सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे सप्टेंबर महिना? जाणून घ्या...
september-2025-horoscope-dhanu-makar-Sagittarius - Capricornus-rashi-marathi-rashi-bhavishya
Published on

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

धनु रास

बदलत्या सरकारी धोरणातून लाभ

मुख व मान हे अवयव अत्यंत भरदार छाती पुढे करून डुलवित चालणारा, हनुवटी मोठी, तालीमबाज, शरीर बळकट व निरोगी काटक, नाक चाफेकळीसारखे, शरीराची ठेवण विशेष पांढरीशूत वर्ण. साधारण गोरा, लढवय्या, डोळे किंचित पिंगट, विद्या कमी, कविता कुशल, पितृ द्रव्यप्राप्ती असणारा, कर्मशील, शिल्पज्ञ, बंधू द्वेष्टा, समुपचराने वश होणारा, बलाने वश न होणारा, न्यायप्रिय, लज्जित, आपल्या कुलात प्रमुखपणे मान मिळणारा, शत्रूपक्षावर विजय मिळवणारा, श्रेष्ठतेस पोहोचणारा, संततीसंख्या मध्यम, त्यात पुत्राधिक्य असे धनु राशीचे स्वरूप आहे.

शिक्षण : सर्वसाधारणपणे हा कालावधी शिक्षणासाठी चांगला आहे. त्यातल्या त्यात तांत्रिक शिक्षणासाठी हा कालावधी उत्तम मानला जातो, तसेच कला-क्रीडा क्षेत्रासाठीही अनुकूलता असणार आहे. परदेशात शिक्षण घेणाऱ्या किंवा तिथे स्थायिक राहून शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना जरा जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रामाणिक परिश्रमांची आवश्यकता आहे. तेव्हा चांगले यश मिळू शकते. सतत अभ्यासात मग्न राहणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते.

पारिवारिक : कुटुंबात सध्याच्या काळामध्ये काही वेळेस मतभेद जाणवण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसात मतभेद अथवा वितुष्ट येण्याची शक्यता. वादविवाद घडून कलहसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी आपल्याला पुढाकार घेऊन वादविवाद मिटवणे गरजेचे राहील व शांतता टिकून ठेवण्यास मदत करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांना समजून घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताला प्राधान्य दिल्यास बरेचसे प्रश्न सुटतील. वादविवाद निर्माण होणाऱ्या बारीकसारीक घटनांना फारसे महत्त्व देऊ नका. त्यांना दुर्लक्षित करा, हेच हिताचे राहील. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवता येतील. प्रयत्नांमध्ये नक्की यशस्वी व्हाल. कुटुंबातील स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी-व्यवसाय- धंद्यात वातावरण अनुकूल राहील. आपण पूर्वी केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरवू शकाल. व्यवसाय-धंद्यामध्ये नवनवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरेल. आपला व्यवसाय एका नव्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यास सक्षम राहाल. भागीदारीच्या व्यवसायात विशेष फायदा होईल. मात्र भागीदाराच्या मताला प्राधान्य द्या. नवीन गुंतवणूक करता येईल. त्यासाठी आर्थिक सहाय्यही लाभेल. व्यापार-व्यवसाय विस्तार करू शकाल. त्याचबरोबर एखादा नवीन जोडधंदा सुरू करता येईल. परंतु आपण आपल्या कार्यात शिस्तबद्धता राखणे महत्त्वाचे राहील. घाईगर्दीत घेतलेले निर्णय निश्चितपणे चुकतील. त्यामुळे अवधान ठेवा व शांतपणे निर्णय घ्या. बदलत्या सहकारी धोरणांचा व्यवसाय-धंद्यासाठी विशेष फायदा होईल. सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. त्याचा आपल्या आर्थिक परिस्थितीवर निश्चितच सकारात्मक ठसा उमटेल. आपली आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. जमीनजुमला, स्थायी संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रात भाऊबंदकीतून त्रास होऊ शकतो व जमत असलेले व्यवहार पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे नियोजन करा. शक्यतो वादविवादाशिवाय प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष ठेवा. ते आपल्या हिताचे राहील. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मताला योग्य ते प्राधान्य दिल्यास फारसे प्रश्न निर्माण होणार नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचे सहकार्यही मिळेल. आपली कामे सोपी होतील. सहकाऱ्यांबरोबर विनयशीलतेने वागा, राजकारण तसेच गटबाजी यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. कुसंगत टाळा. इतरांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या वर्तनात बदल होऊ देऊ नका. ते आपल्या हिताचे ठरणार नाही. नोकरीमध्ये इतर शत्रूपिडा सभोवती असल्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे विशेषत्वाने लक्ष दिल्यास ते फायद्याचे ठरेल. परिवारातील परिस्थिती समाधानकारक राहील. काही शुभवार्ता मनाला आनंद देतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. काहींचे विवाह योग आहेत. विवाह निश्चित होऊ शकतात.

शुभ दिनांक : २,४,५,११,१४,१७,१९,२२,२७,३०

अशुभ दिनांक : ७,८,१३,१५,२१,२५,२७

मकर रास

वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील

स्व स्त्री व स्व पुत्र यांचे फार लाड करणारा धर्मिष्ठ शरीराने कृश. त्यात कमरेखालचा भाग जास्त कृश असतो. मकर रास ही शनितत्त्वाची रास आहे. त्यामुळे शनिचा कठोरपणा या राशीच्या व्यक्तींकडे असतो. शनि हा ग्रह सत्यवादी आहे. नेत्र उत्तम, कंबर बारीक. कित्येक वेळा शरीर लठ्ठ, मिशा मोठ्या व किल्लेदार भुवयांचे केस राठ, केसांचे प्रमाण जास्त, शरीर किंचित ओबडधोबड, अप्पलपोट्या, खादाड, चिडखोर. जमा-खर्च ठेवण्याची आवड बाळगणारा, जीवन अगदी कमी किंवा अगदी जास्त तोंड वेडेवाकडे करण्याची जास्ती सवय. बोलताना एकदम मोठा किंवा हळू आवाज असणारा, आवाज काढणारा. वातबद्ध शरीर, स्नानसंध्या नियमित करणारा, प्रवास करणारा, शरीराच्या मानाने डोक्याचा आकार मोठा, जबडा मगरीसारखा किंवा अधिक बारीक. विद्या, बुद्धी कमी, चंचल सामान्यतः मूर्खच, संगीत तज्ज्ञ. डोंगर, जंगल, वने यात राहण्याची आवड. उदारपणा कमी, संतती मध्यम, कन्याधिक्य असे मकर राशीचे स्वरूप आहे.

शिक्षण : शिक्षणासाठी आपणास लक्ष देऊनच अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासात सातत्य ठेवावे लागणार आहे. त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करणेही गरजेचे ठरेल. इतरत्र वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरेल. त्याचा उपयोग होईल. उज्ज्वल यश प्राप्त करू शकाल. त्याचप्रमाणे कुसंगतीपासून दूर राहणे महत्त्वाचे राहील. कष्ट घेऊन, परिश्रम घेऊन अभ्यास करावा लागेल. मात्र योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नाचे फळ निश्चित मिळेल. अपेक्षित यश मिळवू शकाल. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. चांगले यश मिळू शकतेे. इतरांची मदत मिळेल.

पारिवारिक : काही वेळेस परिवारात आर्थिकदृष्ट्या अपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी आधीच काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. म्हणजेच आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल. त्याचप्रमाणे कोणतेही लहान-मोठे आर्थिक निर्णय घेताना शांतपणे व पूर्ण विचारांती घेणे गरजेचे ठरेल. वेळ पडल्यास परिवारातील सदस्यांबरोबर चर्चा करून परिस्थितीवर मात करता येईल. आपण सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहात. संयम, जबाबदारी, ध्येय यामुळे प्रगती होईल. आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्यामुळे सतर्कता असेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. त्यामुळे योग्य नियोजन असणे आवश्यक राहील. परिवारातील तरुण-तरुणींकडून अपेक्षित सहकार्य मिळत राहील.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : बदलत्या ग्रहमानानुसार फळे प्रतिपातीत होतील. त्यामुळे थोडे सतर्क राहणे गरजेचे आहे. काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. काही महत्त्वाच्या कामांमध्ये पूर्णता येण्यासाठी काही महत्त्वाचे बदल पूर्वीच्या नियोजनात करावे लागतील. आयत्या वेळेस काही अडचणी निर्माण होऊ शकतात. समस्या निर्माण होतील, परंतु त्याबद्दल ताणतणाव घेण्याचे काही कारण नाही. कारण या समस्यांवर आपण यशस्वीपणे मात करू शकाल, मात्र व्यावसायिक क्षेत्रातील कोणतेही लहान-मोठे आर्थिक निर्णय घेताना दोन्ही बाजूचा साकल्याने विचार आवश्यक राहील, पण जे नुकसान होणार नाही. कोणत्याही जुगारसदृश व्यवहार करू नका. त्याचप्रमाणे शेअर मार्केट सट्टाबाजार यामध्ये नवीन गुंतवणूक नका. कोणतीही नवीन गुंतवणूक करणे धाडसाचे ठरेल, मात्र व्यावसायिक वसुली होईल. वैवाहिक जीवनातून काही सुवार्ता मिळतील. नवदाम्पत्याला अपत्ययोग आहे. त्याचप्रमाणे सहकुटुंब प्रवासाचे योग आहेत. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विवाह ठरण्यामधील अडचणी दूर होतील. तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. सरकारी स्वरूपाच्या नोकरीमध्ये अथवा कामांमध्ये लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. काही वेळेस सरकारी माध्यमातून त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळामध्ये कुटुंबातील महिलांनी विशेषतः गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मातृ-पितृ चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे.

शुभ दिनांक : २,५,६,९,१७,१८,२२,२७,३०

अशुभ दिनांक : ७,८,१३,१५,२१,२५,२७

logo
marathi.freepressjournal.in