
डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण
तुळ रास
व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल
देव ब्राह्मण साधुसंत यांचे पूजन करणारा श्रद्धावान सत्वरी सर्व धर्मचारिणी पुण्य कर्म करणारा ईश्वर भक्त समतोल वृत्तीचा सूची पूर्त उंच शरीर व उभटचेहरा हातापायांच्या नळ्या बाकदार पाय शरीर सडक पातळ वर्ण सावळा उंच नाक प्रवासी बोलताना मान हलवणारा वारंवार हस्ते तोंड आकुंचन करून व मसाले बाईक भाषण करणारा स्वर लहान तडजोडीची आवड न्याय कर्मात प्रवीण उभा असताना व चालताना पोक काढल्यासारखा दिसणारा दूर दूर पावले टाकून जलद चालणारा देवघवीमध्ये कुशल श्रीमंत रोगी भावंडांवर उपकार करणारा बंधुवर्गाकडून निर्भसना पावणारा विद्वान शास्त्रज्ञ कफ व वायु तत्वाचे शरीर असणारा आपल्या मनाचा थांग लागू न देणारा कष्टाची तयारी असणारा संतती कमी त्यात पुरुष संतती कमी असते वृद्धावस्थेत आप्तेष्टांचा वियोग होतो अशी वैशिष्ट्ये असलेला जातक तूळ राशीच्या अधिपत्याखाली येतो. तूळ रास ही सर्वांना समान न्याय देणारी रास आहे. गुणवान, राजस रास म्हणून ती ओळखली जाते.
शिक्षण :- शिक्षणासाठी हा कालावधी अत्यंत चांगला आहे. परीक्षेत तसेच स्पर्धा परीक्षांच्या मध्ये चांगल्या प्रकारे यश संपादित होण्याची शक्यता आहे गुरुजनांकडून तसेच कुटुंबांमधून सहाय्य मिळू शकते परदेशातून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात पण त्यासाठी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न मात्र करा प्रयत्नात कमी पडू देऊ नका काही वेळेस अडचणी निर्माण होऊ शकतात परंतु मदत मिळेल समस्या सोडवण्यात यश मिळू शकते कला क्रीडा क्षेत्रातही चांगले यश लाभेल तांत्रिक क्षेत्रात मात्र जास्त प्रयत्नांची गरज आहे कष्टामध्ये सातत्य ठेवल्यास उज्वल भविष्य आपल्यासमोर असेल. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी प्रयत्न करावेत.
पारिवारिक :- कुटुंब परिवारातील सदस्यांची कोणत्या ना कोणत्या बाबती मध्ये आपल्याला काळजी घ्यावयास लागणार आहे. जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. त्या जबाबदाऱ्या आपण पूर्णपणे पार पाडू शकाल त्याचबरोबर कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्यांमुळे खर्चातही वाढ होणे संभावित आहे त्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज भासेल परंतु घरात एखाद्या मौल्यवान वस्तूची खरेदी पण होईल कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. त्यात आपण धन्यता मानाल नवीन आत्मिक समाधान मिळेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी व्यवसाय धंद्यामध्ये पूर्वार्धामध्ये सकारात्मक घडामोडीतून मन प्रसन्न राहील व्यवसाय धंद्यामध्ये काही नवीन घटना घटीत होऊन आपल्या उत्पन्ना मध्ये वृद्धी होईल व्यवसाय धंद्यामध्ये आपण काही नवीन संकल्पना राबवल्यामुळे व्यावसायिक उलाढाल वाढेल नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल आपली व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढीस लागेल सामाजिक तसेच धार्मिक कार्यात आपण रस घेऊ शकता वेळेस खर्चही कराल चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडू शकतात पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळू शकते एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे मात्र स्थान बदल व कामाच्या स्वरूपातील बदल सकारात्मक रित्या स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे वरिष्ठ तसेच सहकारी यांचे वाढते सहकार्य मिळेल. आपल्या कामाचे कौतुक होऊन आपण गौरवास पात्र ठराल कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील विशेषतः नोकरीविषयक असलेले प्रश्न अथवा समस्या संपतील बेरोजगारांना रोजगार मिळेल विद्यार्थ्यांना त्यांचे अर्थार्जन चालू करता येईल त्यामुळे जीवनातील एक नवा अध्याय सुरू करू शकाल प्रेमामध्ये यश मिळेल कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्याकडून त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रगती पर वार्ता कानी येतील त्यामुळे कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध होतील. सहकुटुंब सहपरिवार लहान मोठ्या अंतराचे प्रवास घटित होऊ शकतात परंतु या प्रवासामध्ये सावध राहून वाहन चालवणे गरजेचे राहील आपल्या मौल्यवान वस्तू व वाहन यांची काळजी घ्या नाहीतर रंगाचा बेरंग होऊ शकतो ते टाळा कोणाशीही स्पर्धा नको.
शुभ दिनांक : - २, ९, १७, २२, २३, २७, ३०
अशुभ दिनांक : - ७, ८,१३, १५, २१, २५, २७
वृश्चिक रास
समस्यांवर मात कराल
वक्षस्थळ व डोळे यांचे आकार मोठे कमरेच्या वरच्या भागापेक्षा खालचा भाग तोकडा अवयव तोंकडे उंची कमी नाक मोठे व फुगीर बांधा मजबूत कुड्या मनाचा गुप्त विचारांनी सूड घेणारा बालपणी रोगी पिंगट वर्णाचा निरनिराळ्या वेळेस वेगळे वेगळे विचार प्रकट करणारा गंभीर टोचून बोलणारा त्यागशील साहसी पित्तकोपि कुटुंब संपन्न मतलबी लोकांच्या जाळ्यात सहज सापडणारा राजसेवक शत्रूंशी नेहमी झगडणारा मैत्री ठेवणारा गुरु व मित्र यांच्याशी द्रोह करणारा उग्र स्वभावी गुप्त पापे करणारा डॉक्टर विद्यासंपन्न करणारा रसायने तयार करणारा शूद्र कामे करणारा स्त्रियांचा शौकीन किंवा एकांतात राहण्याची आवड असणारा हलक्या कानाचा गर्विष्ठ दुसऱ्यांवर वचक ठेवणारा संतती जास्त कन्या संतती जास्त असणारा रसायनशास्त्र डॉक्टर वैद्य अशांसारखे व्यवसाय असणारा इत्यादी वैशिष्ट्ये राशीच्या जातीकांमध्ये आढळतात.
शिक्षण :- सदरचा कालावधी आपल्या शिक्षणासाठी चांगला आहे अभ्यासासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत सातत्याने अभ्यास केला पाहिजे त्याचप्रमाणे वेळेचे नियोजन करून योग्य दिशेने प्रयत्न चालू ठेवल्यास आपल्याला आपल्या शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रात यश मिळू शकते उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होईल त्या कामी आपल्याला गुरुजनांची तसेच कुटुंबीयांची मदत मिळू शकते परदेशी जाण्याचे प्रयत्न होऊ शकतात अगोदरच परदेशात राहणाऱ्या व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात जास्त चांगल्या संधी निर्माण होतील व त्यात चांगले यश येईल कला क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी चांगल्या चांगल्या संधी मिळू शकतात पण प्रामाणिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
पारिवारिक :- आपल्या अपेक्षेप्रमाणे परिवारातील प्रत्येक सदस्य आपल्याला वाढते सहकार्य देईल विशेषतः भावंडांकडून सहकार्य मिळू शकते कुटुंबात व परिवारात एखाद्या मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे कुटुंब परिवारातील विवाह योग्य तरुण तरुणांचे विवाह ठरतील मंगल कार्याचे नियोजन करू शकते आप्तेष्ट नातेवाईकांची मदत होईल कुटुंब परिवारात आपल्याला अपेक्षित असलेली शांतता राहील अध्यात्मक तसेच सामाजिक कार्यात रुची घ्याल सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचे घटित होत आहेत घरातील व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण होतील मनोरंजन व आनंदाचा प्रवास घडेल हातून दान धर्म घडू शकतो.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- सदर कालावधीच्या सुरुवातीला आपल्याला काही अनपेक्षित समस्या अथवा अडचणी यांचा सामना करावा लागू शकतो त्यासाठी तयार राहिले पाहिजे त्याचबरोबर कोणतेही लहान मोठे निर्णय शांतपणे व पूर्ण विचारांती घेतल्यास येणाऱ्या समस्येवर अथवा अडचणींवर योग्य वेळी मात करू शकाल समस्या सोडवू शकाल आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे भान ठेवा उलट सुलट बाजूंचा भेट विचार करा आणि मगच निर्णय घ्या काही वेळेस आपल्या कार्यक्षेत्रात विवंचना सतावण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत राहून कार्यमग्न रहा प्रामाणिक प्रयत्न ठेवणे आपल्या हातात आहे ही गोष्ट लक्षात ठेवा उत्तरार्धामध्ये व्यवसाय धंद्यातील परिस्थिती उत्तम होईल उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल व्यावसायिक उत्सव प्रदर्शने यशस्वी होतील जाहिरातींना प्रतिसाद मिळेल नवीन उत्पन्नाचे स्त्रोत पुढे येतील मात्र काही वेळेस विचित्र स्वभावाच्या व्यक्ती भेटल्यामुळे त्रास निर्माण होऊ शकतो त्याकडे दुर्लक्ष करा खर्चाचे प्रमाण जास्त राहील नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडतील नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील आपल्या कार्य कक्षेत राहून आपली कार्य पूर्ण करा आपल्या जबाबदारीचे भान ठेवा अधिकाराचा गैरवापर करू नका विशेषतः सरकारी नोकरी जबाबदाऱ्या पाळा कायदेशीर बाबी लक्षात घ्या तसेच लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. आपल्या कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे बदल घटित होण्याची शक्यता आहे. आपल्या रोजच्या जीवनमानात परिवर्तन होईल. सुख सुविधा वाढवण्यासाठी मुक्तहस्ते खर्च कराल कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च होईल पूर्व परिवारात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक : - ४, ६, ९, ११, १७, १८, २२,२७,३०
अशुभ दिनांक : ७, ८,१३,१५,२१,२५,२७