मेष - विशिष्ट महत्त्वाची कामे पूर्ण होतील. अश्वासक परिस्थिती राहील. धनलाभ याची शक्यता नोकरी मधील बदल अनुकूल ठरतील. प्रवासात सतर्क राहा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक.
वृषभ - वैवाहिक जीवनातील समज-गैरसमज टाळून वाद-विवाद अलिप्त रहा. व्यवसाया मध्ये वातावरण चांगले राहील. प्रवाही आणि वेगवान घटना घडतील. आपला इतरांवर प्रभाव राहील. कौतुक होईल.
मिथुन - मित्रमंडळींच्या वर्तुळात तसेच कुटुंबांमध्ये वादविवाद टाळा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कामांमध्ये मान्यवरांची मदत मिळेल. कलाकार साहित्यिक यांना प्रसिद्धी बरोबर धनलाभ होईल.
कर्क - अनुकूल घटना घडल्यामुळे आपल्या उत्साहात आणि आनंदात वाढ होईल. भाग्योदय कारक घटना घडल्यामुळे कुटुंबातील वातावरण चांगले राहील मात्र एखादी गुप्त चिंता मनात घर करून राहील.
सिंह - व्यवसाय धंद्यात सरकारी नियम तसेच कायदे पाळा. सरकारी प्रकरणातून त्रास होऊ शकतो. मानसिक संतुलन ठेवा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्यावे. धनलाभाचे योग.
कन्या - कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वादविवादा पासून अलिप्त राहणे हितकारक ठरेल. व्यवसायात उलाढाल वाढून नवीन करारमदार होण्याची शक्यता.
तुळ - शुभ ग्रहांचा वरचष्मा राहील. नोकरीत आपल्या मताला मान मिळेल. कुटुंबात सुवार्ता मिळतील. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. जुगार सदृश्य व्यवहार करू नका.
वृश्चिक - महत्त्वाच्या कामात आलेल्या अडचणी अस्वस्थ करतील. वैवाहिक जीवनात वाद विवाद नको. व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील काहींना परदेशगमनाचे योग. सुवार्ता येतील.
धनु - समाजातील मान्यवर तसेच थोरामोठ्यांचे आशीर्वाद लागतील. गुरुजनांच्या मार्गदर्शनाबरोबरच त्यांची मदतही मिळू शकते. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. स्वतःच्या मतास नियंत्रणात ठेवा.
मकर - व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील. व्यवसायात काही नवीन बदल केलेले सफल होतील. व्यवसायात भागीदार आपल्या मतास प्राधान्य देईल. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील.
कुंभ - महत्त्वाची कामे करण्यासाठी अनुकूल दिवस. नोकरीमध्ये इतरांशी वादविवाद करू नका. वरिष्ठांशी पटवून घेण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता लागेल. राजकीय क्षेत्रात विरोधक प्रबळ.
मीन - आपल्यातील कलागुणांना ऊर्जा मिळून प्रकाश पडेल. काहींना परदेशगमनाचे योग आहेत. कुटुंबातील विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. मानपानाच्या प्रसंगावरून रंगाचा बेरंग होऊ शकतो.