

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मेष
मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार संपन्न होतील
मेष रास ही मंगळाची रास आहे म्हणजेच मेष राशी वरती मंगळ या ग्रहाचे कारकत्व आहे. मुख्यतः या राशीच्या जातकांमध्ये मंगळाचे बहुतेक गुण समाविष्ट असल्याचे दिसते या जातकांना हिंडण्या फिरण्याची आवड असते. तसेच ही चर राशी असल्या कारणाने या राशीच्या जातकांना फिरण्याची जास्त आवडते. हे जातक आपल्या वापरण्याच्या वस्तू म्हणजेच कपडे वाहन वगैरे इत्यादींच्या मध्ये वारंवार बदल घडवत असतात. तसेच आपल्या रोजच्या कार्यात अथवा कार्यक्षेत्रात म्हणजे व्यवसाय धंद्यात बदल करताना दिसतात. घरातील सामान फर्निचर इत्यादींच्या जागेमध्ये बदल करणे हे त्यांना आवडते.
शिक्षण : या राशीच्या जातकांना सर्व प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी ग्रहांची अनुकूलता लाभली असली तरी अभ्यास करताना मन एकाग्र होणे किंवा लक्ष केंद्रित ठेवणे काहीसे अवघड जाणार आहे. त्यामुळे प्रयत्नपूर्वक यांना आपले मन एकाग्र करणे गरजेचे आहे व शांतपणे तसेच सातत्याने अभ्यास करणे महत्त्वाचे ठरेल. यामुळे चांगले यश मिळू शकते स्पर्धा परीक्षांसारख्या परीक्षांच्या मध्ये यश प्राप्त करू शकाल, पण त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आपल्या हातात आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे राहील. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त होईल. परदेशासंबंधीच्या क्षेत्रात चांगले यश प्राप्त करू शकाल; परंतु प्रयत्न त्या दृष्टिकोनातून करणे गरजेचे आहे.
पारिवारिक : सदरील काळामध्ये अनुकूल ग्रह मानाचे परिणाम आपल्याला आपल्या कुटुंब परिवारा वरती सातत्याने झाल्याचे दिसून येतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. त्यांचे भाग्योदय होऊ शकतात. नोकरी विषयक तसेच विवाह विषयक प्रश्न संपुष्टात येतील जे विवाह लांबले होते. त्या प्रकारचे विवाह ठरताना अनुभवता येईल. तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येऊ शकतो. परदेशी राहणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. कुटुंब परिवारातील वृद्धांच्या आरोग्याला जपणे अनिवार्य ठरेल. व्यावसायिकांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कायदेशीर बाबी पाळाव्यात. त्यांचे उल्लंघन करणे फारस महागात पडू शकेल याची जाणीव ठेवावी.
नोकरी, व्यवसाय व धंदा : व्यापार व्यवसाय धंद्यामध्ये मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार संपन्न होतील. तसेच भांडवली खर्च वाढू शकतो. विशेषतः आयात निर्यातीच्या क्षेत्रामध्ये नवीन दीर्घ मुदतीचे करारमदार होऊ शकतात. परदेशी संबंध येतील. त्याचप्रमाणे जुने संबंध नव्याने प्रस्थापित होऊ शकतात. काही वेळेस भागीदाराची मते अथवा अंदाज अचूक ठरल्याने त्याचा व्यवसायावर पोषक परिणाम होऊन व्यावसायिक उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे व्यावसायिक समृद्धी. कुटुंब परिवारात आनंदी वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. त्याचप्रमाणे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळणे गरजेचे आहे. कलाकार खेळाडूंना उत्तम उत्तम संधी उपलब्ध होतील. प्रसिद्धी बरोबर अर्थार्जनही वाढेल.
शुभ दिनांक : १,४,७,१२,१६,२०,२१,२६,२९
अशुभ दिनांक : २,८,९,१०,११,१३,१५,१७, २७
वृषभ
गतिमान घटना घटीत होतील
वृषभ रास ही शुक्राची रास आहे. म्हणजेच वृषभ राशि वर शुक्र या ग्रहाचे प्राबल्य असते. त्यामुळे शुक्रिया ग्रहाच्या अंगी असलेले गुण वृषभ राशीच्या जातकांच्या स्वभावामध्ये उठावदार पद्धतीने असतात. त्याचप्रमाणे वृषभ रास ही स्थिर रास आहे. या राशीच्या जातकांना एका जागी बसणे पसंत असते. हिंडणे फिरणे फारसे आवडत नाही कंटाळा येतो, परंतु निसर्गाची जास्त आवड असते. निसर्गामध्ये हे जातं रमतात. त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू तसेच व्यवसाय धंदा नोकरी म्हणजेच आपले कार्यक्षेत्र स्थिर ठेवण्यात यांना स्वारस्य असते. वृषभ राशीचे जातक सौंदर्य पूजक असतात. नीटनेटके राहणे हे त्यांना आवडते. स्वच्छता आवडते.
शिक्षण : चालू ग्रहमानाची थोड्याफार प्रमाणात अनुकूलता मिळू शकते. म्हणजेच शिक्षणासाठी मिश्र स्वरूपाचे ग्रहमान आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मिश्र स्वरूपाची फळे प्रतिपादित होऊ शकतात. सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील असे गृहीत धरू नका. कधी ऊन तर कधी पाऊस अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. शिक्षण क्षेत्रात जरी अडथळे निर्माण झाले तरी आपली ग्रहण क्षमता चांगली राहील. त्यामुळे आपण केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहून परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे मिळणारे यश हे पण उल्लेखनीय असू शकेल परंतु त्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य व प्रामाणिकपणा हवा योग्य दिशेने प्रयत्न हवेत. त्यामुळे यशाचा मार्ग प्रशस्त होईल. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश मिळेल. परदेशासंबंधी शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील इतरांची मदत सुद्धा मिळू शकते.
पारिवारिक : या कालावधीच्या सुरुवातीपासूनच कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या करिअर बद्दल महत्त्वाचे प्रश्न सुटतील. त्याचप्रमाणे विवाह विषयक समस्या संपतील विवाह ठरतील. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरी व व्यावसायिक पार्श्वभूमीवर गतिमान घटना घडत होतील. सरकारी कामे जी रखडलेली होती असा कामांना गती मिळून ती पूर्ण होतील. तसेच कोर्ट विषयक कामे सुद्धा होतील. त्यामुळे कुटुंब परिवारातील वातावरण बदलेल. अधिक उत्साही व आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल. व्यवसायिक उत्सव प्रदर्शने यशदायक सिद्ध होतील उत्पन्नाचे प्रमाण वाढेल.
नोकरी, व्यवसाय व धंदा : आपल्या कार्यक्षेत्रात नोकरीत अथवा व्यवसाय धंद्यात आपण आत्तापर्यंत केलेल्या कार्यावर प्रकाशझोत पडेल. आपण आतापर्यंत केलेल्या कार्याचे अनुकूल फळांमध्ये रूपांतर होईल कष्टाचे चीज होईल. आपल्या केलेल्या कामाचे यश निश्चितपणे मिळेल. त्यामुळे समाधान लाभेल. कुटुंब परिवारातील सदस्यांप्रती असलेल्या आपण जबाबदाऱ्या पूर्ण केल्यामुळे कृतकृत्याची भावना आपल्या मनात राहील. आई वडील तसेच भावंडांशी जवळीक साधली जाईल. संवादातून आपणास चांगल्या संधी प्राप्त होतील आपल्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवा आपण आपली एक नवीन ओळख इतरांना करून द्या व्यवसाय धंद्यात तसेच कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य सिद्ध राहतील.
शुभ दिनांक : १४, ७, २०, २१, २९
अशुभ दिनांक : २,८,९,१०,११,१३,१५, १७, २७