

चिऊ-काऊ आणि माऊच्या गोष्टींचे जग आता मागे पडले आहे. आजची पिढी तंत्रज्ञान, विज्ञान आणि नवनवीन आव्हानांच्या विश्वात वावरत आहे. याच पिढीच्या म्हणजेच इयत्ता ४ थी ते ८ वीच्या मुलांच्या बदलत्या भावविश्वाशी निगडित लेखकांच्या कल्पनाशक्तीला आम्ही साद घालत आहोत. तुमच्याकडे किशोरवयीन मुलांचे भावविश्व उलगडणाऱ्या उत्तम कथा आहेत का? मग त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा! ‘बालरंग’ पुरवणीसाठी आम्ही विज्ञान कथा, उत्कंठावर्धक रहस्यकथा आणि मनाला स्पर्श करणाऱ्या भावनाप्रधान कथांचे स्वागतच करू.
कथा पाठवताना...
कथा पाठवताना ती जास्तीत जास्त ७०० शब्दांपर्यंत असावी आणि केवळ मराठी भाषेतच असावी.
आजच्या मुलांच्या जाणिवा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण विषयांची निवड अपेक्षित आहे.
आपल्या कथा केवळ युनिकोड (Unicode) मध्ये टाईप केलेल्या स्वरूपातच स्वीकारल्या जातील. हस्तलिखित किंवा कागदावर लिहून त्याचे फोटो पाठवल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
निवडक आणि दर्जेदार कथांना ‘बालरंग’ पुरवणीत मानाचे स्थान दिले जाईल.
तुमच्या किमान दोन कथा २५ एप्रिल २०२६ रोजीपर्यंत navshakti.news@gmail.com यावर पाठवा.
कथेच्या खाली तुमचे नाव आणि फोननंबर लिहायला विसरू नका.
‘नवशक्ति’च्या उपक्रमात नक्की सहभागी व्हा! - संपादक