नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य
Published on: 

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मेष

अविस्मरणीय यशाचा कालावधी

मेष रास ही राशीचक्रातील पहिल्या क्रमांकाची रास असून, या राशीवर मंगळाचे अधिपत्य आहे. म्हणजेच मेष रास ही मंगळाची रास आहे. मेष राशीमध्ये अश्विनी, भरणी व कृत्तिका ही नक्षत्रे येतात. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींची देवता अश्विनीकुमार आहे. अशा जातकांनी महत्त्वाच्या कामासाठी 'ॐ अश्विनीकुमार देवताय नमः' या मंत्राचा जप केल्याने त्यांचे काम विनासायास होऊ शकते. त्याचप्रमाणे, भरणी नक्षत्राची देवता यम आहे. या नक्षत्राच्या जातकांनी 'ॐ यमाय देवताय नमः' या मंत्राचा जप केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. ज्या जातकांचे नक्षत्र कृत्तिका असून रास मेष आहे, अशा जातकांनी 'ॐ अग्नये देवताय नमः' या मंत्राचा जप करावा. कारण, कृत्तिका नक्षत्राची देवता अग्नी आहे. असे नियमित केल्याने त्यांच्या अडचणी दूर होतात व त्यांना विशेष यश प्राप्त होते. म्हणूनच नक्षत्रे महत्त्वाची मानली गेली आहेत.

शिक्षण : मेष राशीच्या जातकांना शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विभागात शिक्षण घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती लाभलेली आहे. या अनुकूल ग्रहमानाचा फायदा जरूर घेता येईल; परंतु, त्यासाठी आवश्यक परिश्रम घेणे गरजेचे ठरेल. तसेच, अभ्यासामध्ये सातत्य ठेवणेही गरजेचे आहे. यश चांगल्या प्रकारे मिळेल. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, तर अभ्यासामध्ये मन केंद्रित केल्यास व इतरत्र वेळ वाया न घालवल्यास उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम यश मिळवू शकाल. परदेशाशी संबंधित शिक्षणाच्या बाबतीत अथवा परदेशगमनाच्या बाबतीत इतरांचे साहाय्य उपयोगी पडेल. कुटुंबातूनही मदत मिळू शकते; परंतु, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आपल्यासाठी आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.

पारिवारिक : सध्याचा कालावधी मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय अनुकूल राहील. या काळात आपण आपली अडकलेली व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. कामांमध्ये गतिशीलता येईल. विशेषतः जमीन अथवा स्थावर संपत्तीच्या बाबतीत आपल्याला विशेष लाभ मिळू शकतो. काही अविस्मरणीय प्रसंग घडून आपल्या परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो. सतत आपल्या मनासारख्या गोष्टी घडतील. कुटुंब-परिवारामध्ये सुवार्ताची परंपरा राहील. परिवारातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या बातम्या समजल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. घरामध्ये काही नवीन खरेदी होऊ शकते. व्यवसायात मोठा आर्थिक ओघ राहील. व्यवसाय-धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत राहील. परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण पूर्ण करू शकाल.

नोकरी, व्यवसाय व धंदा : कुटुंबातील आई-वडिलांचा उत्कर्ष होईल, तसेच त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींची मदत व मार्गदर्शन मिळू शकते. सहकुटुंब, सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचा योग घडून येत आहे. आपल्या हातून धार्मिक कार्य, दानधर्म होईल. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच सहवास लाभेल. आपल्या पूर्वसंचितातून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे लाभ होऊ शकतात.

शुभ दिनांक : १, २, ३, १०, १४, १६, २५, २६, २९

अशुभ दिनांक : ५, ७, ९, १३, २०, २२, २४, २७, ३०

वृषभ

चैन व करमणुकीसाठी खर्च होईल

वृषभ रास ही शुक्राची रास आहे. शुक्राच्या अंगी 2 असलेले सर्व गुणधर्म या राशीच्या जातकांमध्ये पाहायला मिळतात. या राशीवर शुक्राचे कारकत्व असते. वृषभ राशीमध्ये कृत्तिका, रोहिणी व मृगशीर्ष या तीन नक्षत्रांचा समावेश होतो. ज्या जातकांचे नक्षत्र कृत्तिका आहे व रास वृषभ आहे, अशा जातकांनी 'ॐ अग्नये देवताय नमः' असा जप केल्यास त्यांचे जीवन सर्व दृष्टिकोनातून सुसह्य होते. ज्या जातकांचे नक्षत्र रोहिणी आहे, अशा जातकांनी रोहिणी नक्षत्राची देवता ब्रह्मा असल्यामुळे 'ॐ ब्रह्मदेवताय नमः' हा जप केल्यास त्यांना त्याचा फायदा होईल. तसेच, ज्या जातकांचे नक्षत्र मृगशीर्ष आहे, त्यांनी 'ॐ चंद्राय नमः' हा जप केल्यास त्यांना कष्ट कमी पडतील. कारण, मृगशीर्ष नक्षत्राची देवता चंद्र आहे.

शिक्षण : कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी तसेच साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी व बुद्धिजीवी वर्गासाठी चालू ग्रहमान अत्यंत चांगले आहे. कमी कष्टांमध्ये जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच, प्रसिद्धी मिळेल. नवीन नवीन कामे मिळतील. आपल्या हातून एखादी चांगली कलाकृती निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजामध्ये तिचे कौतुक परंतु, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे राहील. स्पर्धा परीक्षांसाठी योग्य प्रयत्नांबरोबरच योग्य मार्गदर्शनही घेण्याची आवश्यकता भासेल. थोडक्यात, कष्ट जास्त घ्यावे लागतील. परदेशाशी संबंधित शिक्षणात चांगले यश मिळेल. ग्रहमान संमिश्र असल्याने प्रयत्नांवर जोर द्यावा लागेल. प्रयत्नांत सातत्य राहिल्यास उज्ज्वल यशाचे धनी आपण होऊ शकाल.

पारिवारिक : या कालावधीच्या सुरुवातीला करमणुकीसाठी तसेच चैनीसाठी आपला जास्तीचा खर्च होऊ शकतो. तसेच, घरामध्ये काही महागडी खरेदी होऊ शकते. घराच्या सुशोभीकरणासाठीसुद्धा खर्च होण्याची शक्यता आहे. वास्तू खरेदीतील अडचणी संपुष्टात येतील; पण, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक आहेत. पैशांची सोय होऊ शकते अथवा मदत मिळू शकते. कुटुंबातील बहीण-भावांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नात्यांना महत्त्व द्या. वादविवाद टाळा. गैरसमज टाळणे महत्त्वाचे ठरेल. या कालावधीच्या उत्तरार्धात कुटुंबातील तरुण-तरुणींचे शैक्षणिक प्रश्न अथवा नोकरीविषयक प्रश्न असल्यास ते सुटतील. व्यवसाय-धंद्यात कामगार वर्गाकडून चांगले सहकार्य मिळू शकते. मात्र, रोखीचे व्यवहार करताना सावधपणे कोणत्याही प्रकारचे लहान-मोठे व्यवहार करा. त्याचप्रमाणे, रोख पैसे सांभाळा.

नोकरी, व्यवसाय व धंदा : नेहमीच्या उत्पन्नाव्यतिरिक्त अन्य मार्गांनी उत्पन्नात वृद्धी झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण पूर्ण करू शकाल. त्यामुळे मनसोक्त खर्च करू शकाल. चैनीच्या व करमणुकीच्या साधनांवर खर्च करू शकाल. स्वतःसाठीही खर्च होईल. कुटुंबातील मुला-मुलींसाठी विशेष खरेदी होईल. त्याचप्रमाणे, राहत्या घराविषयी काही प्रश्न असल्यास ते सुटतील.

शुभ दिनांक : १, २, ३, १०, १६, २१, २५, २६, २९

अशुभ दिनांक : ५, ७, ९, १३, २०, २२, २४, २७, ३०