नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि    कन्या राशीचे भविष्य
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य
Published on: 

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

सिंह

शुभ संकेत मिळतील

सिंह रास रवीची रास म्हणून ओळखली जाते. याचाच अर्थ सिंह राशीचा स्वामी रवी आहे. रवीचे कारकत्व सिंह राशीवर असते. सिंह राशीत मघा, पूर्वा फाल्गुनी व उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रांचा समावेश होतो. मघा नक्षत्राची देवता पितर आहे. त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी पितरांची सेवा करणे अर्थात श्राद्ध वगैरे तसेच ओम पितरोभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राची देवता भग आहे. या नक्षत्राच्या जातकांनी ओम भग नमः असा जप करावा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची देवता आर्यमा आहे. अशा जातकांनी ओम आर्यमा देवता नमः हा जप नियमितपणे केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. महत्त्वाच्या कामास जाण्यापूर्वी वरील जप केल्यास काम उत्तम रीतीने पार पडू शकते.

शिक्षण : या कालावधीमध्ये कोणतेही शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम यश मिळू शकते. पोषक वातावरण निर्माण होईल. उत्तम अभ्यासूंना अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल. परदेशातील शिक्षणासाठी अनुकूलता लाभलेली आहे. त्याचा फायदा होईल. त्या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न चांगले फलदायी ठरू शकतात. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. यशाचे वाढते प्रमाण अनुभवण्यास मिळेल.

पारिवारिक : कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साही व आनंदी राहील. नोकरीविषयक समस्या संपुष्टात येऊ शकतात. नवीन केलेले नोकरीविषयक प्रयत्न सुद्धा यशस्वी होताना आढळतील. मुलाखतीमधून प्रभाव टाकता येईल. तसेच तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडण्याची संधी मिळेल. जे विवाह लांबलेले होते अथवा रखडलेले होते अशा प्रकारचे विवाह ठरू शकतात. स्वतंत्र व्यावसायिकांच्या उत्पन्नात वृद्धी होईल तसेच उद्योग-धंद्यातील व्यवसाय प्रदर्शने यशस्वी होतील. परिणामतः व्यवसायाच्या उलाढालींमध्ये वाढ होऊ शकते. उत्तम संधीचा फायदा घेता येईल. बदलणारे ग्रहमान शुभ संकेत देतील.

नोकरी, व्यवसाय व धंदा : व्यवसाय, धंदा अथवा नोकरीनिमित्त किंवा वैयक्तिक कारणांनी परदेशगमनाचे योग आहेत. विशेषतः आयात- निर्यात क्षेत्रातील जातकांना परदेशवारीची शक्यता. परदेशी व्यावसायिक संबंध दृढ होतील. नवीन करार मदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येतील. व्यवसायामध्ये एक नवीन उंची गाठू शकाल. जुने संबंध नव्याने प्रस्थापित होऊ शकतात. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल, तसेच समाजातील प्रभावशाली व्यक्तींचा सहवास मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात घवघवीत यश मिळेल. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेता येईल. या कालावधीत आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतात. नोकरीमध्ये आपण आपले काम सातत्याने व नीटनेटके होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहात. त्यामुळे वरिष्ठांची मर्जी टिकवून ठेवण्यात यश प्राप्त होईल. त्याचप्रमाणे ज्या जातकांना नोकरी नाही. त्यांना नोकरी मिळवण्यामध्ये यश मिळेल.

शुभ दिनांक : ३, १४, २५, २६

अशुभ दिनांक : ५, ७, ९, १३, २०, २२, २४, २७, ३०

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि    कन्या राशीचे भविष्य
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

कन्या

व्यावसायिक तेजी

कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुधाच्या कारकत्वाखाली कन्या रास येते. त्यामुळे बुधाचे सर्व गुण कन्या राशीच्या जातकांच्या स्वभावात उतरलेले आपण पाहतो. कन्या राशीत उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा हे तीन नक्षत्र येतात. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची देवता आर्यमा आहे. त्यामुळे हे नक्षत्र असलेल्या जातकांनी ओम आर्यमाय नमः हा जप करावा. हस्त नक्षत्राची देवता सूर्या अथवा रवी आहे. त्यामुळे हे नक्षत्र असलेल्या जातकांनी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा व सूर्याला अर्ध्य द्यावे. चित्रा नक्षत्राची देवता त्वष्टा आहे. हे नक्षत्र असलेल्या जातकांनी ओम त्वष्टाय नमः हा जप करावा. वरील जप केल्यामुळे सफलता प्राप्त होते. महत्त्वाची कामे पूर्ण होतात. परंतु जपामध्ये नियमितपणा असायला हवा.

शिक्षण : परिवारामधील वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करता येतील. परंतु परिवारातील स्त्रीवर्गाने आपल्या मताला थोडी मुरड घालणे आवश्यक आहे. वस्तुस्थितीचे आकलन करणे गरजेचे ठरेल. व्यावसायिक तेजी वाढेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून लाभ होतील. खरेदीचा बेत आखाल. कला व छंद माध्यमातून प्रसिद्धी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल. कर्ज असल्यास परतफेड करता येईल. सर्व मोह टाळणे अत्यावश्यक ठरेल. चालू प्रेमप्रकरणात प्रसंग पाहून सावधतेने पाऊल टाकण्याची गरज आहे.

पारिवारिक : परिवारातील वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्यामुळे घरातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करता येतील. परंतु परिवारातील स्त्रीवर्गाने आपल्या मनाला थोडी मुरड घालणे आवश्यक आहे. वस्तुस्थितीचे आकलन करणे गरजेचे ठरेल. व्यावसायिक तेजी वाढेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून लाभ होईल. घरामध्ये उंची खरेदी होईल. कला व छंद या माध्यमातून प्रसिद्धी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल.

नोकरी व्यवसाय धंदा : कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूलता लाभल्याने आनंदाचे प्रसंग समोर येतील. त्यामुळे सगळीकडे अनुकूलता व्यापलेली आपल्याला दिसेल. आपल्या विचारात सकारात्मकता भरून राहील. आपण छंद व कला इत्यादी माध्यमातून प्रसिद्धी मिळवू शकता. तसेच दर्जेदार कलाकृती आपल्या हातून निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातून अर्थार्जन करू शकाल. कौतुकास पात्र ठराल. व्यवसाय, धंद्याचाही विस्तार करू शकाल. भविष्यातील नियोजन आपण काही आपल्या जवळच्या व्यक्तींसह मिळून करू शकाल. कुटुंबतूनही आपल्याला मदत मिळू शकते. नवीन संकल्पना तसेच निरनिराळी माध्यमे यांचा यशस्वी वापर आपण करू शकाल. निरनिराळ्या संधी चालून येतील. संधीचा फायदा घ्या. आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाल्याने आनंदी राहाल. वाद-विवाद होणार नाही याची काळजी घ्या. व्यापार, व्यवसायात खरेदी- विक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल.

शुभ दिनांक : १, २, १०, १४, १६, २१, २५, २६, २९

अशुभ दिनांक : ५, ७, ९, १३, २०, २२, २४, २७, ३०