ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑक्टोबर महिना? जाणून घ्या...
ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य
Published on: 

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

धनु

कोणताही अट्टाहास टाळा

धनु राशीवर गुरूचे कारकत्व असते. म्हणूनच ही गुरूची रास आहे. धनु रास ही स्वभाव राशी आहे. धनु राशीच्या जातकांमध्ये अथवा त्यांच्या स्वभावामध्ये धरसोडवृत्ती आढळते. कोणत्याही विषयात सखोल ज्ञान घेण्याची तयारी असते, परंतु ते ज्ञान घेतीलच असे नाही. याच्या स्वभावात दुटप्पीपणा असतो. आत एक व बाहेर एक असे वागणे असू शकते. एखादी गोष्ट पूर्ण करण्यास गेले असता काही प्रमाणात अडचणी आल्यास ते काम सोडून देऊ शकतात. कोणत्याही कार्यात त्यांनी आत्मविश्वास ठेवलाय ते काम पूर्ण होऊ शकते. धार्मिक अथवा सामाजिक कार्याची आवड असते.

शिक्षण : या महिन्यातील ग्रहमान जरा मंद गतीचे आहे. त्यामुळे फारशी ग्रहांची साथ मिळणार नाही. त्यामुळे आपल्या प्रयत्नांना महत्त्व देणे गरजेचे राहील. जास्त प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. कोणत्याही प्रकारचा अट्टाहास टाळणे महत्त्वाचे ठरेल. कार्यमग्न राहण्याची सवय करा. नाही त्या गोष्टींचा फारसा विचार करू नका. आपल्या कार्याला महत्त्व द्या. बुद्धिजिवी मंडळींना त्यांच्या उपक्रमातून यश मिळेल तसेच व्यवसायातील जुनी वादग्रस्त येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कुटुंबातील तरुण-तरुणींच्या समस्या संपुष्टात येतील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह जमतील. काहींचे ओळखीतून विवाह ठरण्याची शक्यता आहे.

पारिवारिक : सदर काळातील उत्तम ग्रहमान असलेली ही रास आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर उत्तम प्रभाव पडल्यामुळे आपण आपली कामे विनाविलंब पूर्ण करू शकाल. विशेषतः सरकारी कामांमध्ये यश मिळेल. अर्धवट राहिलेली कामे अथवा लांबलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रविष्ट असलेली प्रकरणे निकालात निघून त्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल. तसेच कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक विक्रमी यश मिळू शकेल व ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील. चालू नोकरीत अथवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजेच व्यवसाय-धंद्यामध्ये व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल. मात्र, कुटुंबामध्ये तसेच बाहेर वावरताना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे राहील. संसर्गजन्य आजारांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्रवास घडतील, परंतु प्रवासात सावध राहणे गरजेचे आहे, नाहीतर रंगाचा बेरंग होऊ शकतो, हे लक्षात ठेवा.

नोकरी, व्यवसाय व धंदा : चालू व्यवसाय धंद्यात बदल करायचा असल्यास त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले तर ते यशस्वी होतील. व्यावसायिक नवीन पर्याय मिळू शकतात. त्याचप्रमाणे आर्थिक मदतसुद्धा मिळू शकेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून नवनवीन संकल्पना वापरू शकाल. आपल्या आर्थिक उत्पन्नात वृद्धी झाल्याचे दिसेल. ग्लॅमरशी नाते असलेल्या जातकांना अनुकूल कालावधी आहे. सौंदर्यप्रसाधने, शृंगार साधने अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. कलाकारांना प्रसिद्धीसह अर्थार्जनात वाढ होईल. परदेशी जाण्याची संधी मिळेल.

शुभ दिनांक : 4,7,12,16,20,21,26

अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27,28

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य
आजचे राशिभविष्य, ५ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मकर

शुभ ग्रहमानाची साथसंगत

मकर राशीवर शनी महाराजांचे कारकत्व असते. ते आपल्या कर्माची फळं देत असतात. तसेच शनी महाराज न्यायाची देवता समजली जाते. दशम स्थानाशी म्हणजेच कर्माविषयी ही रास आहे. कर्माला प्राधान्य देणारी ही चर रास आहे. चंचलता आढळते, हिंडणे-फिरणे तसेच प्रवास इत्यादींची आवड असते. या राशीच्या जातकांना बदल आवडतो. वास्तू बदलणे किंवा घरातील वस्तूंची रचना बदलणे. अशा प्रकारची कामे त्यांना आवडतात. कपड्यांपासून सर्व गोष्टी ते बदलत असतात. नोकरी, व्यवसायातही बदल करू शकतात. अशा प्रकारचे प्रामुख्याने गुण मकर राशीच्या जातकांच्या स्वभावात दिसतात.

शिक्षण : या कालावधीमध्ये घेतलेल्या शिक्षणाचा आपल्याला भविष्यामध्ये फारच उपयोग होणार आहे हे नीट लक्षात ठेवावे. त्याप्रमाणे आपले प्रयत्न करणे जरुरी आहे. त्यावर आपले भविष्य अथवा भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे योग्य मार्गाने प्रयत्न करावे ते आपल्या हातात आहे. कुसंगतीपासून दूर राहावे तसेच वेळेचे नियोजन करावे ते उपयोगी पडू शकते. आपल्या परिश्रमांना योग्य ते फळ मिळेल व आपले भविष्य उज्ज्वल होईल. या काळामध्ये आपली स्मरणशक्ती चांगली राहील. त्यामुळे शिक्षणात चांगल्या प्रकारे यश लाभेल. कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी हा कालावधी उपयोगी पडू शकतो. स्पर्धा परीक्षेतही अपेक्षित यश प्राप्त होईल. परदेशातील शिक्षणासाठी योग्य दिशेने प्रयत्न केल्यास आपल्याला अपेक्षित यश मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रासाठी हा कालावधी अनुकूल आहे.

पारिवारिक : परिवारात आनंदाचे वातावरण राहील. शुभवार्ता मिळतील. परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या संपुष्टात आल्याकारणाने वातावरण बदलेल. घरातील सदस्य एकमेकांशी आपुलकीच्या भावनेने वागतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यास आपण समर्थ असाल. आपल्या कार्यक्षेत्रातील म्हणजेच नोकरी, व्यवसाय, धंद्यातील अंदाज आडाखे अचूक ठरल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होईल. पर्यायी आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन कामे हाती घेता येतील. आपले अपयश धुवून काढता येईल. विवाहयोग्य तरुण- तरुणींचे विवाह ठरतील. काहींचे प्रेमविवाह ठरू शकतात तसेच काहींना परदेशगमनाची संधी मिळू शकते. याकामी त्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. वास्तुविषयक व्यवहार होतील. त्यातून आर्थिक फायदा चांगला होईल. नोकरीमध्ये अनुकूलता निर्माण झाल्यामुळे नोकरीत स्वारस्य निर्माण होईल.

नोकरी, व्यवसाय व धंदा : या कालावधीमध्ये काही वेळेस अनपेक्षित घटना घटित होऊन त्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य ढळू शकते. शांतपणे विचार करून कोणत्याही घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. वेळप्रसंगी कुटुंबातील इतर सदस्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका ते हिताचे ठरेल. विशेषतः आर्थिक बाबतीत काही पथ्य पाळणे गरजेचे ठरेल. व्यवसाय, धंद्यामध्ये आपल्या क्षमतेचा विचार करणे अपरिहार्य ठरेल.

शुभ दिनांक : 1,12,20,21,26,29

अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27,28

logo
marathi.freepressjournal.in