दीडशहाणी चिमणी

एकदा एका गरुडाने सशाचा पाठलाग केला, बिचारा ससा आपला खूपच घाबरून गेला...
दीडशहाणी चिमणी
(Photo-Yandex)
Published on

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

एकदा एका गरुडाने

सशाचा पाठलाग केला

बिचारा ससा आपला

खूपच घाबरून गेला

हे एका दीडशहाण्या

चिमणीने पाहिले

घाबरलेल्या सशाला

रागाने विचारले

कशाला घाबरतोस?

चपळ प्राण्यासारखं वाग

दूर पळून जायचं

कुणी काढणार नाही माग

उपदेश करता करता

तेवढ्यात ससाणा दिसला

पटकन उडून जाण्याचा

चिमणीचा बेत फसला

ससाण्याने चिमणीला

पंजात पकडले

फडफडणाऱ्या चिमणीला

चांगलेच जखडले

ससा म्हणाला तिला

घाबरलात चिऊताई?

उपदेश तुमचा गेला कुठे

सांगा आता काही?

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in