

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
तुळ रास
व्यक्तिमत्त्वाचा उत्तम प्रभाव पडेल
तूळ राशी शुक्राची रास असल्याने शुक्र ग्रह जसा आकाशात चमचमतो तशी काही वैशिष्ट्ये तुळ रास असलेल्या व्यक्तींच्या मध्ये आढळतात शुक्र या ग्रहाचे तुळ राशी वरती वर्चस्व आहे या व्यक्ती योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ शकतात तेवढी त्यांची क्षमता असते यांचे निर्णय शक्यतो चुकत नाहीत नेहमी समतोल प्रकारे निर्णय घेण्याची क्षमता असते यांच्यात व्यापारी वृत्ती असते तुळ राशींच्या व्यक्तींना सतत बदल करणे आवडते तसेच तूळ रास ही चररास आहे सतत कपडे बदलले घरातील वस्तूंच्या जागा बदलणे अथवा त्यात बदल करणे यांना आवडते घराची अंतर्गत रचना वारंवार बदलणे यांना आवडते प्रवासाची तसेच फिरण्याची आवड असते तसेच सौंदर्य पुजारी असतात.
शिक्षण : सदरचा कालावधी विशेषतः तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना अथवा शिक्षण घेणाऱ्या जातकांना अतिशय अनुकूल जाईल स्पर्धा परीक्षेमध्ये विक्रमी यश मिळवू शकाल तसेच शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येईल परंतु त्यासाठी आपल्याला आपण सतत कष्ट घेण्याची व परिश्रमात वाढ करण्याची आवश्यकता आहे तसेच कुसंग प्रत्कर्षाने टाळा इतरांच्या नादी लागू नका स्वतःच्या मताने निर्णय घ्या ते जास्त अचूक ठरतील परदेशासंबंधी शिक्षण घेण्यात अनुकूलता लाभल्याने त्याचा आवश्यक फायदा घ्या कष्ट करण्यामध्ये अथवा प्रयत्न करण्यामध्ये मागे राहू नका इतरांची मदत मिळू शकते परंतु स्वकष्टाने आपण उज्वल यश मिळवू शकाल स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळू शकते मन शांत ठेवणे गरजेचे आहे गोंधळून जाऊ नका.
पारिवारिक : सदरील काळा मधील उत्तम ग्रहमान असलेली ही रास आहे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांच्यावर उत्तम प्रभाव पडल्यामुळे आपण आपली कामे विना विलंब पूर्ण करू शकाल विशेषतः सरकारी कामांमध्ये यश मिळेल अर्धवट राहिलेली कामे अथवा लांबलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रविष्ट असलेली प्रकरणे निकालात निघून त्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल तसेच कुटुंब परिवारातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक विक्रमी यश मिळू शकते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील तसेच चालू नोकरीत अथवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजेच व्यवसाय धंद्यामध्ये व्यावसायिक पत प्रतिष्ठा वाढेल मात्र कुटुंबामध्ये तसेच बाहेर वावरताना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे राहील संसर्गजन्य आजारांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे प्रवास घडतील परंतु प्रवासात सावध राहणे गरजेचे आहे नाहीतर रंगाचा बेरंग होऊ शकतो हे लक्षात ठेवा.
नोकरी व्यवसाय धंदा : या कालावधीमध्ये आपण आपल्या व्यवसायामध्ये प्रगती तसेच उन्नती करू शकाल व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरवून व्यवसाय एका नवीन उंचीवर नेऊन ठेवण्यास यशस्वी व्हाल इतरांची मदत मिळू शकते त्याचप्रमाणे आर्थिक सहाय्य पण उपलब्ध होईल व्यावसायिक मोठ्या घडामोडी घडू शकतात त्यातून आपला आर्थिक फायदा होईल विशेषतः आयात निर्यात क्षेत्रात दीर्घ मुदतीचे करार होतील नवीन नाती प्रस्थापित होतील परदेश गमनाची शक्यताआपल्या भौतिक सुविधांमध्ये वृद्धी होईल. राहत्या घराच्या सुशोभी करणासाठी मुक्तहस्ते खर्च कराल महागड्या वस्तूंची खरेदी होईल आपल्या जीवनमानात परिवर्तन होईल. रोजचा दिनक्रम बदलू शकतो .कुटुंब परिवारातील महिला आपल्याला हवी तशी खरेदी करू शकतील. पती पत्नी मधील पूर्वी असलेले मतभेद मिटवून विश्वास व परिपक्वता नात्यांमध्ये दिसून येईल व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील नवे व्यावसायिक करार मदार होतील. मोठे व्यावसायिक दीर्घकालीन सौदे हाती येतील. व्यावसायिक नवीन नाती जुळतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. प्रशासनिक व संरक्षण विभागात कार्यरत जातकांना विशेष अनुकूल कालावधी. शुभ समाचार मिळतील चिकित्सा क्षेत्राशी जोडले गेलेल्या जातकांना नव्या संधी मिळून अर्थ मान सुधारेल.
शुभ दिनांक : 4,7,12,16,20,21,26
अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27,28
वृश्चिक रास
आर्थिक संकट टळेल
वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे म्हणजेच मंगळ या राशी वरती राज्य करतो मंगळाचे कार्य करतो या राशीवरती असते वृश्चिक रास ही स्थिर रास आहे त्याचप्रमाणे ती स्त्री रास आहे संसाराची आसक्ती घर करून राहण्याची वृत्ती या राशीच्या जातींमध्ये असते वृश्चिक रास ही स्थिर रास आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांना प्रवासाची फारशी आवड नसते फिरण्याचा कंटाळा असतो सर्व कामांच्या बाबतीत यांना स्थैर्य आवडते सर्व गोष्टी स्थिर ठेवण्याकडे यांचा कल असतो वास्तु व्यवसाय नोकरी इत्यादींमध्ये बदल करण्यास ते फारसे तयार नसतात त्यांना बदल आवडत नाहीत कामातील बदल शक्यतो स्वीकारत नाहीत तसेच त्यांच्या स्वभावातही फारसे बदल दिसून येत नाहीत.
शिक्षण : सदरचा कालावधी शिक्षणासाठी अनुकूल असला तरी आपल्याला अधिक परिश्रम व कष्ट घेण्याची आवश्यकता आहे तशी ग्रहमानाची अनुकूलता मिळणारही आहे त्याचा फायदा जरूर होईल आपले प्रयत्न प्रामाणिक असल्यास त्यामध्ये यश नक्कीच मिळेल कला व क्रीडा क्षेत्रातही आपणास अनुकूलता लाभेल परदेशातील शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित यश प्राप्त करता येईल.
पारिवारिक : कालावधीच्या सुरुवातीला ग्रहमानाची चांगली साथ मिळेल स्थैर्य लाभेल कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या कडून त्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी वार्ता समजल्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील तसेच विवाहयोग्य तरुण तरुणांचे विवाह जमू शकतात विवाह ठरण्यामधील अडचणी दूर होतील आर्थिक परिस्थिती चांगली राहील एखाद्या आर्थिक संकट असल्यास ते टळेल आर्थिक मदत मिळू शकते मात्र चालू नोकरीमध्ये सांभाळून राहायला हवे हितशत्रूंच्या कारवाया मध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही गटबाजी मध्ये अथवा राजकारणामध्ये सामील होऊ नका स्वतःची मते जाणीवपूर्वक देणे टाळा या कालावधीच्या उत्तरार्धात सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट देऊ शकाल आपल्या हातून दानधर्म होऊ शकेल धार्मिक कार्यात सहभा सहकुटुंब मौज मजेचे योग आहेत कुटुंब परिवारातील असलेल्या मुला मुलींच्या चिंता संपुष्टात येतील कुटुंब परिवारातील वातावरण आनंदाचे आणि उत्साही राहील.
नोकरी व्यवसाय धंदा : आपल्या कार्यक्षेत्रात तसेच व्यवसाय धंद्यामध्ये अचानक धनलाभ होऊ शकतो व्यावसायिक वसुली होईल परंतुआपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला नवनवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो या कालावधीमध्ये शांत राहून लहान मोठे निर्णय पूर्ण विचारांती घेणे महत्त्वाचे ठरेल. गरज भासल्यास इतरांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो. रागावर नियंत्रण जरुरीचे. कोणाचाही अपमान करू नका त्याचप्रमाणे इतर कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवा वस्तुस्थितीची दखल घ्यावी लागेल. इतरांच्या मतास प्राधान्य द्या. कुटुंब तसेच कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा. नोकरीमध्ये वरिष्ठांना योग्य तो मान द्या. इतरांवर अवलंबून न राहता दिलेली कार्य पूर्ण करा. कार्य मग्न रहा. राजकारण व गटबाजी पासून अलिप्त रहा. सरकारी नोकरीत आपल्या अधिकाराच्या कक्षा ओळखून आपली कार्य पूर्ण करा सत्तेचा गैरवापर अंगाशी येऊ शकतो तसेच लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. मोह नको. आपल्या किमती मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. वाहने जपून चालवा. कुटुंब परिवारातील लहान मुलांना जपा तसेच आपल्या जवळील मौल्यवान वस्तू जपा चोरीची शक्यता नाकारता येत नाही.
शुभ दिनांक : 1,4,7,12,16,20,21,29
अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27,28