
डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण
सिंह रास
व्यावसायिक शुभारंभ
करारी चेहरा, हनुवटीचा भाग, स्थूल मोठे मुख, पिंगट डोळे, दात, मजबूत छाती, रुंद व भरदार कपाळ, छाती पुढे काढून चालणारा, धर्मचारिणी, कोणाचीही परवा न करणारा, कमी बोलणारा, हुकूम सोडणारा, किल्ले व राजधानीची ठिकाणे व पर्वतीय प्रदेशात निवास करणारा, प्रख्यात तालीमबाज, वर्ण सावळा, आवाज मोठा असतो, घरीदारी प्रमुखत्वाने वागणारा, धैर्यवान, स्त्रीद्वेष्ट, जबाबदारी स्वीकारणारा, उदार, अभिमानी, मातृभक्त, शेतीची आवड असणारा, शृंगारामध्ये न रमणारा, साधूसंतांची सेवा करणारा, शत्रूवर विजय मिळवणारा असा जातक सिंह राशीच्या अधिपत्याखाली येतो. सिंह रास ही अधिकार गाजवणारी रास आहे. कायम दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा या राशीचा प्रयत्न असतो. त्यामुळे सिंह राशीचे जातक कायम अनेक क्षेत्रात वरिष्ठ पदावर असतात. विविध कंपन्यांंचे संचालक, विविध संस्थाचे पदाधिकारी या राशीच्या अधिपत्याखाली येतात. ही राशी आपले नेतृत्व दुसऱ्याला मान्य करणारी असते.
शिक्षण :- सध्या घेत असलेल्या शिक्षणामध्ये, ते कोणत्याही प्रकारचे असो त्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आपले ग्रहमान चांगले नाहीत. त्यामुळे आपल्याला अनेक अडथळ्यांवर मात करून अभ्यास करावयास पाहिजे, तरच उज्ज्वल यश. विशेष करून अभ्यास करताना वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. त्याचप्रमाणे शिस्त व परिश्रम महत्त्वाचे ठरतील. तरच आपल्या तांत्रिक, शिक्षणात प्रगती होऊ शकते. आपणास यश मिळणार आहे. कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास करताना सातत्य पाहिजे. बाकी शुभ ग्रहांची साथ मिळू शकते. परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासकडे लक्ष केंद्रीत करावे. अन्य बाबींकडे लक्ष देऊ नये. कला- क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होतील. इतरांची मदत मिळेल. यातील मिळणाऱ्या संधीचा फायदा करून घ्यावा.
पारिवारिक :- कुटुंबातील सदस्यांबरोबर काही बाबतींत मतभेद निर्माण होऊन कलहसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण तुमचा सिंह राशीचा स्वभाव हा इतरांवर वर्चस्व गाजवणारा असतो. तो इतरांचे ऐकत नाही. तो आपला हेका कायम ठेवतो. त्यातून व्यक्तीव्यक्तींमध्ये मतभेद वाढीला लागतात. त्यामुळे आपण कोणावरही आपली मते लादू नयेत. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुमचे इतरांसोबतचे संबंध सुधारू शकतील. त्याचप्रमाणे घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताला प्राधान्य द्या. घरातील सदस्यांच्या अपेक्षा आपल्याकडून जास्त असू शकतात. त्यामुळे आपणास समतोल साधण्याची जास्त गरज आहे. त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालावधी चांगला आहे. जास्त जबाबदारी स्वीकारणार आहात. त्यामुळे शांतपणे व सातत्याने कार्य करत रहा. त्यातून तुमची प्रगती होऊ शकेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपल्या चालू असलेल्या नोकरी- व्यवसायात वातावरण थोडे असमतोल राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांभाळून खर्च करण्याची गरज आहे.
या कालावधीच्या पूर्वर्धामध्ये खर्चाचे प्रमाण जास्त राहील. त्यामुळे खर्चाचे नियोजन हिताचे ठरेल. व्यवसाय-धंद्यामध्ये उधारीचे प्रमाण कमी करणे गरजेचे राहील तसेच कोणतेही लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे हिताचे ठरेल. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, नाहीतर फसवणूक ठरलेली आहे. अचानकपणे आर्थिकदृष्ट्या काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु आपल्याला त्या समस्या सोडवता येतील. शांतपणे निर्णय घ्या. कुटुंबात काही वेळा प्रिय व्यक्तींच्या चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे परिवारात मतभेदांमुळे अथवा आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांच्या जुनाट व्याधीच्या पार्श्वभूमीवर जपणे आवश्यक ठरेल. या महिन्याच्या पुढील पंधरवड्यात आपण व्यावसायिक भरभराट अनुभवू शकाल. नवीन व्यावसायिक शुभारंभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसायाविषयी नियोजन होईल. व्यवसाय विस्तारासाठी चांगला कालावधी आहे.
शुभ दिनांक : - २, ४, ५, ११, १४, १७,१९,२२,२७,३०
अशुभ दिनांक : - ७,८,१३,१५,२१,२५,२७
कन्या रास
कायदेशीर बाबी, नियम-अटी पाळा
सलगीत राहणे, आळसात चालणे, मान वाकडी करून चालणारा, जास्त प्रमाणात हातवारे करणारा, चेहरा रुंद गोल, उंची मध्यम, चाल हत्तीसारखी, स्त्रियांमधील लक्षणे जास्त असतात, सुकुमार, कलानिपुण, स्त्रीप्रिय-रतिप्रिय परधन व त्याचा उपभोग घेणारा, प्रियभाषिणी, बहुदा निर्व्यसनी, पवित्र वर्तनाची आवड असणारा, समाजोपयोगी कामे करणारा, ललित कला संपन्न, काव्याचा भोक्ता, जुन्या पद्धतीचे, वर्तनप्रिय, दयाळू, नेहमी आनंदी होणारा, चांगल्या पदार्थांची आवड असणारा. पोशाखाची टापटीप न ठेवणारा, विद्वान लोकांशी परिचय ठेवणारा, काळजी कमी करणारा. साधारणत: विद्वान,
शास्त्र व्यासंगी, वात व कफाचे प्राबल्य शरीरात जास्त प्रमाणात असणारा, बातमीदार, पत्रकार, साहित्य क्षेत्रात कार्य करणारा, छापखान्याची कामे करणारा, कागदाचा व हातांचा संबंध असणारा. त्याचप्रमाणे लिखाणाशी संबंधित असणारा व या पुस्तकांशी संबंधित असणारा, कलाक्षेत्राशी संबंधित असणारा जातक कन्या राशीच्या प्रभुत्वाखाली येतो.
शिक्षण :- शिक्षण क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. पण शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घेणे गरजेचे ठरेल. अभ्यासात एक संघपणा पाहिजे म्हणजेच सातत्य ठेवणे गरजेचे राहील. सातत्याने व एकाग्रपणे अभ्यासात मग्न राहणे गरजेचे राहील. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केल्यास त्यांना यश मिळू शकेल. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळणे गरजेचे आहे. त्याबाबत प्रयत्न केल्यास मार्गदर्शनही मिळेल व चांगले यशही मिळू शकते. प्रदेशातून संधी मिळण्यासाठी जास्तीचे व सातत्याने प्रयत्न करण्यास गरजेचे ठरेल.
पारिवारिक :- आपल्या कुटुंबामध्ये या महिन्यामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे. आपल्याला कुटुंबाच्या मनोरंजनासाठी जास्तीचा खर्च करणार आहात. परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कारण या महिन्यात खर्चाचा ताळमेळ राखणे कठीण बनणार आहे. उत्पन्नाचा स्रोत चांगला राहणार आहे. आवडीचे जेवण तसेच खाणेपिणे मिळेल, एकूणच सदरील काळामध्ये परिवारात शांतीचे व उत्साहवर्धक वातावरण मिळेल. परिवारासह प्रवास घडण्याची शक्यता आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- सध्याच्या कालावधीमध्ये आपल्याला सावध राहून आपल्या कार्यक्षेत्रात कार्य करावयास लागणार आहे. काही वेळेस अनपेक्षितपणे आपण ग्राह्य न धरलेल्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे आपल्या नियोजनातही बदल करावे लागण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणतेही लहान-मोठे व्यवहार करताना पूर्ण विचारांती निर्णय घ्या. कोणतीही नवीन गुंतवणूक करू नका. जुन्या गुंतवणुकीकडे नीट लक्ष द्या. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती ठीकठाक राहील. परंतु त्याकडे नीट लक्ष ठेवणे गरजेचे आहे. व्यवसाय-धंद्यात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात कायदेशीर बाबींचे उल्लंघन करू नका, तसेच नियम-अटी व शर्ती कसोशीने पाळा. सरकारी कामांच्या बाबतीत बेपर्वाई बाळगू नका. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये सुद्धा आपल्या कार्याकडे लक्ष ठेवा. प्रामाणिकपणे कार्य करा. त्याला महत्त्व राहील. चालढकल अजिबात नको. त्याचप्रमाणे आळस नको. सरकारी नोकरीमध्ये लहान-मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा, तसेच वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील, तसेच प्रवासामध्ये अथवा आपल्या कुटुंबात मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, वाहने यांची काळजी घ्या. चोरीची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रदूषणातून होणारे संसर्गजन्य रोग जपा. नुकसानीच्या घटना घडवू शकतात. विशिष्ट बेकायदेशीर बाबी अंगाशी येऊ शकतात. त्यामुळे विशेष सावधान राहून आपले कार्य पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष द्या. सदरील काळामध्ये काही बाबतींत आपल्याला मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील. त्यामुळे लगेचच नाराज होऊ नका. कार्यमग्न राहून प्रामाणिकपणे कष्ट करा. त्याचे फळ नक्कीच मिळेल. त्याचप्रमाणे कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरू शकते. वेळेसच केलेले उपाय उपयोगी पडू शकतात. या काळात सावध राहून निर्णय घेणे गरजेचे ठरेल. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा कसा राहील याकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल.
शुभ दिनांक : - ४, ५, ६, ९, १७, १८, २२,२७
अशुभ दिनांक : ७, ८, १३, १५,२१,२५,२७