ण होतील. कुटुंब परिवारातील तरुण तरुणांची लग्न जमतील विवाहातील अडथळे दूर होतील प्रेमामध्ये यश लाभेल. प्रेम प्रकरणाचे विवाह मध्ये रूपांतर होऊ शकते विरोध मावळून जाईल. त्याचप्रमाणे परदेश गमनातील अडथळे दूर होतील. विवाह योगातून थक्क व्हाल आपल्या कार्यक्षेत्रात विजयी व्हाल व्यवसाय धान्यात मोठे सौदे हाती येतील धन लाभाचे योग आहेत.
नोकरी, व्यवसाय व धंदा : या कालावधीच्या सुरुवातीला ग्रहमान फारसे अनुकूल नसल्याने सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. आपल्या कुटुंब परिवारात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच व्यवसाय धंद्यात नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचा अट्टहास ठेवू नका आपल्या मताला मुरड घालणे हिताचे ठरेल इतरांच्या मताला प्राधान्य द्या ज्या लहानसहान कारणांवरून निर्माण होऊ शकतात, असे प्रसंग करा शांतता प्रस्थापित होईल. नोकरी व्यवसाय धंद्यामध्ये वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराचे मत ऐकून घेऊन त्यावर अंमल करण्याचा प्रयत्न करा व्यवसाय धंद्यासाठी ते पोषक करू शकते. कुटुंब परिवारातील तरुण तरुणींचे प्रश्न सुटतील विशेषतः नोकरीविषयक कामे होतील. विद्यार्थी विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त करता येईल कष्टाचे फळ मिळेल साहित्य क्षेत्रातील व बुद्धिजीवी जातकांना त्यांच्या छंद अथवा उपक्रमातून यश मिळू शकते प्रसिद्धी मिळेल.
शुभ दिनांक : 3,12,16,26
अशुभ दिनांक : 5,7,9,13,20,22,24,27,30
मकर
पति अथवा पत्नीचा भाग्योदय
मकर रास ही शनी महाराजांची रास आहे शनि महाराजांची सत्ता या राशीवर चालते तसेच ते न्यायाधीश आहेत व कर्माचे कारकही आहेत. मकर राशि मध्ये उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा ही नक्षत्रे येतात उत्तराषाढा या नक्षत्राची देवता विश्व देव आहे त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ओम विश्वदेवाय नमः या मंत्राचा जप नियमितपणे करावा. तसेच श्रवण नक्षत्राची देवता भगवान विष्णू आहेत त्यामुळे जातकांनी ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा धनिष्ठा नक्षत्राची देवता वसू आहे त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास चातकांना कार्यात सफलता प्राप्त होते अडचणी येत नाहीत व जीवन सफल होते.
शिक्षण : कला व क्रीडा क्षेत्रासाठी अनुकूल ग्रहमान आहे त्यामुळे संधींची उपलब्धता असेल परंतु त्या संधीचे सोने करून घेणे आपल्या हाती आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी सराव नियमितपणे करावा तसेच शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेसाठी मध्यम स्वरूपाचे ग्रहमान असल्यामुळे अभ्यासामध्ये सातत्य व प्रामाणिकपणा हवा त्यामुळे उज्वल भविष्याकडे आपण वाटचाल करू शकाल. परदेशातील शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेतही यश प्राप्त करू शकाल योग्य दिशेने प्रयत्न करणे व ते प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे.
पारिवारिक : सध्याच्या ग्रहमानुसार आपल्या जीवनामध्ये गतिमान घटना घटीत होण्याचा संभव आहे परंतु त्या घटना सकारात्मक राहतील. कुटुंब परिवारामध्ये सतत सुवार्ता येत राहतील. कुटुंबात पती अथवा पत्नीचा भाग्योदय साजरा करण्याची संधी मिळेल या कालावधीच्या उत्तरार्धामध्ये महत्त्वाची मोठी कामे ओळखी मध्यस्थीतून पूर्ण होऊ शकतात त्यातून मोठे लाभ होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. परंतु आपल्या मौल्यवान वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे लक्षपूर्वक ठेवा अथवा हाताळा चोरी होण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही सावध रहा.
नोकरी, व्यवसाय, धंदा : कुटुंब परिवारात तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून या कालावधीमध्ये सतत सुवार्ता मिळतील. पूर्वी केलेले नियोजन यशस्वी होताना अनुभवता येईल आपले निर्णय योग्य ठरतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल नवीन कामे हाती घेता येतील. आपल्या कार्यक्षेत्रातनवीन नवीन संधींची उपलब्धता आपल्याला प्रगतीच्या शिखरावर नेईल प्रगतीचा व उन्नती चढता आलेख व्यापलेला दिसेल.कुटुंब परिवारातील तरुण तरुणींना निरनिराळ्या क्षेत्रातून अनेक संधी मिळतील त्या संधीचे सोने करू शकाल त्यांचे नोकरी विषयक प्रश्न संपुष्टात येतील नोकरी मिळू शकते नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील त्याचप्रमाणे विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील विद्यार्थ्यांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत आहेत अशांचे मन अभ्यासावर केंद्रित होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यामध्ये आपण रस घ्याल अध्यात्माकडे मन धावेल सामाजिक क्षेत्रातून सन्मानित होऊ शकाल एखाद्या समारंभात मानाचे स्थान मिळू शकते.
शुभ दिनांक : 1,2,10,1621,25,29,
अशुभ दिनांक : 5,7,9,13,20,22,24,27,30