दिवाळी अंक २०२६ : फटाके की पुस्तके

फटाके मोठा आवाज करतात, पुस्तके शांतपणे विचार जागवतात...
दिवाळी अंक २०२६ : फटाके की पुस्तके
दिवाळी अंक २०२६ : फटाके की पुस्तके
Published on: 

जगदीश काबरे

फटाके मोठा आवाज करतात,
पुस्तके शांतपणे विचार जागवतात.

फटाके हवेचे प्रदूषण करतात,
पुस्तके विचारांतील प्रदूषण दूर करतात.

फटाके क्षणात पैसे जाळतात,
पुस्तके ज्ञानाची संपत्ती वाढवतात.

फटाके मुलांना इजा पोहोचवतात,
पुस्तके बालमनाला आनंद देतात.

फटाके पक्षी-प्राण्यांना घाबरवून सोडतात,
पुस्तके पक्षी-प्राण्यांची ओळख करून देतात.

फटाके ध्वनी प्रदूषण वाढवतात,
पुस्तके शांततेचे महत्त्व शिकवतात.

फटाके ध्वनी प्रदूषणामुळे कान बहिरे करतात,
बोलकी पुस्तके विचारांना नवी क्षितिजे देतात.

फटाके अहंकाराला खतपाणी घालतात,
पुस्तके माणसाला विनम्र बनवतात.

फटाके विध्वंसक वृत्ती वाढवतात,
पुस्तके सर्जनशीलतेची प्रेरणा देतात.

फटाके क्षणभर प्रकाश देऊन अंधार करतात,
पुस्तके आयुष्यभर ज्ञानाचा प्रकाश देतात.

फटाके पर्यावरणाला संकटात टाकतात,
पुस्तके पर्यावरणाच्या रक्षणाचा मार्ग दाखवतात.

फटाक्यांच्या उद्योगात बालमजूर असतात,
पुस्तके बालबुद्धीला नवे जग दाखवतात.

फटाक्यांचा आवाज झोपमोड करतो,
पुस्तकांचा सहवास मनाला शांत करतो.

फटाके क्षणिक आनंद देतात,
पुस्तके आयुष्यभराची शिदोरी देतात.

फटाके म्हणजे प्रदूषणाची भर,
पुस्तके म्हणजे संस्कृतीचा आधार.

या दिवाळीत एकच संकल्प करूया,
फटाक्यांऐवजी पुस्तके भेट देऊया!

हिरवाई जपूया, पर्यावरण वाचवूया,
वाचनसंस्कृती वाढवूया, विवेकाचा दीप उजळूया!