'२२ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
'२२ मे'चे राशीभविष्य!

मेष - कुटुंबात सतत सुवार्ता येतील. संततीच्या यशाच्या वार्ता कानी येतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. विवाहविषयक बोलणी सफल होतील. नोकरीत अनुकूल बदल घडतील.

वृषभ - मुलांना अपेक्षित संधी मिळतील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. आर्थिक आवक मनासारखी राहील. व्यवसायात उन्नती प्रगती होईल. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल.

मिथुन - जीवनसाथी शिव मधुर सूर जुळतील. परस्परांच्य समन्वयाने योजना आखता येतील. लांबचा प्रवास घडेल. देवदर्शनानिमित्त प्रवास होऊ शकतो. महत्त्वाच्या कामांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा.

कर्क - गृहसौख्य उत्तम राहून घरातील सदस्यांशी समन्वय राहील. कार्यक्षेत्रात आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल. गाठीभेटी होतील. अनुकूल घटना घडतील. मनोरंजनासाठी वेळ देता येईल. खर्च कराल.

सिंह - परिवारातील वाद-विवाद, गैरसमज दूर होतील. व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. नवीन संकल्पनांचा वापर सफल राहील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास टाळणे योग्य.

कन्या - आर्थिक स्थिती चांगली राहील. स्थायी संपत्तीची कामे होतील. आपण इतरांना समजून घेण्यास तयार राहिले पाहिजे. जोडीदार चांगली साथ देईल. आपले बोलणे संयमी ठेवा.

तुळ - नोकरीत चांगली परिस्थिती राहील. महत्त्वाची कामे पार पाडाल. एखादी जबाबदारी मिळेल. कुटुंबात भावंडांची वाद-विवाद होण्याची शक्यता. जीवनसाथीची मधुर संबंध राहतील. कामाचा ताण जाणवेल.

वृश्चिक - आर्थिक आवक चांगली राहील. विविध कामांमध्ये यश मिळेल. ग्रहमानाची चांगली साथ राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कुटुंबातील मुलांची प्रगती होईल.

धनु - व्यवसायात एक पाऊल पुढे टाकता येईल. आर्थिक मदत उपलब्ध होईल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही. भागीदारी व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य द्या.

मकर - आपल्या कार्यस्थळी अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वास व उत्साह वाढेल. प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या गाठीभेटी होतील. जुने वाद विवाद उफाळून येऊ शकतात.

कुंभ - भाग्याची साथ मिळेल. मालमत्तेच्या तसेच जमिनीच्या व्यवहारात सफलता मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा.

मीन - आर्थिक आवक उत्तम राहून अचानक धनलाभ होऊ शकतो. जुने मित्र भेटतील. कुटुंबातील मुलांना अपेक्षित यश मिळेल. जोडीदाराशी समजदारी ने वागणे. मनोरंजनासाठी खर्च करावा लागेल.

logo
marathi.freepressjournal.in