

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण
तुळ
विशिष्ट भाग्यसंकेत मिळू शकतात
तुळ रास ही शुक्राची रास आहे. चित्रा, स्वाती व विशाखा ही तीन नक्षत्रे येतात. चित्रा नक्षत्राची देवता त्वष्टा आहे. त्यामुळे चित्रा नक्षत्राच्या जातकांनी ओम त्र्यष्टाय नमः हा जप करणे फायद्याचे ठरेल. स्वाती नक्षत्राची देवता वायू आहे. त्यांनी वायू देवताय नमः हा जप नियमितपणे करावा. विशाखा नक्षत्राची देवता इंद्रागणी आहे. त्यांनी ओम इंद्रागणी देवताय नमः हा जप करावा. हे जप नित्यनेमाने केल्यास त्यांना त्यांच्या कार्यामध्ये चांगली सफलता प्राप्त होईल. जीवन सुसह्य होईल.
शिक्षण : तुळ राशीच्या जातकांना कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी गृहमानाची फारशी साथ लाभणार नाही. कारण ग्रहमान तसे मिश्र स्वरूपाचे आहे. त्यामुळे कधी ऊन तर कधी पाऊस असा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे जास्त कष्ट घेणे अर्थातच आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता आळस झटकून अभ्यास केला पाहिजे. आपल्या अभ्यासात मन केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. इतरत्र लक्ष राहील. त्यामुळे प्रामाणिक कष्टाची आवश्यकता आहे. कुसंगत टाळणे महत्त्वाचे ठरेल तसेच नियमितपणा महत्त्वाचा सिद्ध होईल. आपण यश खेचून आणू शकता यावर विश्वास ठेवावा.
पारिवारिक : आपल्या अवतीभवती सतत गतिमान घटना घडू शकतात, पण त्या अनुकूलच राहतील असे नाही. त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. विशेषतः लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारातील निर्णय घेताना सावध राहावे. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. कोणावरही अंधविश्वास ठेवता कामा नये. सतत उत्सव समारंभातून मानाचे पद मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यामध्ये सक्रिय भाग घ्यायला तसेच सहकुटुंब पर्यटनाचा आनंद लुटू शकाल, परंतु प्रवासामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर व वर्तनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा तसेच वाहतुकीचे नियम पाळा. नाहीतर नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे सरकारी कायद्याचे भान ठेवा. कुटुंबात वादविवाद टाळणे, शांतता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
नोकरी, व्यवसाय व धंदा : सदरच्या कालावधीच्या सुरुवातीला सर्वच क्षेत्रातील यशाचे प्रमाण वाढलेले दिसेल. प्रगतीचा आलेख उंचावताना दिसून येईल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा उत्तम प्रभाव इतरांवर पडल्यामुळे आपली कामे लवकर होतील. आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. समाजातील मान्यवरांच्या तसेच थोरा-मोठ्यांच्या सहकार्यासह मार्गदर्शन अथवा मदत मिळेल. विशेषतः सरकारी कामांमध्ये याचा उपयोग होईल. अडलेली कामे मार्गी लावू शकाल. जमीनजुमला, स्थायी संपत्ती याविषयीचे रखडलेले अथवा थांबलेले व्यवहार गतिमान होतील. ओळख, मध्यस्थी उपयोगी पडू शकते. परंतु वेळ व पैसा खर्च करावा लागेल. विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुद्धा सदरचा कालावधी अनुकूल आहे. आपण स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यात यश प्राप्त होईल.
शुभ दिनांक : 1,2,3,11,12,16,26,29
अशुभ दिनांक : 5,7,9,13,20,22,24,27,30
वृश्चिक
विशिष्ट भाग्यसंकेत मिळू शकतात
वृश्चिक राशीवर मंगळ या ग्रहाचे कारकत्व आहे म्हणजेच मंगळाची सत्ता या राशीवर चालते. ही रास मंगळाच्या अधिन आहे. वृश्चिक राशीमध्ये विशाखा, अनुराधा व ज्येष्ठ यातील नक्षत्रांचा समावेश होतो. विशाखा नक्षत्राची देवता इंद्रागणी आहे. त्यामुळे ओम इंद्राणी देवताय नमः हा जप करणे आवश्यक आहे. अनुराधा नक्षत्राची देवता मित्र आहे. त्यामुळे ओम मित्राय नमः या मंत्राचा जप करावा. ज्येष्ठा नक्षत्राचे देवता इंद्र असल्याने ओम इंद्राय नमः हा जप केल्यास कार्यामध्ये सफलता मिळते. प्रगती होते. परंतु हा जप नित्यनेमाने करणे आहे. अडचणी दूर होतील, महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये विशिष्ट यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कारण संमिश्र ग्रहमान आपल्याला लाभलेले आहे. त्यामुळे कधी कधी विरुद्ध घटना घडताना दिसतील. त्यामुळे सावध राहून आपले कार्य करणे गरजेचे ठरेल. त्याचबरोबर प्रामाणिकपणे कष्ट घेऊन व अभ्यासामध्ये कार्यमग्न होऊन मन केंद्रित करावे लागेल याची जाण ठेवा. योग्य दिशेने प्रयत्न व प्रामाणिकपणे घेतलेले परिश्रम हे नक्कीच सफल होतील. कला व क्रीडा क्षेत्रात जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे परदेशी शिक्षणासाठी घरातून मदत घेण्याची आवश्यकता भासेल.
पारिवारिक : कुटुंबातील सदस्यांबरोबर वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. विशेषत: ही बाब कुटुंबातील महिलांनी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल. त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा उन्माद टाळणे अत्यावश्यक राहील. वस्तुस्थितीची जाण ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकारणी व्यक्तीशी वादविवाद न करणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात स्त्री वर्गाशी विनयशीलतेने वागणे जरुरीचे राहील. थट्टामस्करी महागात पडू शकते हे लक्षात असू द्या, तसेच आपल्या कार्यक्षेत्रात कामगारांशी विचित्र संवाद टाळा. या कालावधीच्या उत्तरार्धात विशिष्ट भाग्यसंकेत मिळू शकते.
नोकरी, व्यवसाय, धंदा : आपल्या कार्यक्षेत्रातील एखादे मोठे आर्थिक संकट टळू शकते. पूर्वी आपण घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीतून सुटका होईल. आर्थिक मदत मिळू शकेल व आपण संकटातून सहीसलामत बाहेर पडाल. आर्थिक मदत उपलब्ध होईल. नातेवाईक, मित्रमंडळींकडूनही मदत मिळू शकते तसेच कर्ज हवे असल्यास बँकांची कामे होतील. कुटुंबात वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शनासह लाभ मिळेल. सध्याचे ग्रहमान आपल्याला भविष्यातील विशिष्ट भाग्य संकेत देत आहे. उज्ज्वल भविष्याची चाहूल लागेल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या अडचणी दूर होऊन विवाह जमेल. मनाजोगा जीवनसाथी निवडता येईल. प्रेमात यश तसेच सकारात्मक प्रतिसाद मिळेल. परंतु आपल्या भावनांवर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींना अपेक्षित यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा मानस असेल.
शुभ दिनांक : 1,2,3,10,12,16,21,25,29
अशुभ दिनांक : 5,7,9,13,20,22,24,27,30